Mohsin Naqvi Ind vs Pak U19 Asia Cup 2025 Final: मोहसीन नक्वीला टीम इंडिया पुन्हा नडली; आशिया चषकाच्या अंतिम सामन्यानंतर पुन्हा राडा, नेमकं काय घडलं?
Mohsin Naqvi Ind vs Pak U19 Asia Cup 2025 Final: पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) आणि आशियाई क्रिकेट परिषद (एसीसी) चे अध्यक्ष मोहसीन नक्वीचा टीम इंडियाकडून पुन्हा एकदा अपमान करण्यात आला आहे.

Mohsin Naqvi Ind vs Pak U19 Asia Cup 2025 Final: अंडर-19 आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा (Ind vs Pak U19 Asia Cup 2025 Final) पराभव करत जेतेपद पटकावले. 2025 च्या 19 वर्षांखालील आशिया कपच्या (U19 Asia Cup 2025) अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा 191 धावांनी पराभव केला. जेतेपदाच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने समीर मिन्हासच्या धमाकेदार शतकाच्या जोरावर 347 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाचा संघ फक्त 156 धावांवर आटोपला. वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) आणि आयुष म्हात्रे यांच्यासह अन्य खेळाडूंना मोठी खेळी करता आली नाही. दरम्यान, भारत आणि पाकिस्तानच्या अंतिम सामन्यानंतर पुन्हा एकदा राडा झाल्याचं समोर आले.
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) आणि आशियाई क्रिकेट परिषद (एसीसी) चे अध्यक्ष मोहसीन नक्वीचा (Mohsin Naqvi) टीम इंडियाकडून (Team India) पुन्हा एकदा अपमान करण्यात आला आहे. अंडर-19 आशिया कप स्पर्धेतील अंतिम सामन्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी नक्वीकडून पदके स्वीकारण्यास नकार दिला. मोहसीन नक्वी यांनी वैयक्तिकरित्या पाकिस्तान संघाला अंडर-19 आशिया कप ट्रॉफी सादर दिली.
नेमकं काय घडलं? (Mohsin Naqvi Ind vs Pak)
मोहसीन नक्वी अंतिम सामन्यादरम्यान सादरीकरण समारंभात भाग घेण्यासाठी दुबईला पोहोचले होते. मोहसीन नक्वीने पहिली जेतेपद पटकावणाऱ्या पाकिस्तान संघाच्या खेळाडूंना पदके दिली. त्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार फरहान युसूफच्या हातात ट्रॉफी दिली. यादरम्यान, भारतीय खेळाडूंनी मोहसीन नक्वीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि पदके घेण्यासाठी व्यासपीठावर न जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर दुसऱ्या एका अधिकाऱ्यांने भारतीय संघाला पदके दिली. दरम्यान, भारताच्या वरिष्ठ संघाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात पाकिस्तानला पराभूत करत आशिया चषक 2025 पटकावला होता. यावेळी देखील भारतीय संघाने मोहसीन नक्वीच्या हातातून ट्रॉफी घेण्यास नकार दिला होता. यानंतर अपमान सहन न झाल्यामुळे मोहसीन नक्वी आशिया कपची ट्रॉफी घेऊन फरार झाला होता. अद्यापही भारतीय संघाला 2025 च्या आशिया कपची ट्रॉफी मिळालेली नाहीय.
भारत-पाकिस्तानचा अंतिम सामना कसा राहिला? (Ind vs Pak U19 Asia Cup 2025 Final)
अंडर-19 आशिया कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा 191 धावांनी पराभव केला. जेतेपदाच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने समीर मिन्हासच्या धमाकेदार शतकाच्या जोरावर 347 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाचा संघ फक्त 156 धावांवर आटोपला. वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे यांच्यासह अन्य खेळाडूंना मोठी खेळी करता आली नाही. भारताकडून वैभव सूर्यवंशी 10 चेंडूत 26 धावा करून बाद झाला. कर्णधार आयुष म्हात्रे फक्त दोन धावा करू शकला. तर संघातील सहा भारतीय खेळाडू धावांचा दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. 10 व्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या दीपेश देवेंद्रनने 16 चेंडूत 36 धावा करत सर्वाधिक धावा केल्या. पाकिस्तानकडून अली रझा याने 42 धावांत 4 विकेट्स पटकावल्या. मोहम्मद सय्यम, अब्दुल सुभान आणि हुजैफा एहसान यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
पाकिस्तानने दिलेल्या 348 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना, भारताने तिसऱ्याच षटकांत 32 धावांवर पहिली विकेट गमावली. आयुष म्हात्रे सात चेंडूत दोन धावा करून बाद झाला.त्यानंतर आरोन जॉर्ज नऊ चेंडूत 16 धावा करून बाद झाला. यापाठोपाठ वैभव सूर्यवंशी 10 चेंडूत 26 धावा करून बाद झाला, ज्यामध्ये एक चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. भारताच्या एकाही आघाडीच्या फलंदाजाने सातत्यपूर्ण फलंदाजी केली नाही. जलद धावांचा पाठलाग करताना सर्व बाद झाले. वेदांत त्रिवेदी 14 चेंडूत 9, अभिज्ञान कुंडू 20 चेंडूत 13, कनिष्क चौहान 23 चेंडूत 9 आणि खिलन पटेल 23 चेंडूत 19 धावा करून बाद झाला. हेनिल पटेलनंतर दीपेश देवेंद्रनने 36 धावा केल्या.





















