Scholarship : विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी 13 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
सन 2021-22 मध्येप्रवेश घेतलेले व शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज तात्काळ https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करावेत.
नागपूर: भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती (Scholarship) योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडिबीटीच्या संकेत स्थळावर शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज (Online Application) भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 13 ऑगस्ट, 2022 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
अद्यापही ज्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज सादर केलेले नाही असे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहु नये म्हणून अशा अद्यापही शिष्यवृत्तीचे अर्ज भरलेले नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने अंतिम मुदतवाढ (Extension) दिलेली आहे.
येथे सादर करा अर्ज
नागपूर विभागातील महाविद्यालयामध्ये सन 2021-22 मध्येप्रवेश घेतलेले व शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज तात्काळ https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करावेत. विभागातील सर्व महाविद्यालयांनी महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असणारे अर्ज लवकरात लवकर ऑनलाईन प्रणालीतून संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे वर्ग करावेत, असे आवाहन डॉ. सिद्धार्थ गायकवाड, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग नागपूर यांनी केले आहे.
Azadi Ka Amrit Mahotsav : नागपूर पोलिस घेणार फरार 3 हजार आरोपींचा शोध; बेपत्ता महिला, मुलांचाही मागोवा
NATIONAL LOK ADALAT : राष्ट्रीय लोक अदालत 13 ऑगस्ट रोजी
नागपूर: राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन जिल्हा न्यायालय,आकाशवाणी चौक, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे 13 ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. या कार्यक्रमास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष एस.बी. अग्रवाल यांचेसह न्यायिक अधिकारी उपस्थित राहणार आहे. सकाळी 10.30 वाजतापासून कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. या सुवर्ण संधीचा लाभ संबंधित पक्षकारांनी घेवून राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रकरणे अदालतीमध्ये ठेवून त्यांचा निपटारा करावा, असे आवाहन जिल्हा विधी (Legal Help) सेवा प्राधिकरणाचे सचिव जयदीप पांडे यांनी केले आहे.
NMC Elections : नागपूर मनपाची निवडणूक डिसेंबरमध्ये!
Azadi Ka Amrit Mahotsav : सामाजिक न्याय विभागातर्फे 'हर घर तिरंगा' अभियानाला सुरुवात
नागपूर : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या मनात या स्वातंत्रय लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात. स्वातंत्रय संग्रामातील अज्ञात नायक/क्रातिकारक/ स्वातंत्रय संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, स्वातंत्रयासाठी चेतवलेले स्फुलिंग कायम तेवत राहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमानसात राहावी. याच उद्देशाने सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमा अंतर्गत सामाजिक न्याय विभागातर्फे प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग नागपूर मध्ये 11 ऑगस्ट 2022 ते 15 ऑगस्ट 2022 दरम्यान विविध कार्यक्रम राबवून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रम राबविण्यात येत आहे. सर्व शासकीय वसतिगृह व अनु. जाती व नवबौद्ध मुलां/मुलींची शासकीय निवासी शाळा, अनुदानित/विनाअनुदानित वसतिगृहे, दिव्यांग शाळा, सैनिकी शाळा, औद्योगिक सहकारी संस्था, सूतगिरणी सर्व समाजकार्य महाविद्यालये येथील कार्यालयात राष्ट्रध्वज फडकविणे. तसेच संविधान प्रास्ताविकेचे वाचन करणे, वृक्षारोपण, सिड्स वितरण इ. कार्यक्रमाचे आयोजन करून स्वांतंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणेबाबत विभागातील सर्व अधिकाऱ्यांना डॉ. सिद्धार्थ गायकवाड, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग नागपूर यांनी सूचना दिलेल्या आहेत.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI