दिव्यांगांसाठी उभारण्यात आलेल्या इन्क्लुझिव्ह पार्कचे लोकार्पण; देशातील अव्वल दर्जाचे केंद्र असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
Nagpur News: दिव्यांगांसाठी नागपूर शहरात उभारलेल्या भारतातील अव्वल दर्जाचे इन्क्लुझिव्ह पार्कचे लोकार्पण आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.
![दिव्यांगांसाठी उभारण्यात आलेल्या इन्क्लुझिव्ह पार्कचे लोकार्पण; देशातील अव्वल दर्जाचे केंद्र असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन Nagpur News DCM Devendra Fadnavis Inauguration of an inclusive park for the disabled nitin gadkari nagpur maharashtra marathi news दिव्यांगांसाठी उभारण्यात आलेल्या इन्क्लुझिव्ह पार्कचे लोकार्पण; देशातील अव्वल दर्जाचे केंद्र असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/09/79bf0a790e844f698ce24078319f8c4d1709991171045892_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nagpur News: दिव्यांगांना विकासच्या प्रवाहात आणण्यासह त्यांचे जीवन अधिक सुखकर व्हावे यादृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या दूरदृष्टीतून आजच्या कालसुसंगत अनेक योजना साकारल्या आहेत. त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून नागपूर (Nagpur News) येथे साकारलेले अनुभूती इन्क्लुझिव्ह पार्क दिव्यांगांना आत्मसन्मानासह मनोरंजनाचा, निरोगी जीवनाचा मंत्र देणारे भारतातील अव्वल दर्जाचे केंद्र म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केला.
इन्क्लुझिव्ह पार्क म्हणजे भारतातील अव्वल दर्जाचे केंद्र
दिव्यांग बांधवांना आपल्या नैसर्गिक क्षमता आणि गरजेनुरूप निरोगी जीवनाला प्रवाहित करणारे मनोरंजन केंद्र मिळावे. या दृष्टीने साकारलेल्या अनुभूती इन्क्लुझिव्ह पार्कच्या लोकार्पण समारंभात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, आमदार कृष्णा खोपडे, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, नासुप्रचे विश्वस्त संदीप इटकेलवार,हे प्रमुख्याने उपस्थित होते.
दिव्यांगांसाठी एक हक्काची जागा
दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात योजना पूर्णत्वास आणल्या आहेत. आज त्याचा फायदा दिव्यांगांना होत असल्याचे दिसून येते. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अनेक योजना असून दिव्यांगासाठी विविध प्रकारच्या सोयी आणि विविध प्रकारचे गॅजेट्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सर्वसमावेशक दिव्यांग विकास हेच शासनाचे धोरण असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
शहरातील दिव्यांगांसाठी अप्रतिम अशा अनुभूती इन्क्लुझिव्ह पार्कची निर्मिती करण्यात आली आहे. हे पार्क तयार करताना विविध प्रकारचे दिव्यंगत्व असलेल्या मुला-मुलींसाठी आवश्यक सर्व गोष्टी या ठिकाणी पहायला मिळतात. मनोरंजनासह थेरेपीची सुविधाही या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ख-या अर्थाने हा पार्क दिव्यांगांसाठी एक हक्काची जागा असल्याचे देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
विकासाची ही घोडदौड अशीच सुरू राहणार
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले की, उज्जैन येथे सर्वप्रथम दिव्यांग पार्कची निर्मिती करण्यात आली. दौ-यावेळी असताना उज्जैनमध्ये हा पार्क पाहिला असता नागपुरात असा पार्क असावा, अशी कल्पना सुचली. त्यानंतर नागपूर सुधार प्रन्यासच्या सहाय्याने या पार्कची निर्मिती एका वर्षाच्या आत करण्यात आली. पूर्व नागपुरात अनेक विकासकामे सुरू आहेत. येत्या काळात अनेक शैक्षणिक संस्थाचे कॅम्पस या भागात येणार असून विकासाची ही घोडदौड अशीच सुरू राहणार असल्याचे मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
अशा असणार दिव्यांग पार्कमधील सुविधा
- दृष्टिहिनांसाठी टच आणि स्मेलिंग गार्डन
- झाडे ओळखण्यासाठी ब्रेल भाषेत पट्टी, ब्रेलयुक्त बुद्धिबळ, सापसिडी व इतर खेळ
- दिव्यांगसाठी आऊटडोर स्टेडियम असणार जिथे दिव्यांग संगीत ऐकू आणि वाचू शकणार.
- ओपन जिम आणि ओपन हॉल.
- दिव्यांगांसोबत सामान्य वयोवृद्ध लोकांनादेखील लाभ मिळणार.
- ऑटिस्टिक मुलांसाठी देखील ब्लू रूमची व्यवस्था.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)