एक्स्प्लोर
फेसबुकवर प्रेम, नागपुरात प्रियकराच्या साथीने पतीची हत्या
फेसबुकवर ओळख झालेल्या तरुणाशी प्रेमसंबंध जुळल्यानंतर विवाहितेने त्याच्या साथीने पतीची हत्या केली आणि आत्महत्या असल्याचा बनाव रचला. नागपूर पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत
नागपूर : नागपुरात सापडलेल्या 28 वर्षीय तरुणाच्या मृतदेहाचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. फेसबुकवर प्रेमसंबंध जुळलेल्या 21 वर्षीय प्रियकराच्या मदतीने तरुणाच्या पत्नीनेच ही हत्या केल्याचं उघड झालं. आरोपींनी हा प्रकार आत्महत्या असल्याचं भासवलं होतं.
28 वर्षीय शेखर रमेश पौनिकर या तरुणाचा मृतदेह नागपुरातील कुंदनलाल गुप्ता नगरमध्ये आढळला होता. शेखरच्या पत्नीने तिच्या प्रियकराचे मदतीने दोरीने गळा आवळून हत्या केली. त्यानंतर ब्लेडने शेखरच्या हाताची नस कापून ही आत्महत्या केल्याचा बनाव केला होता.
पोलिसांनी 25 वर्षीय रश्मी शेखर पौनिकर आणि तिचा 21 वर्षीय प्रियकर प्रज्ज्वल रणजीत भैसारे यांना बेड्या ठोकल्या आहेत. प्रज्ज्वल आणि रश्मी यांची फेसबुकवर ओळख झाली. मैत्री झाल्यानंतर दोघांचे प्रेमसंबंध जुळले. मात्र यामध्ये अडसर ठरणाऱ्या शेखरचा काटा काढण्याचा कट दोघांनी रचला
शेखरला मद्यपानाची सवय असल्याची संधी रश्मीने साधली. शेखर मंगळवारी रात्री घरी आल्यानंतर रश्मीने त्याला दारु प्यायला दिली. मद्यापानानंतर शेखर शांतपणे झोपला. रश्मीने रात्री दोन वाजताच्या सुमारास प्रियकर प्रज्ज्वलला ब्लेड घेऊन घरी बोलावलं.
प्रज्ज्वल घरी आल्यानंतर दोघांनी आधी शेखरचे हातपाय बांधले. त्याने आवाज करु नये म्हणून तोंडाला चिकटपट्टी लावली. त्यानंतर दोघांनी मिळून दोरीने शेखरचा गळा आवळला.
दोघांनी रात्रीच त्याचा मृतदेह दुचाकीवर ठेवून नामदेवनगर बगिचा जवळ असलेल्या मोकळ्या मैदानात टाकला. आपलं बिंग फुटू नये म्हणून शेखरने आत्महत्या केल्याचा बनाव केला. शेखरच्या हाताची नस कापून त्याच्या डोक्यावर दगड मारला.
दुसऱ्या दिवशी सकाळी शेखरचा मृतदेह सापडल्यानंतर सुरुवातीला हा आत्महत्या असल्याचं वाटलं. मात्र अखेरीस, पोलिसांनी रश्मी आणि प्रज्ज्वलनेच कट रचून हत्या केल्याचं शोधून काढलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
रायगड
भारत
नाशिक
Advertisement