Azadi Ka Amrit Mahotsav : नागपूर पोलिस घेणार फरार 3 हजार आरोपींचा शोध; बेपत्ता महिला, मुलांचाही मागोवा
अडचणीच्या काळात पोलिसांची कुठे आणि कसा संपर्क साधावा याची माहिती सामान्य नागरिकांना व्हावी. या उद्देशाने नागपूर पोलिसांनी आज नागपूरच्या पोलीस भवन परिसरात खास मेळाव्याचे आयोजन केले आहे.
नागपूरः स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष वेगवेगळे विभाग नवनव्या पद्धतीने साजरा करत आहेत. नागपूर पोलिसांनीही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष अभिनव पद्धतीने साजरा करण्याचे ठरविले आहे. नागपूर शहरातील तीन हजारपेक्षा जास्त गुन्हेगार सध्या फरार असून या आरोपींचा शोध घेण्यासाठी नागपूर पोलीस आजपासून विशेष मोहिम राबवणार आहे. या मोहिमेत फरार आरोपींचा शोध घेणे आणि कुख्यात गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणे यासाठी नागपूर शहरातील सर्वच पोलीस ठाण्यातील अधिकारी खास प्रयत्न करणार आहे.
बेपत्ता २ हजार जणांचाही शोध
नागपूर शहरात गेल्या सात महिन्यात बेपत्ता झालेल्या सुमारे दोन हजार महिला - पुरुषांचा ( 1047 महिला आणि 980 पुरुष) शोध ही पोलीस घेणार आहे. दरम्यान महिलांविरोधात होणाऱ्या गुन्ह्यांना आळा बसावा यासाठी ही पोलीस विशेष प्रयत्न करणार आहे. तसेच अवैध दारूचा व्यवसाय करणारे, अमली पदार्थ विकणारे यांच्या विरोधातही भक्कम कायदेशीर कारवाई करत या अवैध व्यवसायांचा समूळ उच्चाटन करण्याचे प्रयत्न या मोहिमेत केले जाणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राबविल्या जाणाऱ्या विशेष अभियानाची घोषणा नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज केली.
PHOTO: मिस युनिव्हर्स हरनाज संधूच्या क्लासी अदा; चाहते झाले फिदा!
आजपासून पोलीस भवन परिसरात खास मेळावा
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने नागपूरच्या नागरिकांना खास करून शाळकरी विद्यार्थी व तरुण वर्गाला पोलिसांच्या कार्याची माहिती व्हावी, अडचणीच्या काळात पोलिसांची कुठे आणि कसा संपर्क साधावा याची माहिती सामान्य नागरिकांना व्हावी. या उद्देशाने नागपूर पोलिसांनी आज नागपूरच्या पोलीस भवन परिसरात खास मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यात मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले. पोलीस दलातील विविध शाखा आणि कार्यालय कसे काम करतात याची ओळख या मेळाव्याच्या माध्यमातून शालेय विद्यार्थी आणि तरुणांना करून दिली जात आहे.
Maharashtra Assembly Session : पावसाळी अधिवेशनाची फायनल तारीख ठरली; केवळ सहा दिवसांचंच अधिवेशन
सैन्य भरतीसाठी अशासकीय सामाजिक संघटनांनी योगदान द्यावे
नागपूर: जिल्ह्यात 17 सप्टेंबर पासून 9 ऑक्टोबर पर्यंत विदर्भस्तरीय सैन्य भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्यात बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या उमेदवारांसाठी अल्पपोहार, जेवन व चहापान व्यवस्था करण्यासाठी नागपूर जिल्ह्यातील विविध अशासकीय सामाजिक संघटनांनी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचे तर्फे करण्यात येत आहे. इच्छुक संघटनांनी आपली नावे तपशिलासह 30 ऑगस्ट पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, प्रशासकीय इमारत क्र.1, तिसरा माळा, सिव्हिल लाईन्स् नागपूर येथे नोंदवावी, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर(डॉ.) शिल्पा खरपकर यांनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क क्र. 0712-2561133 असा आहे.