(Source: ECI/ABP News/ABP Majha)
NMC Elections : नागपूर मनपाची निवडणूक डिसेंबरमध्ये!
मग 2017नुसारच प्रभाग संख्या असली तरी प्रभागांचे क्रमांक बदलतील. दिशा बदलल्याने आरक्षणातही बदल होईल. त्यामुळे गॅझेट नोटिफिकेशन अत्यंत महत्वाचं असेल.
नागपूर: नागपूर महापालिकेची (NMC) निवडणूक तिसऱ्या टप्प्यात अर्थात डिसेंबरमध्ये होईल असे संकेत आहेत. साधारणत: दिवाळीनंतर ही निवडणूक होऊ शकते. सध्या निवडणूक विभागाचे काम पूर्णत: थांबले आहे. राज्य सरकारने प्रभाग रचना व सदस्यसंख्येत बदल केल्याने पुन्हा नव्याने रचना तयार करावी लागेल. गॅझेट नोटिफिकेशन निघाल्यावरच त्याबाबतचा निर्णय होईल. जाणकार सूत्रानुसार ही निवडणूक डिसेंबरमध्ये जाईल.
त्रिसदस्यीय प्रभाग रचनेची (Ward) संपूर्ण प्रक्रिया मनपाच्या निवडणूक विभागाने (Elections Department) पार पाडली होती. केवळ निवडणूक तारखांच्या घोषणेची प्रतिक्षा होती. परंतु, राज्य मंत्रीमंडळाने ऐनवेळेवर 2017 च्या सदस्यसंख्येनुसार निवडणूक घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर झालेल्या संपूर्ण प्रक्रिया रद्दबातल ठरल्या. निवडणूक विभागाने प्रारंभी त्रिसदस्यीय प्रभाग रचना केली. त्यानंतर अनु. जाती, जमाती व महिलांचे आरक्षण काढले. त्यानंतर आक्षेप मागविले. त्याची नोंद घेते ना तोच ओबीसी आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात सुटला. त्यामुळे पुन्हा आरक्षणाचे (Political Reservation) नव्याने तिढा सोडवावा लागला. यात अनु.जाती, जमाती वगळता ओबीसी महिला, पुरूष व खुला प्रवर्ग पुरूष व महिला असे आरक्षण काढावे लागले. त्यामुळे संपूर्ण प्रभागातील आरक्षण रचनेत बदल झाला. आता निवडणूक ऑगस्ट वा सप्टेंबरमध्ये होतील, असा अंदाज असतानाच पुन्हा चारसदस्यीय पध्दतीने निवडणूका घेण्याचा निर्णय झाल्याने यापुवीं झालेली प्रक्रिया राबवावी लागेल.
गॅझेट नोटीफिकेशनकडे नजर
निवडणुकीत नेमके काय? यासाठी गॅझेट नोटीफिकेशनकडे सर्वांच्या नजरा असतील. यात पुढील प्रक्रिया कशी असेल याबाबतची स्पष्टता असेल. प्रभाग रचना चार सदस्यीय असली तरी ती 2017प्रमाणेच असेल तर मग चक्रानुक्रमे असेल की त्यात बदल होईल, यावर विशेष असेल. यात बदल असेल तर मग 2017नुसारच प्रभाग संख्या असली तरी प्रभागांचे क्रमांक बदलतील. दिशा बदलल्याने आरक्षणातही बदल होईल. त्यामुळे गॅझेट नोटिफिकेशन अत्यंत महत्वाचं असेल.
Amazon : अॅमेझॉन कंपनीची कोट्यवधींनी फसवणूक, बनावट आयडीद्वारे सायबर गुन्हेगारांनी लावला चुना
आरक्षणाची प्रक्रियाही किचकट
बदल झाल्यास आरक्षणाची प्रक्रियाही (Political Reservation) किचकट होईल. निवडणूक विभागाने त्रिसदस्यीय प्रभाग रचनेचे आरक्षण काढताना खूप अभ्यास केला होता. आता परत दीर्घ अभ्यास करून निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार आरक्षण काढले जाईल.
मतदार यादीसाठी किमान दीड महिना
प्रभाग रचना, आरक्षण प्रक्रिया पार पाडल्यानंतर मतदार यादीची (Voter List) रचना करण्यासाठी किमान दीड महिन्याचा कालावधी लागेल, असे निवडणूक विभागातील अधिकृत सूत्रांची माहिती आहे.