Nagpur : 12 वर्षाच्या मुलीच्या गळ्यावर चाकू ठेऊन 14 वर्षाच्या मुलाने 50 लाखांची खंडणी मागितली, नागपुरातील घक्कादायक प्रकार
Nagpur Crime : एका 14 वर्षाच्या मुलाने 12 वर्षीय मुलीच्या गळ्यावर चाकू ठेऊन घरातून 50 लाखांची खंडणी आण, नाहीतर तुझ्या आई वडिलांची व भावाची हत्या करेन अशी धमकी दिल्याची घटना समोर आली आहे.
नागपूर : गंभीर गुन्ह्यांसाठी नेहमी चर्चेत असलेल्या नागपुरात अल्पवयीन गुन्हेगार गुन्हेगारीत सक्रिय होत असल्याचे गेल्या काही दिवसात सातत्याने समोर येत आहे. आता तर एका 14 वर्षाच्या मुलाने 12 वर्षीय मुलीच्या गळ्यावर चाकू ठेऊन घरातून 50 लाखांची खंडणी आण, नाहीतर तुझ्या आई वडिलांची व भावाची हत्या करेन अशी धमकी दिल्याची घटना समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद जब्बार यांचे नागपूरच्या गंगाबाई घाट जवळ वाहनांच्या स्पेयर पार्टचे मोठे दुकान आहे. तर सिद्धार्थनगर भागात त्यांचे आलिशान घर आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत आरोपी असलेला 14 वर्षीय मुलगा जब्बार यांच्या घरी पाळीव कबुतरांना दाणे टाकण्याचे काम करायचा. त्यामुळे त्याला जब्बार यांच्या चांगल्या आर्थिक परिस्थितीची पूर्ण जाणीव होती. त्याचाच फायदा घेत काही दिवसांपूर्वी 14 वर्षीय आरोपी मुलाने त्याच्या दोन साथीदारांसह जब्बार यांची बारा वर्षे मुलगी मेहंदी क्लासला जात असताना तिच्या गळ्यावर चाकू लावून अडविले. तिघांनी तिचे हात दोरीने बांधत तिला निर्जन ठिकाणी नेले. तुझ्या घरातून 50 लाख रुपये आणून दे, नाहीतर तुझ्या आई वडील आणि भावाला जिवानिशी मारु अशी धमकी दिली.
संबंधित मुलगी या घटनेने पुरती घाबरली, त्यामुळे ती आपल्या घरातून काही रक्कम आपल्याला आणून देईल अशी खात्री पटल्यानंतर तिन्ही आरोपींना त्या मुलीला सोडले. मुलगी घरी परतल्यानंतर खूप घाबरलेली होती. दोन दिवस तिने कोणालाच काहीच सांगितले नाही. मुलीची अवस्था पाहून जब्बार कुटुंबियांनी तिची विश्वासाने विचारपूस केली असता तिने सर्व घटना आई वडिलांना सांगितली.
या घटनेचे गांभीर्य ओळखून जब्बार कुटुंबियानी नागपूरच्या पाचपावली पोलीस स्टेशनमध्ये खंडणी संदर्भातली तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी मुलीने सांगितलेल्या प्रमाणे एका 20 वर्षीय गुन्हेगारास सह 14 वर्षीय मुख्य आरोपी मुलगा आणि आणखी एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. रोज गुन्हेगारीच्या नव्या घटनांमुळे हादरणाऱ्या नागपुरात एका 14 वर्षीय मुलाने हत्येचीची धमकी देऊन 50 लाखाची खंडणी मागितल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर नागपुरात अल्पवयीन नवख्या गुन्हेगारांचा धोका दिवसागणिक वाढत चालल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Yogini Ekadashi 2021 : जीवब्रम्ह ऐक्याची प्राप्ती करून देणारे व्रत म्हणजे, जेष्ठ कृष्ण अर्थात योगिनी एकादशी
- शिवसेनेशी आमचे वैचारिक मतभेद, आमच्यात कधीही शत्रुत्व नव्हतं : देवेंद्र फडणवीस
- Maharashtra Corona Cases : रविवारी राज्यात केवळ 3,378 रुग्णांना डिस्चार्ज तर 9,336 नवीन रुग्ण, 38 शहरं-जिल्ह्यांमध्ये एकही मृत्यू नाही