एक्स्प्लोर

Nagpur News :  नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या अडचणीत वाढ? ऑनलाईन परीक्षा आणि निकालावरून चौकशी समितीचा ठपका

Nagpur News : बाविस्कर चौकशी समितीने नागपूर विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा आणि निकाल लावण्याच्या निविदा प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

Nagpur News :  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे (Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University) कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी (Vice Chancellor) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. नागपूर विद्यापीठात एमकेसीएलमार्फत (MKCL) ऑनलाईन परीक्षा घेणे आणि निकाल लावण्याबद्दल केलेली नियुक्ती चौकशी समितीच्या अहवालात नियमबाह्य ठरल्याची माहिती आहे.. त्यामुळे एमकेसीएलचा अट्टाहास धरणाऱ्या कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी (Subhash Chaudhary) यांच्या संदर्भात नियमानुसार कारवाई करावी अशी मागणी भाजप आमदार प्रवीण दटके यांनी केली आहे.

विद्यापीठाचे काम उत्तम शिक्षण देणे, योग्यरीतीने परीक्षा घेणे आणि विद्यार्थ्यांना जीवनात पुढे जाण्यासाठी मदत करणे हे आहे. दुर्दैवाने नागपूर विद्यापीठात तसं काही ही होताना दिसत नाही असा आरोप आमदार दटके यांनी केला आहे. सध्या, नागपूर विद्यापीठात परीक्षेनंतरही अनेक महिने निकाल लागत नाही. त्यामुळे परीक्षा घेण्यासाठी एमकेसीएल हीच एकमेव कंपनी आहे का, कुलगुरू यांनी एमकेसीएल या एकमेव कंपनीचा अट्टाहास का धरला असा सवाल ही प्रवीण दटके यांनी उपस्थित केला आहे. 
 
नागपूर विद्यापीठात परीक्षा घेणे, निकाल लावणे या प्रक्रियेसाठी एमकेसीएल या कंपनीची निविदा मंजूर झाल्यानंतर संपूर्ण निविदा प्रक्रिये संदर्भात आरोप झाले होते. त्यानंतर उच्च तंत्रशिक्षण विभागाने बाविस्कर समितीची नेमणूक केली होती. आता याच बाविस्कर समितीने चौकशी पूर्ण करून आपला अहवाल उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे सोपवला आहे. 

बाविस्कर समितीच्या चौकशी अहवालात याच एमकेसीएल या कंपनीला निविदा देताना नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे, असा ठपका विद्यापीठ प्रशासनावर ठेवण्यात आल्याची माहिती आहे. त्यानंतर भाजपने कुलगुरू सुभाष चौधरी यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. कुलगुरुंवर कारवाई करण्याची मागणी करण्या आली आहे. विद्यापीठासारख्या पवित्र ठिकाणी कायदेशीर पद्धतीनेच निविदा काढल्या पाहिजे. मात्र, नागपूर तसं झालेलं नाही. नागपूर विद्यापीठात नियमांचा उल्लंघन करून निविदा दिल्याचे फक्त एमकेसीएलचेच प्रकरण नाही. तर, इतर अनेक निविदांमध्येही अशाच पद्धतीने नियमांचे उल्लंघन झाले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.  वेगवेगळे विभाग त्याची चौकशी करत आहे. त्यामुळे त्या सर्व प्रकरणांमध्ये ही योग्य चौकशी होऊन कारवाई व्हावी अशी अपेक्षा प्रवीण दटके यांनी व्यक्त केली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget