Nagpur News : 'आपले गुरूजी' चा फोटो झळकणार वर्गात, राज्य सरकारच्या निर्णयाचा विरोध
शिक्षकांचा खरा सन्मान करायचा असल्यास त्यांना त्यांचे हक्क द्या. अनेक शैक्षणिक संस्थांकडून शिक्षकांची आर्थिक लुट केली जाते. राज्य सरकारचा हा निर्णय फक्त आभासी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न आहे.
नागपूर: 'गुरूजी' म्हटले की सर्व विद्यार्थ्यांना आदर्शवत असतात. प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांचे गुरूजी (Teacher) प्रिय तर असतातच आदर्शही असतात. त्यांच्याबद्दलची आत्मियता लपून राहीलेली नाही. म्हणूनच आज जगात नावाजलेले व्यक्ती आपल्या गुरूंचा अभिमानाने उल्लेख करतात. अशा गुरूंचा सन्मान तर व्हावाच, किंबहूना काही गुरूजी त्यांच्या आदर्शवत अशा प्रतिमेला डागाळत आहे. असा दुहेरी हेतू असावा, या भूमिकेतून राज्यातील शाळांमध्ये 'आपले गुरूजी' शिक्षक सन्मान (Aple Guruji) प्रयोग राबविला जाणार आहे. राज्य सरकारने (State Government) राज्यातील सर्व शाळांमध्ये प्रत्येक वर्गात वर्गशिक्षक असलेल्या 'गुरूजीं'फोटो लावण्याचे निदेंश दिले आहेत. त्यामुळे आतापर्यंत शाळा, वर्गात लागणाऱ्या महापुरूष, राष्ट्रपती व पंतप्रधानांच्या फोटोंसोबत वर्गशिक्षक असलेल्या गुरूजींचा फोटोही लागेल. देशात अशाप्रकारचा गुरूजींचा सन्मान करणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य असेल.
राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानंतर शिक्षण आयुक्तांनी सर्व विभागाच्या उपसंचालकांना सर्व शाळांमध्ये 'आपले गुरुजी' शिक्षकांचा सन्मान अंतर्गत प्रत्येक वर्गात 'वर्ग शिक्षकाचा' फोटो लावण्याच्या सूचना केल्या आहेत. यामुळे आता प्रत्येक वर्गात वर्गशिक्षकाचा फोटो लागेल. याबाबतचे आदेश विभागीय उपसंचालकांकडून 25 ऑगस्ट रोजी काढण्यात आले. जिल्हा स्तरावरून त्याच दिवशी सर्व शाळांना या आदेशाचे पत्र प्राप्त झाले आहेत.
'ए फोर' आकाराचा फोटो
आदेशानुसार, वर्ग शिक्षकांचा 'ए' फोर साइज फोटो दर्शनी भागात प्रदर्शित करायचा आहेत. शिवाय या निर्णयाची अंमलबजावणी, किती शाळेत झाली यासंबंधीचा अहवाल 2 आठवडयात शिक्षणाधिकाऱ्यांनी सादर करावा असेही आदेशात म्हटले आहे. 'आपले गुरुजी' शिक्षकांचा सन्मान अंतर्गत सगळया शाळांना पत्रे पाठविली जात आहेत. यामागे सरकारचा दुहेरी हेतू असल्याचे मानले जात आहे.
सरकारचा मनसुबा काय?
'आपले गुरुजी' शिक्षकांचा सन्मान या उद्देशातंर्गत कामचुकार शिक्षकांना शिस्त लागेल अशी चर्चा मंत्रीमंडळाच्या बैठकीत झाली होती. त्यानुसार ज्या त्या वर्गात संबंधित शिक्षकांचे फोटो दर्शनी भागात प्रदर्शित करावेत असा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाने सूचना केल्या आहेत. दुसरीकडे यामुळे शिक्षकांचा सन्मान होणार असाही विचार व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयांमध्ये राष्ट्रपती व पंतप्रधानांचे फोटोंसह महापुरुषांचे फोटो लावता येत होते. मात्र सरकारच्या आदेशामुळे प्रत्येक वर्गांत महान व्यक्तींसोबतच वर्ग शिक्षकांचा देखील फोटो लागेल. या निर्णयातून सरकारचा नेमका मनसुबा काय? हे संभ्रम निर्माण करणारा आहे.
वादग्रस्त निर्णय, शिक्षक परिषदेचा विरोध
शिक्षकांचा फोटो वर्गात लावण्याबाबतचा निर्णय शिक्षक व संघटनांशी चर्चा न करता शिक्षण विभागाने घोषित केला. या निर्णयास शिक्षक परिषदेने विरोध केला आहे. शिक्षकांचा सन्मान करण्याच्या नावाखाली त्यांच्यावर अविश्वास दाखविण्याबाबतचा हास्यास्पद निर्णय आहे. या निर्णयाच्या विरोधाचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच संबंधित विभाग अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. हा निर्णय तातडीने रद्द करावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे विभाग कार्यवाह योगेश बन यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
RTMNU : नागपूर विद्यापीठातून 'एमकेसीएल' आऊट, कुलगुरूंच्या भूमिकेची उच्चस्तरीय चौकशी
Ganesh Chaturthi Nagpur : शहरात गणेश विसर्जनासाठी 350 कृत्रिम तलाव, जाणून घ्या आपल्या घराजवळे विसर्जनस्थळ
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI