एक्स्प्लोर

Ganesh Naik : या भस्मासुरांनी 10 वर्षे लुटल्यानेच महाराष्ट्र मागे राहिला, यांची जागा जेलमध्ये; गणेश नाईकांचा शिंदे पिता-पुत्रांवर वार

Ganesh Naik Vs Eknath Shinde : पक्षाने आपल्याला मोकळीक दिली तर शिंदे पिता-पुत्राचं अस्तित्व संपवून टाकू असा इशारा वनमंत्री गणेश नाईक यांनी दिला. 

नवी मुंबई : महापालिका निवडणूक संपली असली तरी गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वाद तसाच धुसमसत आहे. माझ्या नादी लागाल तर माजी खासदार करेन असा इशारा भाजपचे मंत्री गणेश नाईकांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना दिला. या भस्मासुरांनी 10 वर्षे महाराष्ट्राला लुटलं, यांची जागा जेलमध्ये असल्याची घणाघाती टीका गणेश नाईकांनी केली. गणेश नाईकांच्या या टीकेवर खासदार श्रीकांत शिंदे यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. 

वनमंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदेवर सडकून टिका केली आहे. माझ्या नादाला लागाल तर श्रीकांत शिंदेंना माजी खासदार करून टाकेन असं ते म्हणाले. तर तुमच्यात जास्त खुमखुमी असेल तर ठाणे किंवा कल्याणमधून खासदारकी लढवा असं आव्हान श्रीकांत शिंदे यांनी दिलं. 

पक्षाने मोकळीक द्यावी, अस्तित्व संपवतो

गणेश नाईक म्हणाले की, "एकनाथ शिंदे यांच्या हातात ठाणे, पालघरमधील एकही महानगरपालिका जाऊ देणार नाही. पक्षाने मला फक्त मोकळीक दिली पाहिजे, यांचे अस्तित्व संपवून टाकेन. हे भस्मासूर, बकासूर असून यांनी महाराष्ट्र लुटून खाल्ल्याने राज्य 10 वर्ष मागे गेले आहे. यांनी केलेले पाप लक्षात आल्यास यांची जागा जेलमध्ये असेल."

श्रीकांत शिंदेंचा पलटवार

श्रीकांत शिंदे यांनी मंत्री गणेश नाईक यांचा खरपूस भाषेत समाचार घेतला. वयाच्या हिशोबाने आजार होत असतात. यामध्ये विसरभोळेपणा, चिडचिड, दिशाभूल असे आजार होत असतात. हे मी सांगू शकतो कारण मी डॉक्टर आहे असा टोला खासदार शिंदे यांनी मंत्री गणेश नाईक यांना लगावला.

जर जास्त खुमखुमी असेल तर गणेश नाईकांनी ठाणे किंवा कल्याण लोकसभा मतदारसंघातून लढून दाखवावं असं आव्हान श्रीकांत शिंदेंनी दिलं. त्यामुळे आता मंत्री गणेश नाईक विरुद्ध खासदार श्रीकांत शिंदे हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

उदय सामंत यांची टीका

मंत्री गणेश नाईक यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर बोलल्यानंतर प्रसिद्धी मिळत असावी असा टोला शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी लगावला. गणेश नाईक यांना आक्षेप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबाबत आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंबाबत आहे, त्यांनी एकदा स्पष्ट करावं असंही उदय सामंत यांनी म्हंटलं. 

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup Prize Money: T20 विश्वचषक अंतिम सामन्याची उत्सुकता शिगेला! जिंकणाऱ्या संघाला किती कोटी? पराभूत संघालाही भरघोस बक्षीस
भारत -न्यूझीलंड T20 विश्वचषक अंतिम सामन्याची उत्सुकता शिगेला! जिंकणाऱ्या संघाला किती कोटी? पराभूत संघालाही भरघोस बक्षीस
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
Maharashtra Live blog updates: भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचं किल्ले शिवनेरीवरून वादग्रस्त विधान
Maharashtra Live blog updates: भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचं किल्ले शिवनेरीवरून वादग्रस्त विधान
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup Prize Money: T20 विश्वचषक अंतिम सामन्याची उत्सुकता शिगेला! जिंकणाऱ्या संघाला किती कोटी? पराभूत संघालाही भरघोस बक्षीस
भारत -न्यूझीलंड T20 विश्वचषक अंतिम सामन्याची उत्सुकता शिगेला! जिंकणाऱ्या संघाला किती कोटी? पराभूत संघालाही भरघोस बक्षीस
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
Maharashtra Live blog updates: भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचं किल्ले शिवनेरीवरून वादग्रस्त विधान
Maharashtra Live blog updates: भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचं किल्ले शिवनेरीवरून वादग्रस्त विधान
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
Varun Chakaravarthy Ind Vs NZ ICC T20 World Cup Final 2026: भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
Embed widget