एक्स्प्लोर

Nagpur Crime : क्राईम कॅपिटल नागपूर 16 महिन्यात बनले 'अल्पवयीन गुन्हेगारांचे कॅपिटल'

Nagpur Crime : क्राईम कॅपिटल म्हणून ओळखले जाणारे नागपूर गेल्या 16 महिन्यात "अल्पवयीन गुन्हेगारांचे कॅपिटल" बनले आहे.

Nagpur Crime : क्राईम कॅपिटल (Crime Capital) म्हणून ओळखले जाणारे नागपूर (Nagpur) गेल्या 16 महिन्यात "अल्पवयीन गुन्हेगारांचे कॅपिटल" (Capital of Juvenile Criminals) बनले आहे. असे म्हणण्याचे कारण म्हणजे नागपुरात गेले 16 महिने अल्पवयीन आरोपी सरासरीने रोज एक गंभीर गुन्हा करत आहेत. या अल्पवयीन आरोपींमुळे शहरात कायदा सुव्यवस्थेसमोर (Law & Order) नवे प्रश्न उभे होत असल्याने नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) खास उपाययोजना सुरु केल्या आहेत.

नागपूर राज्याची क्राईम कॅपिटल आणि आता हीच क्राईम कॅपिटल अल्पवयीन गुन्हेगारांची क्राईम सिटी बनते की काय अशी शंका निर्माण झाली आहे.

नागपुरात वाढती बाल गुन्हेगारी

  • 1 जानेवारी 2022 ते 30 एप्रिल 2023 नागपुरात 413 गुन्हे अल्पवयीन गुन्हेगारांनी घडवले.
  • त्यात 467 अल्पवयीन गुन्हेगारांना पोलिसांनी पकडले.
  • वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मते कोरोना काळानंतर अल्पवयीन गुन्हेगारीत जास्त वाढ आहे.

नागपुरात अल्पवयीन गुन्हेगार किती गंभीर स्वरुपाचे गुन्हे घडवत आहे यावर नजर टाकणं ही गरजेचं आहे.

  • नागपुरात अल्पवयीन आरोपींनी घडवलेल्या गुन्ह्यात खून (Murder), खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी, दुखापत, चोरी अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश.
  • 9 खून अल्पवयीन आरोपींनी केले असून त्यात 12 अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी पकडले.
  • खुनाच्या प्रयत्नात 22 अल्पवयीन आरोपी पकडले.
  • जबरी चोरीत 28, दुखापत  प्रकरणात 116 तरी चोरीच्या गुन्ह्यात 141 अल्पवयीन गुन्हेगारांचा समावेश दिसून आला.
  • घरफोडीत (Robbery) 55 तर इतर गुन्ह्यात 93 अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या हाती लागले.

अंमली पदार्थांचा वाढता वापर

वाढत्या अल्पवयीन गुन्हेगारीमुळे समाजातही विविध प्रश्न निर्माण होत आहे. एका बाजूला आपली मुलं कोणासोबत वावरत आहे, याची काळजी पालकांना वाटत आहे. दुसऱ्या बाजूला तरुण मुली आणि महिलांचा सार्वजनिक ठिकाणचा वावर त्यांना असुरक्षित वाटायला लागला आहे. यासाठी काही अंशी पालकांचं दुर्लक्ष आणि तरुणाईमध्ये अंमली पदार्थांचा (Drugs) वाढता वापर कारणीभूत असल्याचं पालकांना वाटतं आहे.

पोलीस दादा आणि पोलीस ताई यांची मदत

अल्पवयीन आरोपींना पुन्हा योग्य मार्गावर आणण्यासाठी नागपूर पोलिसांनी अशा अल्पवयीन आरोपींचा तसेच त्यांच्या पालकांचा समुपदेशन सुरु असून त्यासाठी पोलीस दादा (Police Dada) आणि पोलीस दीदी (Police Didi) यांची मदत घेतली जात आहे. मात्र, कोवळ्या वयात गुन्हेगारीकडे वळलेल्या बालकांना पुन्हा योग्य मार्गावर आणण्यासाठी सामूहिक सामाजिक प्रयत्नांचीही गरज आहे.

हेही वाचा

Nagpur Crime : अत्याचाराच्या घटनांनी उपराजधानी हादरली; आठवड्यात अनेक घटना उघड

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget