एक्स्प्लोर

Nagpur News : नागपुरात नोकरीवरुन काढल्यामुळे आत्महत्या ; शहरात 24 तासांत चार आत्महत्या

नागपुरात गेल्या काही महिन्यांपासून आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मात्र नागरिकांनी काही समस्या असल्यास मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Nagpur News : नागपूर शहरात 24 तासांत चार आत्महत्यांची नोंद झाली आहे. नोकरीवरून काढल्याने तणावात असलेल्या एका व्यक्तीने विहिरीत उडी घेऊन जीव दिला, तर रागाच्या भरात एका विवाहितेने विष प्राशन करून आत्महत्या केली. जरीपटका, पाचपावली, शांतीनगर व कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या.

कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील निवासी प्रशांत उत्तमराव भगत (वय 40, स्वर्णनगर) हे मानसिक आजाराने त्रस्त होते. त्यांना नोकरीवरून काढण्यात आले होते. यातून ते तणावात होते. त्रासाला कंटाळून त्यांनी ऑटोमोटिव्ह चौकाजवळील एका विहिरीत उडी घेतली. त्यांचे प्रेत तरंगताना आढळल्याने ही बाब उघड झाली.  कपिलनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

दुसरी घटना जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत झाली. सीमा कैलाश कनोजिया (वय 38, रा. मिसाळ ले-आऊट, तथागत कॉलनी) यांनी दुपारी चार वाजता रागाच्या भरात घरात बेडरूममध्ये विष प्राशन केले. त्यानंतर प्रकृती खराब झाली. त्यांचे पती व मुलाने त्यांना उपचारासाठी इंदोरा चौक येथील एका इस्पितळात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

गळफास घेऊन दोघांची आत्महत्या

दरम्यान, पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत धीरज वसंता तराळे (वय 35, रा. पंचशीलनगर) यांनी अज्ञात कारणावरून घरी कुणीच नसताना सिलिंग फॅनला दुपट्ट्याच्या सहाय्याने गळफास घेतला. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. तर शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दीक्षा दिलीपसिंग भारद्वाज (वय 28, रा. प्रेमनगर) हिनेदेखील अज्ञात कारणावरून गळफास घेतला. सकाळी ती बेडरूममध्ये सिलिंग फॅनला ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. तिला मेयो इस्पितळात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू

ट्रकच्या धडकेत जखमी झालेल्या एका तरुणाचा अखेर मृत्यू झाला. हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. राहुल दिलीप कांबळे (वय 23) असे मृताचे नाव आहे. 29 जानेवारी रोजी राहुल कांबळे हा तरुण त्याचा लहान भाऊ कुणाल याच्यासोबत मोटारसायकलने जबलपूर महामार्गाने जात होता. ओरिएन्टल कंपनी जवळ अज्ञात ट्रकचालकाने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली. ट्रकचा वेग जास्त असल्याने धडकेने मोटारसायकलवरून दोघेही खाली पडलेव राहुलच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तर कुणालच्या हाताला दुखापत झाली. राहुलला उपचारासाठी मेडिकल इस्पितळात दाखल करण्यात आले होते. मात्र, अखेर त्याचा मृत्यू झाला.

ही बातमी देखील वाचा...

Nagpur Metro : मंगळवारपासून मेट्रोने प्रवास करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना तिकिट दरात 30 टक्के सवलत; महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget