एक्स्प्लोर

Winter Assembly Session : महाराष्ट्राला धोका...आमदारांना खोका; विरोधकांची जोरदार घोषणाबाजी

Maharashtra Assembly Winter Session : महाराष्ट्राला धोका... मंत्र्यांना खोका, शेतकरी हैराण, सरकार खातो गायरान, सीमावासी हैराण.. सरकार खातो गायरान या घोषणांनी विरोधकांनी विधानभवन परिसर दणाणून सोडला. 

Maharashtra Assembly Winter Session : "राजीनामा द्या, राजीनामा द्या.. भ्रष्ट मंत्री राजीनामा द्या", "विदर्भ हैराण, सत्ताधारी खातो गायरान", "खाऊन खाऊन पन्नास खोके.. माजले बोके, माजले बोके" अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) आमदारांनी सत्ताधाऱ्यांविरोधात (Eknath Shinde Devendra Fadnavis government) जोरदार निदर्शनं केली. काल संत्री तर आज खाली खोके हातात घेऊन विरोधकांनी "हकालपट्टी करा, हकालपट्टी करा.. खोकेवाल्यांची हकालपट्टी करा.." म्हणत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. आमदारांनी हातात टेलीबर्डचे बोके आणि रिकामे खोके हातात घेऊन सरकारचा निषेध केला.

विरोधकांच्या घोषणांनी विधानभवन परिसर दणाणला

विधिमंडळ अधिवेशनाच्या (Maharashtra Assembly Winter Session) दुसऱ्या आठवड्यातील चौथ्या दिवसाचं कामकाज सुरु झालं आहे. आजही विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक सूर आळवला. "हकालपट्टी करा, हकालपट्टी करा.. भ्रष्ट मंत्र्यांची हकालपट्टी करा", "शेतकऱ्यांना धोका, मंत्र्यांना खोका", "विदर्भाला धोका, मंत्र्यांना खोका", "महाराष्ट्राला धोका... मंत्र्यांना खोका", "शेतकरी हैराण, सरकार खातो गायरान", "सीमावासी हैराण.. सरकार खातो गायरान" या घोषणांनी विरोधकांनी विधानभवन परिसर दणाणून सोडला. 

या आंदोलनात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve), नाना पटोले (Nana Patole), रोहित पवार (Rohit Pawar), यशोमती ठाकूर (Yashomati Thakur), धनंजय मुंडे (Dhananjay Munde), जितेंद्र आव्हाड भास्कर जाधव, सचिन अहीर, विकास ठाकरे यांच्यासह सर्व विरोधी पक्षाचे आमदार सहभागी झाले होते.

महाराष्ट्रासाठी खोके नवीन नाही. गाव, वाडे, तांडे इथपर्यंत खोके पोहोचले आहेत. बैलपोळ्यामध्ये बैलांच्या झोळीवर देखील खोके होते. सभागृहातील या बोक्यांनी खोके खाल्ले आणि माजले देखील. हे आम्ही खोके आणि बोके घेऊन प्रतिकात्मक आंदोलन केले असल्याचे विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

सत्ताधारी आमदार शांत

नागपुरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून महाविकास आघाडीचे आमदार पायऱ्यांवर येताच सत्ताधारी आमदारही आपल्या पक्ष कार्यालयातून महाविकास आघाडी विरोधात घोषणा देत माध्यमांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत होते. मात्र गेल्या तीन दिवसांपासून सत्ताधारी आमदार शांत असल्याचे दिसून येत आहे.

ही बातमी देखील वाचा...

काही दिवसांनी मुख्यमंत्री काळी टोपी, खाकी पॅन्ट घालून सभागृहात येतील, एकनाथ शिंदेंच्या रेशीमबाग भेटीवरून संजय राऊतांचं टीकास्त्र

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Biggest Solar Parts Project: चीनच्या धर्तीवर नागपूरमध्ये उभारला जाणार देशातील सर्वात मोठा सौर इनगॉट-वेफर प्लांट, 30 हजार कोटींची गुंतवणूक
चीनच्या धर्तीवर नागपूरमध्ये उभारला जाणार देशातील सर्वात मोठा सौर इनगॉट-वेफर प्लांट, 30 हजार कोटींची गुंतवणूक
अमेरिकेचे नेतेही सांगतात, जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उदाहरण
अमेरिकेचे नेतेही सांगतात, जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उदाहरण
Nagpur News : नागपुरात मुलं चोरणारी टोळी सक्रिय, सोशल मीडियावर अफवांचा पेव फुटला, गैरसमजुतीतून वृद्ध महिलेला लाथाबुक्क्यांनी मारलं, थोडक्यात बचावले प्राण
नागपुरात मुलं चोरणारी टोळी सक्रिय, सोशल मीडियावर अफवांचा पेव फुटला, गैरसमजुतीतून वृद्ध महिलेला लाथाबुक्क्यांनी मारलं, थोडक्यात बचावले प्राण
Gas Shortage India : सलग दुसऱ्या आठवड्यात युद्धज्वर शिगेला, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला गॅस पुरवठ्यासंदर्भात महत्वपूर्ण निर्देश
सलग दुसऱ्या आठवड्यात युद्धज्वर शिगेला, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला गॅस पुरवठ्यासंदर्भात महत्वपूर्ण सूचना, 17 मार्चपर्यंत जबाब नोंदवण्याचे निर्देश

व्हिडीओ

North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
Kuldeep yadav Marriage : कुलदीप यादवच्या लग्नाची धूम, मैत्रीण वंशिकाबरोबर लग्नगाठ बांधली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नेपाळमध्ये भारतीय यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली; 7 जणांचा मृत्यू, मनकामना मंदिरातून परतताना भीषण अपघात
नेपाळमध्ये भारतीय यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली; 7 जणांचा मृत्यू, मनकामना मंदिरातून परतताना भीषण अपघात
Harish Rana Case: सुप्रीम कोर्टाची इच्छामरणाची परवानगी, 31 वर्षीय हरिश राणा शेवटच्या प्रवासाला निघाला; तब्बल 13 वर्षांच्या शारीरिक क्लेशातून मुक्त होणार
Video: सुप्रीम कोर्टाची इच्छामरणाची परवानगी, 31 वर्षीय हरिश राणा शेवटच्या प्रवासाला निघाला; तब्बल 13 वर्षांच्या शारीरिक क्लेशातून मुक्त होणार
BLOG: युद्धभूमीचा बदलता चेहरा; गनपावडरपासून अल्गोरिदम 'वॉर'रुमकडे
BLOG: युद्धभूमीचा बदलता चेहरा; गनपावडरपासून अल्गोरिद 'वॉर'रुमकडे
धाराशिवमध्ये भीषण अपघात, तीन वाहनाची विचित्र धडक; तीन जणांचा मृ्त्यू, 2 गंभीर
धाराशिवमध्ये भीषण अपघात, तीन वाहनाची विचित्र धडक; तीन जणांचा मृ्त्यू, 2 गंभीर
Baramati and Rahuri : बारामतीची पोटनिवडणूक सुनेत्रा पवार लढणार, राष्ट्रवादीकडून शिक्कामोर्तब; राहुरीत प्राजक्त तनपुुरे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक, सूत्रांची माहिती
बारामतीत सुनेत्रा पवार पोडनिवडणूक लढवणार, सुनील तटकरेंची माहिती, राहुरीत प्राजक्त तनपुरे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक, सूत्रांची माहिती
पुण्यात पुन्हा 'वैष्णवी'ने संपवलं जीवन; सासरच्या जाचाला कंटाळून 8 महिन्यांतच विवाहितेचं टोकाचं पाऊल
पुण्यात पुन्हा 'वैष्णवी'ने संपवलं जीवन; सासरच्या जाचाला कंटाळून 8 महिन्यांतच विवाहितेचं टोकाचं पाऊल
बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ द्या, अन्यथा..; देवेंद्र फडणवीसांचं आवाहन अन् इशाराही
बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ द्या, अन्यथा..; देवेंद्र फडणवीसांचं आवाहन अन् इशाराही
Iran War Live News: 'नेतान्याहू जिवंत असेल तर शोधून ठार मारणार, तो निष्पाप मुलांचा खुनी' ट्रम्पना होर्मुझमध्ये ट्रॅप करताच इराणचा युद्धाच्या 16व्या दिवशी गर्भित इशारा
'नेतान्याहू जिवंत असेल तर शोधून ठार मारणार, तो निष्पाप मुलांचा खुनी' ट्रम्पना होर्मुझमध्ये ट्रॅप करताच इराणचा युद्धाच्या 16व्या दिवशी गर्भित इशारा
Embed widget