Nagpur : पालकांनो, मुलं मोबाईलमध्ये काय करतात याकडे लक्ष द्या; नागपुरात 12 वर्षीय मुलाचा गेला जीव
एका अॅपमध्ये गळ्यात लटकवलेला दोर कसा काढायचा याबाबतची माहिती तो सातत्याने बघत होता. त्यातूनच त्याने तसा प्रयत्न केल्याने त्यातून लागलेल्या गळफासात त्याचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले.
Nagpur News : मोबाईल अॅप पाहून तशीच कृती करण्याच्या प्रयत्नात आठवीत शिकत असलेल्या बारा वर्षीय विद्यार्थ्याला जीव गमवावा लागला. ही धक्कादायक घटना सोमवारी क्वॉर्टर परिसरात घडली. बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. अग्रण्य सचिन बारापात्रे (वय 12. सोमवारी क्वॉर्टर) असे गळफास घेतलेल्या मुलाचे नाव आहे.
पोलिसांनी (Nagpur Police) दिलेल्या माहितीनुसार, सचिन सुरेश बारापात्रे (वय 40) हे सोमवारी क्वॉर्टर परिसरात नानासाहेब राऊत यांच्या घरी भाड्याने राहतात. बुधवारी दुपारच्या सुमारास टेरेसवर अग्रण्य खेळायला गेला होता. दरम्यान, वडील काही कामानिमित्त बाहेर, तर आई घरकामात व्यस्त होती. काही वेळ अग्रण्यने पतंग उडविली. त्यानंतर तिथेच असलेल्या लाकडी शिडीवर तो आजूबाजूच्या नागरिकांना खेळताना दिसला. त्यानंतर टेरेसवर असलेल्या लाकडी शिडीला ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत तो आढळला. ही माहिती त्यांनी घरमालक किशोर चिखले आणि अग्रण्यच्या आईला दिली. याची माहिती त्यांनी आईला दिली. त्यांनी अग्रण्यला खाली उतरविले. तसेच उपचारासाठी मेडिकल येथे घेऊन गेले असता, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
अग्रण्यची आई गृहिणी असून, त्याचे वडील इलेक्ट्रिकचे काम करतात. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या तपासात अग्रण्यला मोबालवर सतत खेळण्याची सवय होती, असे तपासात पुढे आले आहे. त्याने आईच्या मोबाइलमध्ये अनेक अॅप डाउनलोड केले होते. त्यापैकीच एका अॅपमध्ये गळ्यात दोर लटकवून तो कसा काढायचा याबाबतची माहिती तो सातत्याने बघत होता. त्यातूनच बुधवारी त्याने तसा प्रयत्न केल्याने त्यातून लागलेल्या गळफासात त्याचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले. सक्करदरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
'एम्स'मध्ये सुरू होता उपचार
अग्रण्य एकुलता एक होता. तसेच तो Hyper active होता. स्वभावाने तापट असल्याने कुठल्याही गोष्टीत तो लवकरच रिअॅक्ट होत असल्याने त्याच्या आई-वडिलांनी त्याला एम्स येथील एका डॉक्टरांनाही दाखविले होते. त्यात त्याला एक मानसिक आजार असल्याचेही समोर आले होते. त्यासाठी त्याला औषधही देण्यात आले असल्याची बाब समोर आली आहे.
पालकांनो, अशी घ्या काळजी
- मुले मोबाइलवर वारंवार काय पाहतात, याकडे लक्ष द्या.
- अनावश्यक अॅप डाउनलोड करत असतील तर समजावून सांगा.
- मुले मोबाइलवरील कशाचे अनुकरण करतात. याकडे लक्ष द्या.
- मुलांच्या वर्तनामध्ये काय बदल होतो, याकडे जाणीवपूर्वक लक्ष ठेवा.
ही बातमी देखील वाचा...