एक्स्प्लोर

Nagpur News: कालव्यात वाहून गेलेला चिमुकला दोन दिवस उलटूनही बेपत्ता; पतंगीचा पाठलाग करताना घडली होती घटना

Nagpur: नागपूर जिल्ह्यातील महादूला परिसरात पतंग पकडतांना कालव्यात 8 वर्षीय मुलगा वाहून गेल्याची खळबळजनक घटना घडली. मात्र आज 48 तासाहून आधिककाळ लोटला असतांना देखील वाहून गेलेल्याचा शोध लागलेला नाही.

नागपूर : नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील महादूला परिसरात पतंग पकडताना कालव्यात एक मुलगा वाहून गेल्याची खळबळजनक घटना घडली. दोघे भाऊ खेळत असताना पतंग पकडायला गेल्याने दोघेही पाण्यात पडले होते. त्यानंतर मोठ्या भावाला स्वत:ला वाचवण्यात यश आले. आठ वर्षीय लहान भाऊ दयाशंकर अवधेश प्रजापती हा दुर्दैवाने वाहून गेला. ही घटना बुधवार 17 जानेवारीला सकाळी अकरा वाजताच्या सुमारास घडली. या घटनेला 48 तास उलटून गेले तरी वाहून गेलेल्या दयाशंकरचा शोध आतापर्यंत लागला नाही. 

पतंगीचा पाठलाग करताना गेला कालव्यात तोल 

नागपूर जिल्ह्यातील महादूला परिसरात असलेल्या कालव्याजवळ दयाशंकर आणि त्याचा मोठा भाऊ कैलाश (12) हे दोघेही खेळत होते. दरम्यान अचानक कटलेली पतंग पकडायला ते गेले. मात्र या पतंगीचा पाठलाग करताना हे दोघेही जवळच्या कालव्याच्या पाण्यात पडले. त्यानंतर कैलाश या मोठ्या भावाने कसेबसे स्वतःला वाचविले, मात्र यात लहान भाऊ दयाशंकर पाण्यात वाहून गेला. त्यानंतर मोठ्या भावाने आरडा-ओरड करून घडलेल्या प्रकारची माहिती इतरांना दिली.

त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत लहान भावाचा बराच वेळ शोध घेतला. मात्र त्यात यश आले नाही. बुधवारी दुपारपासून पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून दयाशंकरचा शोध घेण्यात येत आहे. तो आतापर्यंत सापडलेला नाही.

चंद्रपुरात 'पतंग'बाजी बेतली जीवावर

चंद्रपुरात 'पतंग'बाजी जीवावर बेतली आहे. पतंग पकडताना स्लॅबवरून खाली पडल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आनंद वासाडे (49)  असे मयत व्यक्तीचे नाव आहे. रविवारी स्लॅबवरून तोल गेल्याने आनंद यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, भानापेठ परिसरात राहणारे आनंद वासाडे हे घराच्या स्लॅबवर गेले होते. याचवेळी एक पतंग कटलेली त्यांना दिसली. ही पतंग पकडण्यासाठी आनंद वासाडे गेले, मात्र, स्लॅबवरून तोल गेल्याने ते खाली पडले. ज्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. 

दरम्यान, मकर संक्रांतीचा उत्सव साजरा करताना आकाशात रंगीबेरंगी, विविध आकारातील पतंग उडविणे हा एक वेगळाच आनंद आहे. मात्र, आकाशातील पतंग पाहताना जमिनीवरील परिस्थितीचे भान राखणे तेवढेच महत्त्वाचे आहे. पतंगोत्सव साजरा करताना उत्साहाच्या भरात निष्काळजीपणामुळे सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करतो आणि प्रसंगी स्वतःचा जीव गमावतो किंवा इतरांचे बळी घेतो. उत्सव साजरा करणे चांगले, पण त्यात एखाद्याला जीव गमवावा लागत असेल तर असा उन्माद कशासाठी, असा प्रश्न या निमित्याने उपस्थित होत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

महत्त्वाच्या बातम्या

Fairness Cream Alert : पाकिस्थान निर्मित गोरी ब्युटी क्रीममध्ये आढळले मर्यादेपेक्षा चार पट अधिक विषारी धातूंचे प्रमाण; FDAचा धक्कादायक अहवाल, राज्यात विक्रीवर बंदी  
पाकिस्थान निर्मित गोरी ब्युटी क्रीममध्ये आढळले मर्यादेपेक्षा चार पट अधिक विषारी धातूंचे प्रमाण; FDAचा धक्कादायक अहवाल, राज्यात विक्रीवर बंदी  
Nagpur Crime News: भारतासह परदेशात नेटवर्क असलेल्या ऑनलाईन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; दोन परदेशी महिलांसह पाच जण पोलिसांच्या ताब्यात, नागपुरातील खळबळजनक घटना
भारतासह परदेशात नेटवर्क असलेल्या ऑनलाईन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; दोन परदेशी महिलांसह पाच जण पोलिसांच्या ताब्यात, नागपुरातील खळबळजनक घटना
Monsoon Update : भरमसाठ कोसळल्यानंतर राज्यावर मान्सून पुन्हा रुसला, अरबी समुद्र अन् उत्तर भारतात कमी दाबाचा पट्टा; ढगांची दाटी विरळ, राज्यावर पुन्हा नवं संकट? वाचा सविस्तर
भरमसाठ कोसळल्यानंतर राज्यावर मान्सून पुन्हा रुसला, अरबी समुद्र अन् उत्तर भारतात कमी दाबाचा पट्टा; ढगांची दाटी विरळ, राज्यावर पुन्हा नवं संकट? वाचा सविस्तर
Bacchu Kadu: देवाभाऊंनी मराठे म्हणून दिल्लीला जावं, देशाचं उज्वल स्वप्न पूर्ण करावं; तर एकनाथ शिंदेंकडे राज्यच नेतृत सोपवावं, कारण....; बच्चू कडूंनी सांगितलं राज'कारण'
देवाभाऊंनी मराठे म्हणून दिल्लीला जावं, देशाचं उज्वल स्वप्न पूर्ण करावं; तर एकनाथ शिंदेंकडे राज्यच नेतृत सोपवावं, कारण....; बच्चू कडूंनी सांगितलं राज'कारण'

व्हिडीओ

Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नेपाळमध्ये पुन्हा तरुणाईच्या आंदोलनाचा भडका! तीन दिवसात तिघांचा आत्मदहनाचा प्रयत्न, नेमकं काय घडतंय? पंतप्रधानांवर जनविरोधी आणि हुकूमशाही पद्धतीने शासन केल्याचा आरोप
नेपाळमध्ये पुन्हा तरुणाईच्या आंदोलनाचा भडका! तीन दिवसात तिघांचा आत्मदहनाचा प्रयत्न, नेमकं काय घडतंय? पंतप्रधानांवर जनविरोधी आणि हुकूमशाही पद्धतीने शासन केल्याचा आरोप
Kolhapur Crime: कोल्हापुरात खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीने धडक दिल्याने हकनाक जीव गेला; मृतदेह खड्ड्यांमध्ये ठेवत नातेवाईक अन् नागरिकांचा आक्रोश
कोल्हापुरात खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीने धडक दिल्याने हकनाक जीव गेला; मृतदेह खड्ड्यांमध्ये ठेवत नातेवाईक अन् नागरिकांचा आक्रोश
ओमानच्या किनाऱ्याजवळ 'जीएफएस गॅलेक्सी' व्यापारी जहाजावर हल्ला; 11 पैकी 10 भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण अद्याप बेपत्ता
ओमानच्या किनाऱ्याजवळ 'जीएफएस गॅलेक्सी' व्यापारी जहाजावर हल्ला; 11 पैकी 10 भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण अद्याप बेपत्ता
Moshi Building Collapse: लग्नाला महिना पूर्ण होण्यापूर्वीच काळाचा घाला; पत्नीला पुण्यात घेऊन यायची तयारी, मोशीत घरही फायनल झालं, पण सारंच होत्याचं नव्हतं झालं! कचरा डेपो दुर्घटनेत अंत
लग्नाला महिना पूर्ण होण्यापूर्वीच काळाचा घाला; पत्नीला पुण्यात घेऊन यायची तयारी, मोशीत घरही फायनल झालं, पण सारंच होत्याचं नव्हतं झालं! कचरा डेपो दुर्घटनेत अंत
Girija Raut : विनायक राऊतांनी दुसरं लग्न अन् दुसरं घर माझ्यापासून लपवलं; आम्हाला झोपडपट्टीत ठेवलं; कौटुंबिक वादापासून ते अघोरी कृत्यांपर्यंत गिरीजा राऊतांनी सगळंच सांगितलं
विनायक राऊतांनी दुसरं लग्न अन् दुसरं घर माझ्यापासून लपवलं; आम्हाला झोपडपट्टीत ठेवलं; कौटुंबिक वादापासून ते अघोरी कृत्यांपर्यंत, गिरीजा राऊतांनी सगळंच सांगितलं
Video: डिलिव्हरी बॉयचे लज्जास्पद कृत्य! ऑर्डर देताच थेट बाथरूममध्ये घुसला अन् महिलेला दाखवलं गुप्तांग, अखेर संतापललेल्या महिलेनं..
Video: डिलिव्हरी बॉयचे लज्जास्पद कृत्य! ऑर्डर देताच थेट बाथरूममध्ये घुसला अन् महिलेला दाखवलं गुप्तांग, अखेर संतापललेल्या महिलेनं..
Girija Raut : सात वर्षे छळलं; नवऱ्यासोबत शारिरीक संबंध नाही, मानसिक त्रास दिला, अघोरी कृत्य केली, जिवंत कोंबडा, मांस, कणकेचे उतारे, गिरीजा राऊतांनी मांडली आपबिती
सात वर्षे छळलं; नवऱ्यासोबत शारिरीक संबंध नाही, मानसिक त्रास दिला, अघोरी कृत्य केली, जिवंत कोंबडा, मांस, कणकेचे उतारे, गिरीजा राऊतांनी मांडली आपबिती
Video: पुण्यातील वयाच्या साठीतील आईच्या जिद्दीला सलाम; अवघ्या वर्षभरात जीममध्ये घाम गाळून तब्बल 18 किलो वजन कमी केलं! आजारावर सुद्धा केली मात
Video: पुण्यातील वयाच्या साठीतील आईच्या जिद्दीला सलाम; अवघ्या वर्षभरात जीममध्ये घाम गाळून तब्बल 18 किलो वजन कमी केलं! आजारावर सुद्धा केली मात
Embed widget