वडिलांच्या डोळ्यासमोर मुलीला जलसमाधी, तर मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात मामाचाही मृत्यू, नागपूर हादरलं
नागपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील गट ग्रामपंचायत सोनेघाट इथं बुडून एक मुलीचा तर तिला वाचवण्यासाठी गेलेल्या मामाच मृत्यू झाला आहे.
नागपूर : नागपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील गट ग्रामपंचायत सोनेघाट अंतर्गत येत असलेल्या प्रसिद्ध जपाळेश्वर देवस्थान तलावात सकाळच्या सुमारास वडिलांसोबत पोहायला आलेल्या एका 13 वर्षीय मुलीचा वडिलांच्या डोळ्यासमोर बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हर्षाली विनोद माकडे वय 13 वर्षे, रा. भोजापूर (मानापूर) असं तीच नाव आहे. तसेच मुलीला वाचवण्यासाठी गेलेल्या मामाचाही मृत्यू झाला आहे. बुडणाऱ्या मुलीला वाचवण्यासाठी मामा गेला होता. मात्र, त्यालाहा पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळं तो देखील खोल पाण्यात गेला, यावेळी त्याचा देखील बुडून मृत्यू झाला आहे.
पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मामा भाचीचा मृत्यू
मुलगी आपले वडील विनोद माकडे यांच्यासोबत जपाळेश्वर देवस्थान येथे पोहायला आली होती. त्यांच्यासोबत तिचे मामा अजय वामन लोहबरे वय 33 वर्षे, रा. खात (भंडारा) हेदेखील आले होते. दरम्यान हर्षाली सर्वात आधी पाण्यात उतरली मात्र तिला पाण्याचा अंदाज न आल्याने ती बुडू लागली. तिला बुडतांना पाहून तिचे मामा तिला वाचवण्यासाठी पाण्यात उतरले मात्र पाणी खोल असल्याने दोघेही बुडू लागले. वडिलांच्याच डोळ्यासमोर मुलीचा व तिच्या मामाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. स्थानिक गोताखोरांच्या मदतीने दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले.व उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे नेण्यात आले. शव विच्छेदन झाल्यानंतर दोन्ही मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील आंजर्ले समुद्रकिनारी एक धक्कादायक घटना
रत्नागिरी जिल्ह्यातील आंजर्ले समुद्रकिनारी एक धक्कादायक घटना घडली आहे. पर्यटकाने स्टंटबाजी करताना आपली गाडी थेट समुद्रात नेल्याचं पाहायला मिळालं. या गाडीला अखेर जलसमाधी मिळाली आहे. ग्रामस्थांच्या माहितीनुसार हा पर्यटक मद्यधुंद अवस्थेत होता. या घटनेनंतर ग्रामस्थांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला पण गाडी पाण्यात बुडाली आहे. दरम्यान, समुद्रकिनाऱ्यावर स्टंटबाजी आणि भरधाव वेगात वाहन चालवण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. समुद्रकिनाऱ्यावर वाहन नेण्यास बंदी असतानाही नियमांचा सर्रास भंग केला जात आहे, त्यामुळे पर्यटनासोबतच नागरिकांच्या सुरक्षेलाही गंभीर धोका निर्माण झाला आहे.
महत्वाच्या बातम्या:
























