एक्स्प्लोर

NCP OBC Cell Convention : राष्ट्रवादीचं ओबीसी मतदारांवर लक्ष, पक्षाच्या ओबीसी सेलचे नागपुरात दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबीर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेलचे दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबीर नागपुरात होत आहे. फक्त मराठ्यांचा पक्ष अशी आजवरची प्रतिमा असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता ओबीसी मतांसाठी गांभीर्याने प्रयत्न करत असल्याचे त्यामुळे समोर आले आहे.

NCP OBC Cell Convention : व्यापारांचा पक्ष अशी ओळख असलेल्या भाजपने प्रयत्न करुन इतर सर्व समाज घटकांमध्ये आपले पाय रोवले. खास करुन ओबीसी समाजातील विविध जातींना स्वतःसोबत जोडल्यामुळे भाजप देशासह महाराष्ट्रातही सत्तेत आला. तर फक्त मराठ्यांचा पक्ष अशी आजवरची प्रतिमा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही (NCP) विस्तारासाठी गांभीर्याने प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने ओबीसी मतदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे राज्यस्तरीय अधिवेशन विदर्भात (Vidarbha)ठेवून राष्ट्रवादीने ओबीसी मतदारांच्या (OBC Voters) माध्यमातून पक्ष विदर्भात आपले पाय मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दाखवून दिले आहे.

प्रत्येक पक्षाला तयारी करावी लागते, कार्यकर्त्यांना अलर्ट ठेवावे लागते, ओबीसी शिबिराच्या माध्यमातून आम्ही आमच्या कार्यकर्त्यांसमोर ओबीसीचे विविध मुद्दे मांडू, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार म्हणाले. 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी मतांसाठी विदर्भातूनच का प्रयत्न करत आहे हे समजून घेणंही आवश्यक आहे.

  • विदर्भातील 62 विधानसभा मतदारसंघापैकी किमान 32 विधानसभा मतदारसंघात ओबीसी मतदार निर्णायक.
  • या 32 मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस यांच्यात लढाई
  • या 32 मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप ओबीसी उमेदवारच उतरवतात
  • विदर्भात काँग्रेस आणि भाजपच्या तुलनेत बहुतांशी ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस स्पर्धेतही नाही.
  • ओबीसी मतांमध्ये घुसखोरी केल्याशिवाय विदर्भात पाय रोवणे कठीण असल्याचे नेतृत्वाला कळले आहे

भाजपची राष्ट्रवादीवर टीका

राष्ट्रवादी काँग्रेस विदर्भात ओबीसी मतांमध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसताच भाजपनेही राष्ट्रवादीच्या प्रयत्नांना नौटंकी संबोधन आक्रमक भूमिका घेतली आहे. सत्तेत असताना ओबीसी आरक्षणासाठी काहीही न करणारे अजित पवार, ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक असलेले इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी आवश्यक निधीची फाईल दाबून ठेवणारे अजित पवार, आता ओबीसींसाठी मेळावे घेत असल्याच्या प्रयत्नांची भाजपने खिल्ली उडवली आहे.

'या' गोष्टीची राष्ट्रवादीच्या नेत्यांना भीती

दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यात ओबीसी मतांचं महत्व ओळखून त्यासाठी प्रयत्न सुरु करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेससमोर आणखी एक मोठी अडचण म्हणजे मराठा समाजाच्याया आरक्षणाचा प्रलंबित असलेला प्रश्न. मराठा समाजाला विद्यमान घटनात्मक तरतुदीतून आरक्षण देणे कठीण आहे हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर कळून चुकले आहे. त्यामुळे अनेक संघटनांनी मराठा समाजाला ओबीसी समाजासाठी असलेल्या 27 टक्क्याच्या कोट्यातून आरक्षण द्यावे अशी मागणी पुढे केली आहे. हीच मागणी राष्ट्रवादी काँग्रेससाठी इकडे तिकडे विहीर अशी अवस्था आहे. कारण मराठा मतांसाठी मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्या अशी भूमिका घेतली तर ओबीसी समाजाची नाराजी ओढावू शकते आणि दुसऱ्या बाजूला मराठ्यांच्या आरक्षणासाठी काही केलं नाही तर आजवर हक्काची व्होट बँक मानला जाणारा मराठा समाज राष्ट्रवादीपासून दूर होऊ शकतो, अशी भीती राष्ट्रवादीच्या नेत्यांना आहे.

नागपुरात दोन दिवसांच्या ओबीसी सेलच्या शिबिरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते काय मंथन करतात आणि ओबीसी समाजा संदर्भात पुढचं काय धोरण निश्चित करतात, हे येणाऱ्या दिवसांमध्ये स्पष्ट होईलच. मात्र सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेसने ओबीसी मतांवर लक्ष केंद्रित केल्याचं दिसून येत आहे. असे असले तरी ओबीसी व्होट बँकेत भाजप आणि काँग्रेससारखे कडवे प्रतिस्पर्धी असताना राष्ट्रवादी काँग्रेससाठी ओबीसी मतांची लढाई सोपी नाही हे निश्चित.

VIDEO : Nagpur NCP OBC Cell : नागपुरात आजपासून राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचं शिबीर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut on Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांची दया येते, स्वतःच्या अब्रूचे आणखी किती धिंडवडे फक्त पाहत बसणार? हतबलतेचं दुसरं नाव फडणवीस! संजय राऊतांचा घणाघात
मुख्यमंत्र्यांची दया येते, स्वतःच्या अब्रूचे आणखी किती धिंडवडे फक्त पाहत बसणार? हतबलतेचं दुसरं नाव फडणवीस! संजय राऊतांचा घणाघात
Donald Trump : अमेरिका भारतावर किती टक्के टॅरिफ लावणार? कॅनडावर टॅरिफ लावताना डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे संकेत
अमेरिका भारतावर किती टक्के टॅरिफ लावणार? कॅनडावर टॅरिफ लावताना डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे संकेत
ABP Majha Impact : धनगर विद्यार्थी शाळा भ्रष्टाचार, दोन शाळांची मान्यता रद्द, अधिकाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई
धनगर विद्यार्थी शाळा भ्रष्टाचार, दोन शाळांची मान्यता रद्द, अधिकाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई
Gold Rate : सोने चांदीचे दर या आठवड्यात स्थिरावले, पुढील आठवड्यात दर कसे राहणार, कामा ज्वेलरीचे एमडी कॉलिन शहा म्हणतात..
सोन्याचे दर 97 ते 99  हजारांदरम्यान स्थिरावले, पुढील आठवड्यात दर कसे असणार? कॉलिन शहा म्हणतात...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour Full : ठाकरे गटासाठी राज इन, मविआ आऊट? ठाकरेंना आता काँग्रेस नकोशी झालीये?
Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 10 जुलै 2025
Dhangar Student Scheme : धनगर विद्यार्थ्यांच्या योजनेत घोळ, ABP माझाकडून पोलखोल Special Report
Nishikant Dubey : मुंबईचं मीठ खाऊन महाराष्ट्रावर गरळ,पुन्हा बरळले, वादात अडकले Special Report
Sanjay Shirsat IT Notice : संपत्तीत तफावत, नोटीसची आफत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut on Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांची दया येते, स्वतःच्या अब्रूचे आणखी किती धिंडवडे फक्त पाहत बसणार? हतबलतेचं दुसरं नाव फडणवीस! संजय राऊतांचा घणाघात
मुख्यमंत्र्यांची दया येते, स्वतःच्या अब्रूचे आणखी किती धिंडवडे फक्त पाहत बसणार? हतबलतेचं दुसरं नाव फडणवीस! संजय राऊतांचा घणाघात
Donald Trump : अमेरिका भारतावर किती टक्के टॅरिफ लावणार? कॅनडावर टॅरिफ लावताना डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे संकेत
अमेरिका भारतावर किती टक्के टॅरिफ लावणार? कॅनडावर टॅरिफ लावताना डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे संकेत
ABP Majha Impact : धनगर विद्यार्थी शाळा भ्रष्टाचार, दोन शाळांची मान्यता रद्द, अधिकाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई
धनगर विद्यार्थी शाळा भ्रष्टाचार, दोन शाळांची मान्यता रद्द, अधिकाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई
Gold Rate : सोने चांदीचे दर या आठवड्यात स्थिरावले, पुढील आठवड्यात दर कसे राहणार, कामा ज्वेलरीचे एमडी कॉलिन शहा म्हणतात..
सोन्याचे दर 97 ते 99  हजारांदरम्यान स्थिरावले, पुढील आठवड्यात दर कसे असणार? कॉलिन शहा म्हणतात...
दुबईचा गोल्डन व्हिसा तब्बल 4 कोटींचा व्हिसा अवघ्या 23.30 लाखांवर; मुंबई पुण्याच्या तुलनेत एकदम आवाक्यात आलेल्या दुबईत 1 बीएचकेची किंमत किती?
दुबईचा गोल्डन व्हिसा तब्बल 4 कोटींचा व्हिसा अवघ्या 23.30 लाखांवर; मुंबई पुण्याच्या तुलनेत एकदम आवाक्यात आलेल्या दुबईत 1 बीएचकेची किंमत किती?
Radhika Yadav: आंतरराष्ट्रीय टेनिस खेळाडू असलेल्या लेकीला किचनमध्ये जेवण करतानाच बापानं गोळ्या घातल्या; बापाच्याच शब्दात थरकाप उडवणारी संपूर्ण कहाणी
आंतरराष्ट्रीय टेनिस खेळाडू असलेल्या लेकीला किचनमध्ये जेवण करतानाच बापानं गोळ्या घातल्या; बापाच्याच शब्दात थरकाप उडवणारी संपूर्ण कहाणी
Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांनी राडा केलेल्या अजंता कॅटरर्सचा मालक काय म्हणाला? पोलिसांत तक्रार न करण्यामागचं खरं कारण सांगितलं
संजय गायकवाडांनी राडा केलेल्या अजंता कॅटरर्सचा मालक काय म्हणाला? पोलिसांत तक्रार न करण्यामागचं खरं कारण सांगितलं
तब्बू अभिमान वाटावा अशी मराठी बोलली, आभार व्यक्त करताना महेश मांजरेकरांना मिठी मारली VIDEO
तब्बू अभिमान वाटावा अशी मराठी बोलली, आभार व्यक्त करताना महेश मांजरेकरांना मिठी मारली VIDEO
Embed widget