एक्स्प्लोर

Nagpur School Bus : ट्रक आणि टँकर चालकांच्या संपानंतर आता नागपुरात स्कूल बस संघटनेची संपाची हाक; शाळेत सोडण्यासाठी पालकांची एकच तारांबळ

Nagpur News : ट्रक आणि टँकर चालकांनी पुकारलेल्या संपापाठोपाठ आज नागपुरातील स्कूल बस आणि स्कूल व्हॅन चालकांनी देखील एकदिवसीय लक्षणीय संप पुकारला आहे. त्यामुळे पालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.

 नागपूर :  हिट अँड रन कायद्याविरोधात (Hit and Run New Law) ट्रक आणि टँकर चालकांनी पुकारलेल्या संपापाठोपाठ आज नागपुरातील (Nagpur News) स्कूल बस आणि स्कूल व्हॅन चालकांनी देखील एकदिवसीय लक्षणीय संप पुकारला आहे. परिणामी याचा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसला असून आज सकाळपासून आपल्या पाल्यांना शाळेत ने-आण करण्यासाठी पालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. या एकदिवसीय संपामध्ये  नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील 3 हजाराहून आधिक स्कूल बस आणि 700 हून अधिक स्कूल व्हॅन चालक सहभागी झाले आहेत. आधीच शहरात पेट्रोल टंचाईमुळे नागरिक त्रस्त झाले असताना, आता नव्याने उद्भवलेल्या या समस्यांमुळे विद्यार्थ्यांसह पालकांची डोकेदुखी वाढली आहे.

शालेय विद्यार्थ्यांसह पालकांची कसरत 

मागील दोन दिवसांपासून मालवाहतूकदार, टँकर चालकांचा संप सुरू असल्याने राज्यासह देशात अनेक ठिकाणी इंधनापासून ते भाजीपाला, अत्यावश्यक गोष्टींचा पुरवठा थांबला होता. देशभरात ट्रक चालकांनी संप पुकारल्याने पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याचे चित्र होते. अनेक ठिकाणी पेट्रोलपंप इंधनाअभावी ओस पडले होते. तर, पेट्रोल भरून घेण्यासाठी ठिकठिकाणी पेट्रोल पंपावर रांगाच रांगा लागल्या होत्या.

नागपूर शहरातील जवळ जवळ 75 टक्के पेट्रोल पंप 2 डिसेंबरच्या दुपारपर्यंत कोरडे ठाक झाले होते. तर, उर्वरित साठा रात्रीपर्यंत संपण्याची भीती विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता यांनी व्यक्त केली होती. या संपाची धग तीव्र होत असताना दुसरीकडे केंद्र सरकारने मालवाहतूकदारांच्या संघटनांना चर्चेसाठी बोलावले. या चर्चेत संपाबाबत अखेर तोडगा काढण्यात आला. असे असले तरी नागपुरातील स्कूल बस आणि स्कूल व्हॅन चालकांनी या संपाला पाठिंबा दर्शवत एकदिवसीय आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे बऱ्याच शालेय विद्यार्थ्यांनी आज घरीच राहणे पसंद केल्याचे चित्र आहे. 

इंधन असेपर्यंत सेवा देणार, महाराष्ट्र स्कूल बस असोसिएशनची भूमिका

केंद्रीय गृहसचिवांशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसनं ट्रक आणि टँकरचालकांना त्यांचा देशभरातला संप मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. तर दुसरीकडे स्कूल बसेसला जोपर्यंत डिझेल मिळेल तोपर्यंत बस रस्त्यावर धावतील आणि सेवा देतील,अशी भूमिका महाराष्ट्र स्कूल बस असोसिएशन अध्यक्ष अनिल गर्ग यांनी दिली आहे.

मालवाहतूकदारांनी संप जरी मागे घेतला असला तरी सलग दोन दिवसांच्या संपामुळे राज्यात अनेक भागात इंधनाचा तुटवडा आहे. हिट अँड रन कायद्याविरोधातील आंदोलनाला पाठिंबा नाही किंवा त्यात सहभागी झालेलो नाहीत. संपाला पाठिंबा नसला तरी इंधन असेपर्यंत सेवा देणार अशी भूमिका स्कूल बस असोसिशनने घेतली आहे. असे असतांना देखील नागपुरातील स्कूलबस आणि स्कूल व्हॅन चालकांनी आपली वेगळी भूमिका घेत हे एकदिवसीय आंदोलन केले आहे. 

हे ही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis: दुष्काळात शेतकऱ्यांच्या फळबागांचं मोठं नुकसान, अशा भागात बोअरवेल खोदकामाला 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ; सरसकट बंदी मात्र कायम; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती
दुष्काळात शेतकऱ्यांच्या फळबागांचं मोठं नुकसान, अशा भागात बोअरवेल खोदकामाला मुदतवाढ; सरसकट बंदी मात्र कायम; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती
Nagpur News: आम्हाला तुमची लाडकी बहीण योजनाही नको, अग्रीम मदतही नको; फक्त इतका करा की...; लोहारी सावंगा गावातील महिलांची मुख्यमंत्र्याकडे मागणी, देवेंद्र फडणवीसांचाही शब्द!
आम्हाला तुमची लाडकी बहीण योजनाही नको, अग्रीम मदतही नको; फक्त इतका करा की...; लोहारी सावंगा गावातील महिलांची मुख्यमंत्र्याकडे मागणी, देवेंद्र फडणवीसांचाही मदतीचा शब्द!
Devendra Fadnavis: दिवाळीच्या दिवशीही मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर; नागपूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी साधणार संवाद, रखडलेला खोरी जलसिंचन प्रकल्प मार्गी लागणार?
दिवाळीच्या दिवशीही मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर; नागपूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी साधणार संवाद, अनेक दशक रखडलेला खोरी जलसिंचन प्रकल्प मार्गी लागणार?
Nagpur News : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी मुख्यमंत्री अन् महसूल मंत्री बावनकुळेंचा मुक्काम! बळीराजाच्या घरी स्वयंपाकाला उशीर झाला अन्...., लोहारी सावंग्यात नेमकं काय घडलं?
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी मुख्यमंत्री अन् महसूल मंत्री बावनकुळेंचा मुक्काम! बळीराजाच्या घरी स्वयंपाकाला उशीर झाला अन्...., नागपूरच्या लोहारी सावंग्यात नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate: सोन्याच्या दरात घसरण कायम, सोन्याचे दर वाढणार की आणखी घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत
Gold Rate: सोन्याचे दर वाढणार की घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत
PM Modi Meets LK Advani : पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
Ashok Saraf : बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
Babri Masjid Verdict : 'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
Jay Pawar : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवार यांनी अजितदादांच्या आठवणींना दिला उजाळा
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवारांची अजितदादांच्या आठवणीत भावनिक स्टोरी
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी तर भारतात 20 टक्क्यांनी कोसळले, फरक नेमका कशामुळं? भारतात सोनं उच्चांकावरुन 36700 रुपयांनी घसरलं
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी कोसळले, भारतात सोनं 20 टक्क्यांनी स्वस्त, फरक कशामुळं? 
Embed widget