Video: आमदाराची पोलिसांना शिवीगाळ, आशिष जायस्वाल यांचा व्हिडीओ व्हायरल
Nagpur : गाव गुंडांवर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे आशिष जैस्वाल पोलिसांना जाब विचारत होते, त्यावेळी त्यांची जीभ घसरली.
Nagpur Latest Crime News update In Marathi : नागपूरमधील रामटेकचे शिवसेना आमदार आशिष जायस्वाल ( Congress MLA Ashish Jaiswal) यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत आशिष जायस्वाल पोलिसांना शिवीगाळ करत असल्याचं समोर आलं आहे. कन्हान येथे आठवडी बाजारात गाव गुंडांनी दादागिरी केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, पण पोलिसांनी त्या गाव गुंडांवर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे आशिष जैस्वाल पोलिसांना जाब विचारत होते, त्यावेळी त्यांची जीभ घसरली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नागपूरमधील रामटेक येथील शिवसेना आमदार आशिष जैस्वाल हे पोलिसांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शुक्रवारी सायंकाळी नागपूर जिल्ह्यातील कन्हान येथे आठवळी बाजारात चार गावगुंडांनी तलवारी फिरवत हैदोस घातला होता. त्यानंतर संतप्त नागरिकांनी गुंडांवर कारवाई करावी, यासाठी पोलिस ठाण्याला घेराव घातला होता. त्यावेळी आमदार आशिष जायस्वाल देखील तेथे पोहोचले. पोलिसांची गुंडांना भीती वाटत नाही, पोलीस अवैद्य धंदे वाल्याकडून हप्ते घेतात. त्यामुळे कन्हान शहरात अशा घटना घडतात, असा आरोप करत आमदार आशिष जायस्वाल यांनी पोलिसांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली.
शुक्रवाच्या त्या घटनेतील गावगुंड शैलेश सलामे, निखिल गजभिये, शुभम सलामे व गजानन कडनायके यांच्या गुंडगिरीचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. ज्यात गुंड तलवार फिरवताना स्पष्ट दिसत आहेत. तसेच ते स्थानिकांना त्रास देत असल्याचेही व्हिडीओत स्पष्ट दिसतेय. महत्वाचे म्हणजे हैदोस घालणारे हे गावगुंड अजूनही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. यामुळे संतापलेल्या आशिष जायस्वाल यांनी कारवाई का केली नाही, म्हणत पोलिसांनाच शिवीगाळ केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आणखी वाचा :