एक्स्प्लोर

Nagpur Crime : हिंगण्यात तीन मित्रांवर सपासप वार करुन संपवणाऱ्या नराधमाला फाशी; सत्र न्यायालयाचा निकाल

Nagpur Crime News : हिंगणा परिसरातील गुमगाव येथे 2015 साली घडलेल्या बहुचर्चित तिहेरी हत्याकांडातील दोषी राजू शन्नू बिरहा याला सत्र न्यायालयाने फाशी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

Nagpur Crime News : हिंगणा परिसरातील गुमगाव येथे 2015 साली घडलेल्या बहुचर्चित तिहेरी (Hingna Triple Murder) हत्याकांडातील दोषी कुख्यात राजू शन्नू बिरहा (वय 45 वर्षे) याला सत्र न्यायालयाने (District Sessions Court Nagpur) फाशी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. त्याच्यावर सुनील हेमराज कोटांगळे (वय 31 वर्षे, रा. घोटी डोंगरगाव), कैलास नारायण बहादुरे (वय 32 वर्षे, रा. घोटी) आणि गोलू लहुभान गायकवाड (वय 32 वर्षे, रा. डोंगरगाव) यांच्या हत्येचा आरोप होता.

न्यायाधीश पी. वाय. लाडेकर यांनी निर्णय दिला. ही घटना 17 नोव्हेंबर 2015 रोजी हिंगणा तालुक्यातील नवीन गुमगाव (वागदरा) येथील वृंदावन सिटी परिसरात घडली होती. राजू हा सदरमधील कुख्यात गुन्हेगार आहे. राजू बिरहा आणि सुनील कोटांगळे दोघांची वृंदावन सिटीसमोर पानठेला आणि चहाची टपरी होती. हे दोघे अवैध दारु विक्रीच्या व्यवसायात होते. त्यावरुन दोघांमध्ये जुना वाद होता. घटनेच्यावेळी सुनीलचे मित्र कैलास आणि गोलूही तिथे आले होते.

सत्तूरने सपासप वार...

तिघांना बघून राजूने पानठेल्यातून सत्तूर काढला आणि तो सुनीलच्या दिशेने धावला. सुनीलवर हल्ला केल्याने तो जमिनीवर कोसळला. कैलास आणि गोलू जीव मुठीत घेऊन तेथून पळायला लागले. त्यांनाही ठार मारण्यासाठी राजू धावायला लागला. याच वेळी कमलेश पंचमलाल झारिया मोटरसायकल घेऊन आला. राजू त्याच्या मोटरसायकलवर बसला. मोटरसायकलवरुनच कैलासवर सत्तूरने वार केला. कैलास खाली पडल्यावर त्याच्यावर सपासप वार केले. पुढे गोलूचाही पाठलाग करुन एका शेतात त्याचीही हत्या केली. हिंगणा पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. तपासाअंती आरोपपत्र सादर केले. पोलिसांनी कमलेश झारियावरही गुन्हा दाखल करुन त्याच्याविरुद्ध आरोपपपत्र दाखल केले होते. राजूची गुन्हेगारी मानसिकता लक्षात घेता अखेर न्यायालयाने त्याला फाशी सुनावली.

मात्र, सबळ पुराव्यांअभावी कमलेशची सुटका करण्यात आली. सुरुवातीला माजी जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे यांनी तर त्यानंतर ॲड. कल्पना पांडे यांनी या प्रकरणी सरकारची बाजू मांडली. राजूकडून ॲड. नितेश समुद्रे यांनी तर कमलेशकडून ॲड. अशोक भांगडे यांनी बाजू मांडली.

सुरुवातील शांत असलेला राजू नंतर राजू विनवणी करु लागला...

न्यायालय निकाल देत असताना राजू अतिशय लक्षपूर्वक ऐकत होता. काहीही झाले तरी आपल्याला फाशी होणार नाही, अशी आशा त्याला होती. मात्र, न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावताच सुरुवातीला शांत उभा असलेला राजू अचानक अस्वस्थ झाला. त्याने न्यायालयात स्वतःच युक्तिवाद करत आपल्याला फाशी देऊ नये, अशी विनंती केली. मी गेल्या सात वर्षांपासून तुरुंगात आहे. सात वर्षे न्यायालयात असलेल्या आरोपीला फाशी देऊ नये, असे वरिष्ठ न्यायालयाचे आदेश आहे, असेही त्याने नमूद केले. मात्र, न्यायालयापुढे बिरहाचे काहीही चालले नाही. न्यायालयात त्याच्या खटल्याशी संबंधित वकिलांचे म्हणणे आहे, की राजू हा अतिशय आक्रमक स्वभावाचा आहे. एकदा एका सुनावणीच्या वेळी त्याच्या वकिलाला न्यायालयात पोहोचायला थोडा उशीर झाला. तेव्हा राजूला राग आला, त्याने पूर्ण न्यायालयात आपल्याच वकिलाला शिवीगाळ केली होती.

ही बातमी देखील वाचा...

Winter Assembly Session : महाराष्ट्राला धोका...आमदारांना खोका; विरोधकांची जोरदार घोषणाबाजी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MNS activist killed : कट मारल्यामुळे बाचाबाची, रिक्षाचालक अन् फेरीवाल्यांनी मिळून मनसे कार्यकर्त्याला संपवल्याचा दावा, मालाड पूर्वेत आत्तापर्यंत काय घडलं?
कट मारल्यामुळे बाचाबाची, रिक्षाचालक अन् फेरीवाल्यांनी मिळून मनसे कार्यकर्त्याला संपवल्याचा दावा, मालाड पूर्वेत आत्तापर्यंत काय घडलं?
World War II Bomb : जर्मनीत सापडला दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब! 5 हजार लोकांना सुरक्षितस्थळी नेलं, निकामी करण्यास किती तास लागले?
जर्मनीत सापडला दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब! 5 हजार लोकांना सुरक्षितस्थळी नेलं, निकामी करण्यास किती तास लागले?
Sharad Pawar : आज महाराष्ट्र पुन्हा उभा करायचा आहे, 48 पैकी 31 जागा जिंकल्यानंतर यांना बहिण आठवली; शरद पवारांचा हल्लाबोल
आज महाराष्ट्र पुन्हा उभा करायचा आहे, 48 पैकी 31 जागा जिंकल्यानंतर यांना बहिण आठवली; शरद पवारांचा हल्लाबोल
Sanjivraje Naik Nimbalkar : साम, दाम, दंड भेद वापरण्याचे दिल्लीतील नेत्यांनी सांगितले, पण दिल्लीसमोर झुकणारे आम्ही नाही; संजीवराजेंचा एल्गार
साम, दाम, दंड भेद वापरण्याचे दिल्लीतील नेत्यांनी सांगितले, पण दिल्लीसमोर झुकणारे आम्ही नाही; संजीवराजेंचा एल्गार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Atul Parchure Passes Away : अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, 57व्या वर्षी घेतला अखेरचा श्वासABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 14 October 2024ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 13 October 2024Top 25 | टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha : 14 OCT 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MNS activist killed : कट मारल्यामुळे बाचाबाची, रिक्षाचालक अन् फेरीवाल्यांनी मिळून मनसे कार्यकर्त्याला संपवल्याचा दावा, मालाड पूर्वेत आत्तापर्यंत काय घडलं?
कट मारल्यामुळे बाचाबाची, रिक्षाचालक अन् फेरीवाल्यांनी मिळून मनसे कार्यकर्त्याला संपवल्याचा दावा, मालाड पूर्वेत आत्तापर्यंत काय घडलं?
World War II Bomb : जर्मनीत सापडला दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब! 5 हजार लोकांना सुरक्षितस्थळी नेलं, निकामी करण्यास किती तास लागले?
जर्मनीत सापडला दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब! 5 हजार लोकांना सुरक्षितस्थळी नेलं, निकामी करण्यास किती तास लागले?
Sharad Pawar : आज महाराष्ट्र पुन्हा उभा करायचा आहे, 48 पैकी 31 जागा जिंकल्यानंतर यांना बहिण आठवली; शरद पवारांचा हल्लाबोल
आज महाराष्ट्र पुन्हा उभा करायचा आहे, 48 पैकी 31 जागा जिंकल्यानंतर यांना बहिण आठवली; शरद पवारांचा हल्लाबोल
Sanjivraje Naik Nimbalkar : साम, दाम, दंड भेद वापरण्याचे दिल्लीतील नेत्यांनी सांगितले, पण दिल्लीसमोर झुकणारे आम्ही नाही; संजीवराजेंचा एल्गार
साम, दाम, दंड भेद वापरण्याचे दिल्लीतील नेत्यांनी सांगितले, पण दिल्लीसमोर झुकणारे आम्ही नाही; संजीवराजेंचा एल्गार
आनंदाची बातमी! पुणेकरांना आणखी दोन नव्या मेट्रो मिळणार, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, जाणून घ्या कसा असेल मार्ग?
आनंदाची बातमी! पुणेकरांना आणखी दोन नव्या मेट्रो मिळणार, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, जाणून घ्या कसा असेल मार्ग?
Nobel In Economic Sciences : अमेरिका आणि ब्रिटनमधील तीन शास्त्रज्ञांना अर्थशास्त्रातील 'नोबेल'; राजकीय संस्थांचा समाजावरील परिणाम जगाला दाखवला
अमेरिका आणि ब्रिटनमधील तीन शास्त्रज्ञांना अर्थशास्त्रातील 'नोबेल'; राजकीय संस्थांचा समाजावरील परिणाम जगाला दाखवला
मुंबईहून उड्डाण करणाऱ्या तीन फ्लाइटमध्ये बॉम्बची धमकी; एअर इंडियाचे विमान दिल्लीकडे वळवले, इंडिगोच्या 2 विमानांचीही तपासणी
मुंबईहून उड्डाण करणाऱ्या तीन फ्लाइटमध्ये बॉम्बची धमकी; एअर इंडियाचे विमान दिल्लीकडे वळवले, इंडिगोच्या 2 विमानांचीही तपासणी
शिवसृष्टीतील राड्यानंतर छगन भुजबळ तडकाफडकी येवल्यात दाखल; म्हणाले, छत्रपती शिवरायांसमोर शिवीगाळ करणं....
शिवसृष्टीतील राड्यानंतर छगन भुजबळ तडकाफडकी येवल्यात दाखल; म्हणाले, छत्रपती शिवरायांसमोर शिवीगाळ करणं....
Embed widget