(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Glamour : माझ्याकडे गॉडफादर अन् गॉडमदर दोघेही, 'फेमिना मिस इंडिया महाराष्ट्र' टायटल विनर दिशाने उलगडले यशाचे रहस्य
'मी मोठी झाल्यावर तुम्ही मला टिव्हीमध्ये बघाल' अशी दिशा नेहमी सांगायची. हेच लहानपणी बघितलेले स्वप्नाच्या पूर्ण करण्याच्या दिशेने ती मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर पुढील वाटचाल करीत आहे.
नागपूरः इच्छाशक्ती, मेहनत करण्याची तयारी आणि टॅलेंट असूनही मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात उंची गाठण्यासाठी गॉडफादर असणे गरजेचे असल्याची या क्षेत्रातील खमंग चर्चा. मात्र स्वतःवर दृढ विश्वास आणि कुटुंबियांची साथ असल्यास तुम्हाला जिंकण्यापासून कोणीच थांबवू शकत नसल्याचा अनुभव नागपूरच्या दिशा पाटीलने (Disha Patil) सांगितला. दिशाने फेमिना मिस इंडिया महाराष्ट्र 2022चा (Femina Miss India Maharashtra 2022) खिताब जिंकला. यासोबतच प्रतिष्ठेच्या होणाऱ्या फेमिना मिस इंडिया 2022मध्ये सहभागी इतर राज्यांच्या 31 स्पर्धकांसोबत स्पर्ध करत महाराष्ट्रचे प्रतिनिधित्वही केली हे विशेष.
वयाच्या अवघ्या 7-8 व्या वर्षी आईने 'बेबी खुबसुरत' नावाच्या एका स्पर्धेत भाग घ्यायला लावले होते. तिला कॅमेऱ्यासमोर येण्याची खूप हौस होती. टिव्हीवरही मॉडेल आणि अभिनेत्रींना बघून 'मोठी झाल्यावर मी त्यांच्यासारखी बनणार आणि तुम्ही मला टिव्हीमध्ये बघाल' अशी ती पालकांना नेहमी सांगायची. हेच लहानपणी बघितलेले स्वप्नाच्या दिशेने दिशा मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर पुढील वाटचाल करीत आहे. मराठी कुटुंबातून आलेली मुलगी या झगमगणाऱ्या क्षेत्रात आपली जागा कशी निर्माण करेल असा विचारही पालकांच्या मनात कधी आला नसून त्यांचे मला मिळणारे सपोर्टच आपल्या यशाचे रहस्य असल्याची भावना तिने एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली.
तिच्यासाठी आई-वडीलच तिचे गॉडफादर अन् गॉडमदर असल्याचे ती म्हणाली. दिशाची आई कवियित्री, गझलकार धनश्री पाटील आहे. तर वडील किशोर पाटील अभियंता आहेत. दिशा नागपूरच्या मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्टीटेक्चरची अंतिम वर्षाची विद्यार्थीनी आहे. शिक्षणासोबतच ती मॉडेलिंग करते. आजवर तिने अनेक पोस्टर शूट, टिव्हीच्या जाहीराती आणि फॅशन शूट केले आहेत. विविध सौंदर्य स्पर्धेत तिने फक्त भाग घेतला नसून विदर्भवासियांना गर्व वाटेल अशी कामगिरी करीत यश खेचून आणले. फेमिना मिस इंडिया 2022 या सौंदर्य स्पर्धेत तिने फेमिना मिस इंडिया महाराष्ट्र 2022 हा टायटल आपल्या नावावर करत शहराच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला.
PHOTO: सनी लिओनीने पुन्हा पसरवली सौंदर्याची जादू, पाहा किलर फोटो!
फेमिना मिस इंडिया 2022चा प्रवास
फेमिना मिस इंडिया ही क्षेत्रातील खूप मोठी सौंदर्य स्पर्धा म्हणून मानण्यात येते. त्याचे ऑडिशन दिशाने मार्च 2022मध्ये दिले. त्यात देशभरातील 31 राज्यातील स्पर्धकांचा समावेश होता. महाराष्ट्र वगळता सर्व राज्यातून 10-11 स्पर्धक होते. मात्र एकट्या महाराष्ट्रातून तब्बल 42 स्पर्धांसोबत दिशाने स्पर्धा करुन फेमिना मिस इंडिया महाराष्ट्र 2022 हा टायटल मिळवला.
31 राज्यातील 31 सौंदर्यवतींसोबत स्पर्धा
स्पर्धेनंतर काही काळासाठी सर्व राज्यातील विजेत्यांचे ऑनलाइन प्रशिक्षण सुरु होते. त्यानंतर त्यांना 24 मे रोजी मुंबईत बोलविण्यात आले. नंतर सर्वांना सुमारे महिनाभर प्रशिक्षण देण्यात आले. या 31 राज्यातील 31 स्पर्धकांमध्ये दिशाने 'टॉप 10' पर्यंत मजल मारली.
PHOTO: हाय थाई स्लिट ड्रेसमध्ये मौनी रॉयचा बोल्ड लूक, पाहा खास फोटो!
'हे' वर्ष ठरले करिअरचे 'टर्निंग पॉइंट'
- तिने पहिल्यांदा 2017मध्ये नागपुरातच 'टाइम्स फ्रेश फेस' या पिजेंटबद्दल ऐकले आणि सहभागी होण्यासाठी नोंदणी केली. स्पर्धेची वाट बघत ती उत्साही होती. कॅमेऱ्यासमोर तिने ऑडिशन दिला नसून मी फक्त एन्जॉय केला अन् माझा आत्मविश्वास वाढला असल्याचे ती म्हणते.
- यानंतर लगेच सकाळ समूहाच्यावतीने आयोजित 'ब्युटी ऑफ महाराष्ट्र'च्या नागपूरच्या ऑडिशनमध्ये भाग घेतला. तिची 'टॉप थ्री'मध्ये तिची निवड झाली आणि तिने पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत शहराचे प्रतिनिधित्व केले.
- 2018मध्येच तिने 'सेंट्रल फॅशन आयकॉन' मध्येही भाग घेतला आणि मुंबई येथे झालेल्या अंतिम स्पर्धेत सेकंड रनरअप ठरली. त्या स्पर्धेच समोर बसलेल्या जजेसला मी आत्मविश्वासाने उत्तर देऊ शकले त्याचा आनंद होता असेही ती म्हणाली.
- 2018मध्येच टाइम्स समूहाच्या श्रावण क्विन स्पर्धेत ती सहभागी झाली. ऑडिशनमधून तिची निवड झाली. नंतर तिला फॅशन क्षेत्रातील दिग्ग्जांद्वारे प्रशिक्षणाची म्हणजेच ग्रुमिंगची संधी मिळाली. त्याद्वारे ती शहरातील विजेता ठरली आणि नंतर मुंबईत झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत तिने टॉप 12 पर्यंत पोहोचून 'मिस ब्युटीफूल स्कीन' हा टायटल मिळवला.
- यानंतर प्रथमच तीला मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकण्याची संधी मटाने दिवाळी अंकात दिली.
- 2019मध्ये झालेल्या फेमिना स्टाइलिस्टा वेस्टच्या टॉप 8 पर्यंत तिने मजल मारली. अभिनेत्री वाणी कपूरच्या हस्ते तिला गौरविण्यात आले.
- यानंतर ऑनलाइन झालेल्या फेमिना मिस इंडियामध्येटी टॉप 5 पर्यंत तिने मजल मारली.
- 2020मध्येच तिने कॅम्पस प्रिंसेसच्या फायनलिस्टपर्यंतही मजल मारली.
- यानंतर 2021मध्ये झालेल्या मिस दिवा या राष्ट्रीय स्पर्धेतही सहभाग नोंदविले.