एक्स्प्लोर

कोरोना काळात परीक्षा शुल्क माफीचा निर्णय घेणारं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर राज्यातील पहिलं विद्यापीठ

परीक्षा शुल्क माफीची मागणी भाजपा युवा मोर्च्याकडून करण्यात आली होती. या निर्णयासाठी  कुलगुरूंचे आभार पत्रकार परिषदेतून भाजपा युवा मोर्चाकडून मानण्यात आले. यावेळी भाजपाचे प्रदेश सचिव कल्याण देशपांडे यांनी हाच विद्यार्थी हिताचा निर्णय महाराष्ट्रभर लागू करावा अशी मागणी केली. नागपूर विद्यापीठाचे अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या 4 लाख विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार असल्याचेही ते म्हणाले आहेत. 

नागपूर : कोरोनाच्या काळात विद्यार्थी आर्थिक अडचणीतून जात आहेत. यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परीक्षा शुल्क माफीचा निर्णय घेणारे पहिले विद्यापीठ ठरले आहे. यासोबत विद्यार्थ्यांकरिता जीवन विमा आणि अपघात विमा सुद्धा काढण्याचा महत्वपूर्ण निर्णय विद्यापीठाने घेतला असून त्यामुळे विद्यार्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.

परीक्षा शुल्क माफीची मागणी भाजपा युवा मोर्च्याकडून करण्यात आली होती. या निर्णयासाठी  कुलगुरूंचे आभार पत्रकार परिषदेतून भाजपा युवा मोर्चाकडून मानण्यात आले. यावेळी भाजपाचे प्रदेश सचिव कल्याण देशपांडे यांनी हाच विद्यार्थी हिताचा निर्णय महाराष्ट्रभर लागू करावा अशी मागणी केली. नागपूर विद्यापीठाचे अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या 4 लाख विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार असल्याचेही ते म्हणाले आहेत. 

नागपूर भाजपाचे शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके, माजी महापौर संदिप जोशी, शिक्षण मंचाच्या अध्यक्ष कल्पना पांडे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 14 मे, 2021 रोजी भारतीय जनता युवा मोर्चाने नागपूर विद्यापीठाला काही मागण्याची पूर्तता जसे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शुल्क माफी करण्याची विनंती केली होती. त्यात परीक्षा शुल्क, महाविद्यालयातील ऑनलाईन सत्रांचे शुल्क, महाविद्यालयीन विद्यार्थी वापरत नसलेली महाविद्यालयातील संसाधने जसे जिम, पार्किंग, लेबॉरेटरीज, इत्यादींचा समावेश आहे. काही महाविद्यालयांतील व्यवस्थापन विद्यार्थ्यांना शुल्क पूर्ण भरले नसल्याने परीक्षा अर्ज भरण्याची परवानगी देत नव्हते म्हणून, यासाठी विद्यापीठाने विद्यार्थ्यांना विविध हप्त्यांमध्ये शुल्क भरण्याची मुभा द्यावी, ही विनंती देखील यावेळी भाजप युवा मोर्चाने नागपूर विद्यापीठाकडे केली आहे.

कल्याण देशपांडे यांनी सांगितले की, "कोरोना विषाणूच्या या जिवघेण्या महामारीने अनेक पालकांच्या नोकऱ्या घालवल्या, अनेकांचे व्यवसाय चौपट केले. त्यामुळे पालकांना महाविद्यालयांचे शुल्क भरण्यास फार कष्टाला सामोरे जावे लागले आहे. भाजप युवा मोर्चाने नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू यांच्याशी याबाबत चर्चा केली आणि पालकांना शुल्क भरताना होत असलेल्या त्रासाची त्यांना जाणीव करुन दिली."

भाजप युवा मोर्चाद्वारे केल्या गेलेल्या विनंतीची विद्यापीठाद्वारे त्वरित दखल घेण्यात आली आणि नागपूर विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या परिक्षांचे आणि हिवाळी सत्राचे शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला. सोबतच विद्यापीठाने विद्यार्थ्यांद्वारे वापरात नसलेली साधनं जसे जिम, पार्किंग, लेबॉरेटरीज इत्यादींच्या शुल्क माफीकरिता समितीचे आयोजन केले आहे. याबाबतीत सदर समिती लवकरात लवकर निर्णय घेईल, असे आश्वासन यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू यांनी दिले.

देशपांडे ह्यांनी माहिती देताना असेही सांगितले की, दिनांक 18 जून, 2021 रोजी यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आणि महाराष्ट्र शासनाच्या जी. आर. नुसार नागपूर विद्यापीठाने विद्यार्थ्यांकरिता निशुल्क जीवन विमा आणि निशुल्क अपघात विमा काढण्याचीही योजना आखली आहे. सदर विम्याची रक्कम ही रूपये तीन लाख इतकी असणार आहे आणि या विमा योजनेचा विद्यापीठाच्या जवळजवळ 500 महाविद्यालयातील साडेतीन ते चार लाख विद्यार्थ्यांना लाभ मिळेल असे दिसून येते. या कारणास्तव भाजप युवा मोर्चाने नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू, प्र-कुलगुरू आणि व्यवस्थापनाचे आभार मानले. तसेच विनंती केली की, कोविड काळात ज्या विद्यार्थ्यांना कोरोनाने ग्रासले होते त्या विद्यार्थ्यांचा आरोग्य विमा काढण्यात यावा. भारतीय जनता युवा मोर्चा हे सदैव विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे असे आश्वासन ही  कल्याण देशपांडे यांनी सदर पत्रकार परिषदेत दिले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indapur News : हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
Benjamin Netanyahu : बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
Badlapur Rape Case : मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
पुण्यात बिल्डरचा तुफान राडा,रहिवाशांना दंडुक्याने मारहाण; महिलांसमोरच अश्लील शिवीगाळ
पुण्यात बिल्डरचा तुफान राडा,रहिवाशांना दंडुक्याने मारहाण; महिलांसमोरच अश्लील शिवीगाळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 PM : 2 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour With Bhai Jagtap MVA Seat Sharing : Mumbai तील कोणत्या आणि कितीजागांसाठी मविआत संघर्ष?Zero Hour Full : मविआचं मुंबईतील जागावाटप ते वाराणसी घटनेवरुन महाराष्ट्रात राजकारणABP Majha Headlines : 9 PM : 2 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indapur News : हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
Benjamin Netanyahu : बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
Badlapur Rape Case : मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
पुण्यात बिल्डरचा तुफान राडा,रहिवाशांना दंडुक्याने मारहाण; महिलांसमोरच अश्लील शिवीगाळ
पुण्यात बिल्डरचा तुफान राडा,रहिवाशांना दंडुक्याने मारहाण; महिलांसमोरच अश्लील शिवीगाळ
मुंबईतील बुलेट ट्रेन, भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा; काम प्रगतीपथावर, पाहा फोटो
मुंबईतील बुलेट ट्रेन, भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा; काम प्रगतीपथावर, पाहा फोटो
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग, पण युट्युबचा कोण माहितीय का?
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग, पण युट्युबचा कोण माहितीय का?
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! मुंबईतील 36 नगरसेवकांची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! मुंबईतील 36 नगरसेवकांची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी
खुशखबर! मध्य वैतरणा धरणातून 26.5 मेगावॉट संकरीत वीजनिर्मिती; वर्षाला सुमारे 9 कोटी रूपयांची होणार बचत
खुशखबर! मध्य वैतरणा धरणातून 26.5 मेगावॉट संकरीत वीजनिर्मिती; वर्षाला सुमारे 9 कोटी रूपयांची होणार बचत
Embed widget