एक्स्प्लोर

Ganesh Chaturthi Nagpur : शहरात गणेश विसर्जनासाठी 350 कृत्रिम तलाव, जाणून घ्या आपल्या घराजवळे विसर्जनस्थळ

यंदा गणेश विसर्जनासाठी 350 कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. शहरात झोननिहाय विविध भागात, कृत्रिम तलावाची व्यवस्था केली आहे. तसेच चौकाचौकात व मैदानात कृत्रिम तलाव लावण्यात येणार आहेत.

नागपूरः  बुधवारपासून सुरू होणाऱ्या गणेशउत्सवानिमीत्त (Ganesh Chaturthi), नागपूर महानगरपालिकेतर्फे (NMC) शहरात झोननिहाय गणेशविसर्जनासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी गणेशमूर्तीचे विसर्जन आपल्या परिसरातील कृत्रिम तलावातच करावे असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे; यंदा गणेश विसर्जनासाठी 350 कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. शहरात झोननिहाय विविध भागात, कृत्रिम तलावाची व्यवस्था केली आहे. तसेच चौकाचौकात व मैदानात कृत्रिम तलाव लावण्यात येणार आहेत. शहरातील फुटाळा (Futala), सोनेगाव (Sonegaon), सक्करदरा (Sakkardara) आणि गांधीसागर (Gandhisagar) या प्रमुख तलावासोबतच अन्य तलावावर लोखंडी टँकची व्यवस्था करण्यात येणार आहे. कृत्रिम तलावाच्या ठिकाणी विसर्जनासोबतच निर्माल्य संकलनासाठी कलश ठेवण्यात आले आहेत. मनपाचे कर्मचारी व स्वयंसेवक निर्माल्य संकलन करणार आहेत. कृत्रिम तलावाच्या ठिकाणी मजबूत लोखंडी बॅरिकेटिंग करण्यात येईल. याशिवाय विसर्जन परिसरात हायमास्ट लाइट लागतील. जागोजागी निर्माल्य कलश ठेवण्यात येतील.

झोननिहाय कृत्रिम तलावाची संख्या

लक्ष्मीनगर- 34
धरमपेठ- 63
हनुमाननगर - 44
धंतोली- 36
नेहरूनगर - 44
गांधीबाग- 38
सतरंजीपुरा- 26
लकडगंज- 20
आशीनगर - 13
मंगळवारी- 32

झोननिहाय कृत्रिम तलावाची व्यवस्था

लक्ष्मीनगर झोन

अजनी चौक राजीव गांधी पुतळ्याजवळ, धंतोली बगीचा, व्हॉलिबॉल मैदान पूर्व लक्ष्मीनगर, उज्ज्वलनगर दुर्गा मैदान, छत्रपतीनगर, हनुमान मंदिर, सोनेगाव तलावाजवळ, एमआयजी त्रिमूर्तीनगर, एनआयटी कॉलनी, प्रतापनगर, स्केटिंग ग्राऊंड, ऑर्बिटल वसाहत एकात्मतानगर जयताळा, राजेंद्रनगर मैदान

धरमपेठ झोन

धाबा हनुमान मंदिर, नीम पार्क फ्रेंड्स कॉलनी, अंबाझरी ओव्हर फ्लोर, फुटाळा तलाव ग्राऊंड, रामनगर नीट, माधवनगर, टिळकनगर ग्राऊंड, रविनगर वसाहत, रामदासपेठ लेंड्रा पार्क, किरणनगर ग्राऊंड, विष्णू की रसोई, शिवाजीनगर सभागृह, चिल्ड्रन पार्क, यशवंत स्टेडियम.

हनुमाननगर झोन

म्हाळगीनगर मनपा शाळा, नंदलाल साहू सांस्कृतिक सभागृहजवळ, नासरे सभागृहाच्या मागे, नरसाळा, संभाजीनगर पाण्याची टाकी, तुकडोजी चौक, राजीव गांधी पार्क, कांबळे यांच्या घराजवळ कबड्डी मैदान गणेशनगर, रेशीमबाग ,चंदननगर राममंदिर, सिद्धेश्वर सभागृह, मानेवाडा चौक, लाडीकर ले-आऊट, अयोध्यानगर साईमंदिर, गजानन शाळेजवळ, मानेवाडा चौक, अभयनगर, रिंग रोड लव-कुशनगर, हुडकेश्वर पोलीस स्टेशन रोड, उदयनगर चौक.

धंतोली झोन

आग्याराम देवी चौक, बालभवन पार्क आतमध्ये, मॉडेल मिल चौक, गणपती मंदिर गांधीसागर तलावाच्या बाजूला, झुलेलाल मंदिराच्या आतमध्ये, गरम पाणी रोड झुंबरजवळ, अजनी पोलीस स्टेशन, मानवता शाळेजवळ, भगवाननगर, बालाजीनगर, रामकृष्ण सोसायटी समाजभवन, महाजन आटा चक्की, चिचभवन कॉर्पोरेशन शाळेजवळ

नेहरूनगर झोन

दामोदर लॉन खरबी रोड, चैतन्येश्वर रोड नागोबा मंदिर, मनपा शाळा वाठोडा, संघर्षनगर शीतला माता मंदिर, वूमन्स कॉलेज, गुरुदेवनगर बगीचा, सद्भावनानगर, शंकर मूर्ती नंदनवन, किशोर कुमेरिया यांच्या ऑफिसजवळ, रेखा साकोरे यांच्या ऑफिसजवळ, सहकारनगर, योगेश्वरनगर, कीर्तीनगर महाकाळकर कॉम्प्लेक्स, सक्करदरा लेक गार्डन, सक्करदरा तलावाजवळ, बॉलिवूड सेंटर पॉर्इंट, महाकाळकर सभागृह, आशीर्वादनगर.

गांधीबाग झोन

काशीबाई देऊळ संत गुलाबबाबा, हेडगेवार यांच्या घराजवळ, शिवाजी पुतळा गडकरी वाड्यासमोर, भोसले विहार कॉलनी, टिळक पुतळ्याजवळ, चिटणवीसपुरा शाळेजवळ, चिटणीस पार्कजवळ, गांधीबाग उद्यानाजवळ, गंगोत्री बार हॉटेलजवळ, लाल शाळेजवळ गीतांजली, मारवाडी चाल, गांधीबाग भावसार चौक, इतवारी होलसेल मार्केट, चंद्रहास बीअर बारजवळ लाकडी पुलाजवळ, हनुमान चौक.

सतरंजीपुरा झोन

मंगळवारी तलाव परिसर, नाईक तलाव परिसर

लकडगंज झोन

तुकारामनगर हनुमान मंदिर नगर चौक गोतमारे यांच्या घराजवळ कळमना, तलमले ले-आऊट, नेताजी सुभाषचंद्र बोस शाळेमागे, प्रजापतीनगर, सरदार पटेल ग्राऊंड, फुले समाजभवन हिवरीनगर, शिवमंदिर हिवरीनगर, व्यंकटेश कॉलनी, आरटीओ मैदान डिप्टी सिग्नल, सूर्यनगर हनुमान मंदिर, सुभाषनगर पवनसूत हनुमान मंदिर, अण्णा भाऊ साठे मैदान, मानकर वाडी, लाल शाळा पारडी.

आशीनगर झोन

समतानगर नाल्याच्या पुलाजवळ, बारुद कंपनी मंदिरजवळ नांदेड सहयोगनगर, विनोबा भावेनगर, शिवाजी चौक यशोधरानगर शीतला माता मंदिर महेंद्रनगर, महर्षी दयानंद पार्क, बुद्ध पार्क, गुरू नानक पुरा बगीच्याजवळ.

मंगळवारी झोन

सिंधूनगर सोसायटी जरीपटका, आंबेडकर पार्क अमरज्योतीनगर, नारा गाव, पोलीस लाईन टाकळी तलाव, राठी मैदान झिंगाबाई टाकळी, गोरेवाडा तलाव.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मविआचा 96 : 96 : 96 फॉर्म्युला चर्चेत, मित्रपक्षाचा विधानसभेला 12 जागांचा प्रस्ताव, लोकसभेच्या मदतीची परतफेड होणार?
लोकसभेला केलेल्या मदतीचा दाखला, मित्रपक्षानं विधानसभेसाठी मविआकडे दिला 12 जागांचा प्रस्ताव
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Maharashtra Legislative Council : विधानपरिषदेचं पहिलं अधिवेशन कधी अन् कुठं झालं? वरिष्ठ सभागृह विसर्जित का होत नाही? जाणून घ्या
विधानसभेप्रमाणं विधानपरिषद विसर्जित का होत नाही? सदस्यसंख्या ते रचना, जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं
Mumbai Crime: परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
Advertisement
metaverse

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 08 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 26 June 2024 : ABP MajhaMahalakshmi Race Course वर थीम पार्कचा मार्ग मोकळा,120 एकर जागा BMC ला देण्यास मंजुरीMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 26 June 2024Shivnath Darade on Election : मुंबई शिक्षक मतदारसंघात महायुतीत चढाओढ, शिवनाथ दराडे Exclusive

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मविआचा 96 : 96 : 96 फॉर्म्युला चर्चेत, मित्रपक्षाचा विधानसभेला 12 जागांचा प्रस्ताव, लोकसभेच्या मदतीची परतफेड होणार?
लोकसभेला केलेल्या मदतीचा दाखला, मित्रपक्षानं विधानसभेसाठी मविआकडे दिला 12 जागांचा प्रस्ताव
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Maharashtra Legislative Council : विधानपरिषदेचं पहिलं अधिवेशन कधी अन् कुठं झालं? वरिष्ठ सभागृह विसर्जित का होत नाही? जाणून घ्या
विधानसभेप्रमाणं विधानपरिषद विसर्जित का होत नाही? सदस्यसंख्या ते रचना, जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं
Mumbai Crime: परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
Embed widget