एक्स्प्लोर

Indian Science Congress : चांद्रयान- 3 ची तयारी पूर्ण, जून-जुलैमध्ये लॉंचिंग; इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांची माहिती

चांद्रयान -3 मध्ये वापरण्यात आलेले सॉफ्टवेअर, सेन्सर, तंत्रज्ञान आदी अपग्रेड करण्यात आले आहे. प्रतिकूल परिस्थितीतही चांद्रयाण -3 काम करु शकेल असे नियोजन करण्यात आले असल्याचेही ते म्हणाले.

Indian Science Congress Nagpur : चांद्रयान -3 मिशनची तयारी पूर्ण झाली आहे. सर्व आवश्यक चाचण्यांसह सर्व तयारीही अंतिम टप्प्यात असून लॉंचिंगसाठी अनुकूल स्लॉटची प्रतिक्षा असून येत्या जून ते जुलै दरम्यान चांद्रयान- 3 अंतराळात सोडण्यात येणार असल्याची माहिती इस्रोचे (ISRO) अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी आज नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत दिली. 108 व्या इंडियन सायन्स कॉंग्रेसच्या दुसऱ्या दिवशी आयोजित सत्रानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

चांद्रयान-3 मिशनबद्दल बोलताना सोमनाथ म्हणाले, "यापू्र्वी चांद्रयान 2 प्रमाणे आमचे संशोधनाचे उद्देश सारखेच आहेत. गेल्यावेळी ज्या चुका झाल्या त्या टाळून यानाचे सुरक्षित लॅन्डिंग आणि लॅन्डिंगनंतर रोटर सुरक्षित रित्या बाहेर निघावे याकडे विशेष भर देण्यात आला आहे. त्यामुळे जून-जुलैमध्ये ते सोडणार असल्याचे एस. सोमनाथ म्हणाले. तसेच चांद्रयान-3 चाही उद्देश सारखाच असून चांद्रयान-3 मध्ये वापरण्यात आलेले सॉफ्टवेअर, सेन्सर, तंत्रज्ञान आदी अपग्रेड करण्यात आले आहे. प्रतिकूल परिस्थितीतही चांद्रयान-3 काम करु शकेल असे नियोजन करण्यात आले असल्याचेही ते म्हणाले. तसेच, मंगळयानाची घोषणा एका महिन्यात होणार आहे. मात्र, शुक्रयान-1 मिशन हा विषय सध्या संकल्पेपुरता असून त्याबाबत दोन समिती तयार करण्यात आलेल्या आहेत. त्या सरकारसमोर आपले तथ्थ मांडणार असल्याची माहिती दिली.

देशाच्या अंतराळ धोरणासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज!

अंतराळ कार्यक्रम आणि योजनांमध्ये खासगी संस्थांचा सहभाग, त्यांच्या जबाबदारी निश्चित करणे, विविध योजना आणि कार्यक्रमांमधील भूमिका, तसेच देशाच्या विकासातून स्पेस तंत्रज्ञानाचा वापर यावर आधारित नवे अंतराळ धोरण (Space Policy) तयार झाल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी दिली. मात्र, याचवेळी धोरण तयार करुन सरकारकडे सुपूर्द करण्याची प्रक्रिया आम्ही पूर्ण केली, आता फक्त त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आवश्यक असल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी केले. 

स्पेस डेव्हलपमेंटमध्ये खासगी भागीदारी

एस. सोमनाथ म्हणाले, गेल्या 60 वर्षांमध्ये इस्रोने अंतराळात मोठी प्रगती केली आहे. आता त्यात खासगी संस्थांची भागीदारी आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, हे करत असताना, काही कायदे, काही जबाबदाऱ्या आणि निश्चित धोरण ठरवावे लागणार आहे. त्याचा मसुदा तयार करण्यात आला आहे. तो मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे. येत्या एक ते दोन दिवसात त्याला मान्यता मिळण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. 

2023च्या शेवटी मानवरहित यान जाणार अंतराळात

गगनयान हे मानवरहित (अनमॅन्ड मिशन ) यान या वर्षीच्या शेवटी अंतराळात पाठवण्यावर भर आहे. साधारणत गगनयानच्या पूर्व तयारीसाठी जगात दहा वर्षाचा कालावधी लागतो. भारताने ते चार वर्षांत पूर्ण करण्याचे लक्ष्य हातात घेतले आहे. त्यासाठी चार चाचण्या घेण्यात येणार असून त्यापैकी दोन चाचण्या सध्या हाती घेण्यात आलेल्या आहे. त्यातही एक मानवरहित तर एक अंतराळविरासह पूर्ण केली जाणार आहे. मात्र, म्हणजे मानवरहित यान असल्याने त्याबाबत सावधगिरीने पुढे जात आहे. त्यासाठी रशिया आणि अमेरिकेतील तंत्रज्ञानाचीही मदत घेण्यात येत असून वातावरण नियंत्रण आणि जीवनरक्षक व्यवस्थाही तपासण्यात येत आहे. त्यामुळे ते थोडे खर्चिक असल्याचे ते म्हणाले.

अंतराळातील बंद पडलेल्या उपग्रहाबाबतही काम सुरु

1960 दरम्यान करण्यात येणाऱ्या आंतराळातील मिशनमध्ये पूर्वीचे सोडलेल्या बंद पडलेल्या उपग्रहांचा कचरा ( space debris) नव्हता. मात्र सध्या जगभरातून अंतराळात उपग्रह सोडण्यात येतात. काही मिशन फेल झाल्यास त्या उपग्रहांचा कचरा (Space junk) पृथ्वीभोवती फिरतो. या बंद पडलेल्या उपग्रहांचा त्रास नवीन मिशन दरम्यान येतो. आज अंतराळामध्ये असलेले 80 टक्के सॅटेलाईट हे कामाचे नसून त्याचा कचरा नष्ट होण्यासाठी अडीच ते तीन हजार वर्ष लागतात. त्यामुळे अंतराळ तज्ज्ञांसाठी मोठी समस्या आहे. त्यामुळे सॅटेलाईट सोडताना वा अंतराळात फिरताना बरीच काळजी घ्यावी लागते. याची विल्हेवाट लावण्याबाबत अद्याप कुठलीही पर्याप्त यंत्रणा अस्तित्वात नसल्याने ती जगभरातील देशांसाठी डोकदुखी ठरत आहे. हा सॅटेलाईट कचरा सात किलोमीटर वेगाने फिरत असल्याने त्यातून अनेकवेळा नव्या स्पेस मिशनमध्येही अडचणी येऊन सोडण्यात आलेले उपग्रहांचे नुकसान होते. मात्र, आता खासगी संस्था त्यात सहभागी होण्यास इच्छुक असून त्यातील काही सॅटेलाईट अंतराळाबाहेर काही नष्ट करण्याचे काम हाती घेईल असेही ते म्हणाले. 

देशातील दुसऱ्या सॅटेलाईल लॉन्च स्टेशनसाठी जमीन अधिग्रहण सुरु

तामिळनाडू येथे सुरु करण्यात येणाऱ्या दुसऱ्या प्रक्षेपण स्थानकासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून उभारणीसाठीचा संपूर्ण आराखडा तयार असल्याचीही माहिती एस.सोमनाथ यांनी दिली. तसेच एकवेळा जमीन अधिग्रहण झाल्यास आणि प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच त्याचे काम सुरु करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी त्यांनी दिली.

ही बातमी देखील वाचा...

इस्त्रोची माहिती देणारी गाडी 'स्पेस ऑन व्हिल्स' ; इंडियन सायन्स काँग्रेसमधील विशेष आकर्षण

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जोस द बॉस.... बाजीगर बटलरचं  झंझावती शतक, राजस्थानचा केकेआरवर सनसनाटी विजय!
जोस द बॉस.... बाजीगर बटलरचं  झंझावती शतक, राजस्थानचा केकेआरवर सनसनाटी विजय!
यंदा गुजरात होणार चॅम्पियन, आरसीबी 2029 मध्ये उंचावणार चषक, AI नं जारी केली विजेत्याची लिस्ट 
यंदा गुजरात होणार चॅम्पियन, आरसीबी 2029 मध्ये उंचावणार चषक, AI नं जारी केली विजेत्याची लिस्ट 
मोठी बातमी: ठाकरेंचा हमखास निवडून येणारा उमेदवार संकटात, ओमराजे निंबाळकरांच्या उमेदवारी अर्जात मोठी चूक, अर्ज बाद होण्याची भीती
मोठी बातमी: ठाकरेंचा हमखास निवडून येणारा उमेदवार संकटात, ओमराजे निंबाळकरांच्या उमेदवारी अर्जात मोठी चूक, अर्ज बाद होण्याची भीती
Sangli Loksabha: विशाल पाटलांसाठी सत्यजित तांबे मैदानात उतरले, वसंतदादांचा वारसा सांगत म्हणाले...
विशाल पाटलांसाठी सत्यजित तांबे मैदानात उतरले, वसंतदादांचा वारसा सांगत म्हणाले...
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Special report BJP Jahirnama:काँग्रेस, भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध,प्रादेशिक पक्षांचे जाहीरनामे कधी ?Uddhav Thackeray :शिवसेना ठाकरे गटाचं मशाल गीत प्रदर्शित ABP MajhaMaharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 16 April 2024Vaishali Darekar Kalyan Loksabha : वैशाली दरेकरांच्या प्रचार रॅलीत गणपत गायकवाडांच्या पत्नी सहभागी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जोस द बॉस.... बाजीगर बटलरचं  झंझावती शतक, राजस्थानचा केकेआरवर सनसनाटी विजय!
जोस द बॉस.... बाजीगर बटलरचं  झंझावती शतक, राजस्थानचा केकेआरवर सनसनाटी विजय!
यंदा गुजरात होणार चॅम्पियन, आरसीबी 2029 मध्ये उंचावणार चषक, AI नं जारी केली विजेत्याची लिस्ट 
यंदा गुजरात होणार चॅम्पियन, आरसीबी 2029 मध्ये उंचावणार चषक, AI नं जारी केली विजेत्याची लिस्ट 
मोठी बातमी: ठाकरेंचा हमखास निवडून येणारा उमेदवार संकटात, ओमराजे निंबाळकरांच्या उमेदवारी अर्जात मोठी चूक, अर्ज बाद होण्याची भीती
मोठी बातमी: ठाकरेंचा हमखास निवडून येणारा उमेदवार संकटात, ओमराजे निंबाळकरांच्या उमेदवारी अर्जात मोठी चूक, अर्ज बाद होण्याची भीती
Sangli Loksabha: विशाल पाटलांसाठी सत्यजित तांबे मैदानात उतरले, वसंतदादांचा वारसा सांगत म्हणाले...
विशाल पाटलांसाठी सत्यजित तांबे मैदानात उतरले, वसंतदादांचा वारसा सांगत म्हणाले...
Kalyan Loksabha: कल्याणमध्ये भाजप आमदाराची पत्नी वैशाली दरेकरांच्या प्रचारात, गावभर बोभाटा होताच म्हणाल्या...
कल्याणमध्ये भाजप आमदाराची पत्नी वैशाली दरेकरांच्या प्रचारात, गावभर बोभाटा होताच म्हणाल्या...
ABP C-Voter Survey : नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील मतदारसंघात कोण गुलाल उधळणार? एबीपी माझाचा ओपिनियन पोल काय सांगतो?
नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील मतदारसंघात कोण गुलाल उधळणार? एबीपी माझाचा ओपिनियन पोल काय सांगतो?
नारायणचं वादळी शतक, कोलकात्याचं राजस्थानसमोर 224 धावांचं आव्हान
नारायणचं वादळी शतक, कोलकात्याचं राजस्थानसमोर 224 धावांचं आव्हान
ABP Majha C voter opinion poll: मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा झटका, एकाही जागेवर विजय नाही; भाजप-शिंदे गट क्लीन स्वीप देणार?
मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा झटका, एकाही जागेवर विजय नाही; भाजप-शिंदे गट क्लीन स्वीप देणार?
Embed widget