एक्स्प्लोर

Accident News : भीषण अपघात! खाटू श्याम बाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; नागपुरातील एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच अंत, सहा जण गंभीर

Acciddent News:  राजस्थानातील सालासर रोडवर एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात नागपूरच्या कामठी येथे राहत असलेल्या पारसे कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

Rajasthan Salasar Road Acciddent :  राजस्थानातील सालासर रोडवर एक भीषण अपघाताची (Acciddent News) घटना घडली आहे. या अपघातात नागपूरच्या (Nagpur) कामठी येथे राहत असलेल्या पारसे कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यात आई, वडील आणि मुलगा जागीच ठार झाला आहे. तर इतर सहा जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. राजस्थानातील खाटू श्याम बाबांच्या दर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला असून भाविकांवर काळानं घाला घातला आहे. या घटनेनं नागपूरच्या कामठीमध्ये खळबळ उडाली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Accident News : टवेरा गाडीला पिकअची जोरदार धडक, एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच अंत

मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये महादेव पारसे, त्यांची पत्नी कांता पारसे आणि मुलगा घनश्याम यांचा समावेश आहे. खाटू श्याम बाबांच्या दर्शनासाठी जात असताना टवेरा गाडीला पिकअने जोरदार धडक दिली. हि धडक इतकी जोरदार होती कि यात दोन्ही वाहनांच मोठं नुकसान झालं आहे. तर पारसे कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून इतर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये चालक मनोज चिंदमवारसह आराधना पारसे, पायल पारसे , पल्लवी पारसे, पुनम पारसे, तुषार पारसे आणि पवन बागडे यांचा समावेश आहे. सर्व जखमींवर सालासर येथील रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच कामठीतील कचरीपुरा परिसरात शोककळा पसरली आहे. तर मृतदेह शवविच्छेदनानंतर कामठी येथे आणण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Bhandara Accident News : संतप्त नातेवाईकांनी ठेवला सनफ्लॅग कंपनीच्या प्रवेशद्वारावर मृतदेह

स्टील उत्पादक सनफ्लॅग कंपनीत प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक असलेल्या तरुणाचा रॅश ड्रायव्हिंगनं बळी घेतला. ही घटना भंडाऱ्याच्या वरठी येथील सनफ्लॅग कंपनीच्या प्रवेशद्वारावर दोन दिवसांपूर्वी घडली होती. कर्तव्यावर असलेला हा सुरक्षारक्षक प्रवेशद्वार बंद करीत असताना त्याचवेळी भरधाव आणि रॅश ड्रायव्हिंग करून कंपनीत प्रवेश करणाऱ्या एका कार चालकानं त्याला जबर धडक दिली, यात तो गंभीर जखमी झाला. प्रथम भंडाऱ्यात आणि नंतर त्याच्यावर नागपूर इथं उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. सितीन रहांगडाले (२५) असं मृतकाचं नावं असून तो मुळचा गोंदिया जिल्ह्याच्या तिरोड्यातील डव्वेटोला येथील रहिवासी आहे. कुटुंबीयांनी आज त्याचा मृतदेह थेट सनफ्लॅग कंपनीच्या प्रवेशद्वारावर ठेवला. सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या एजन्सीनं मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मोबदला आणि मृत्युनंतरचे सर्व आर्थिक लाभ द्यावे, अशी मागणी करण्यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत हा मृतदेह कंपनीच्या प्रवेशद्वारावर ठेवण्यात आला होता. यानंतर सनफ्लॅग कंपनी प्रशासनं आणि सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या एजन्सीनं मृतकाच्या कुटुंबीयाला आर्थिक मोबदला आणि लेखी आश्वासन दिल्यानंतर प्रकरण निवळलं. दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता वरठी आणि भंडारा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

 इतर महत्वाच्या बातम्या

'एबीपी माझा'मध्ये कार्यरत. मी मराठी आणि नेटवर्क १८ लोकमत मध्ये कामाचा अनुभव 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Crime News : लग्नानंतर लगेचच छळ; विभक्त झालेल्या पत्नीच्या परिवाराला संपवण्याचा कट, मीठ, मसाल्यात विष, सासूचा मृत्यू अन्...; नखांवरील पांढऱ्या रेषांनी गूढ उकललं
लग्नानंतर लगेचच छळ; विभक्त झालेल्या पत्नीच्या परिवाराला संपवण्याचा कट, मीठ, मसाल्यात विष, सासूचा मृत्यू अन्...; नखांवरील पांढऱ्या रेषांनी गूढ उकललं
Pune Crime News: पुणे पोलीस दलात रुजू झाल्याचे खोटे फ्लेक्स लावले; लग्नासाठी नको नको ते केले, तरुणाची भन्नाट आयडिया पडली महागात
पुणे पोलीस दलात रुजू झाल्याचे खोटे फ्लेक्स लावले; लग्नासाठी नको नको ते केले, तरुणाची भन्नाट आयडिया पडली महागात
Ashok Kharat Crime News: ठाण्यातील 'तो' वादग्रस्त सरकारी अधिकारी निघाला अशोक खरातचा कट्टर भक्त, महिलेला भोंदूबाबाच्या नाशिकमधील कार्यालयात नेलं अन्...; हादरवणारी माहिती समोर
ठाण्यातील 'तो' वादग्रस्त सरकारी अधिकारी निघाला अशोक खरातचा कट्टर भक्त, महिलेला भोंदूबाबाच्या नाशिकमधील कार्यालयात नेलं अन्...; हादरवणारी माहिती समोर
तुमच्या मुलीसोबत लग्न लाऊन द्या, अन्यथा वडिलांना जीवे मारेन; बीडमधील धक्कादायक प्रकार, गुन्हा दाखल
तुमच्या मुलीसोबत लग्न लाऊन द्या, अन्यथा वडिलांना जीवे मारेन; बीडमधील धक्कादायक प्रकार, गुन्हा दाखल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Praful Patel Baramati Speech : बारामतीमधील सभेसाठी मी पवारसाहेबांचा मेसेज; प्रफुल पटेलांनी सांगता सभेत सांगितलं, रोहित पवारांबद्दलही बोलले
Devendra Fadnavis Speech Baramati : ...तर आपण करंटे ठरू, देवेंद्र फडणवीसांचं बारामतीकरांना आवाहन
Sunetra Pawar Speech Baramati : दादांच्या अपघातावर पहिल्यांदाच शंका, मुख्यमंत्र्यांसमोर भावूक भाषण
Uddhav Thackeray Speech : आम्ही हिंदू!आमचे बुरखे काय फाडणार? उद्धव ठाकरेंचं मुंबईत रोखठोक भाषण
Supriya Sule speech Baramati : सुनेत्रा पवारांच्या प्रचारसभेत कंठ दाटला, सुप्रिया सुळेंचं UNCUT भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 एप्रिल 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 एप्रिल 2026 | मंगळवार
आजपासून जमिनीची NA प्रक्रिया सुलभ; बीपीएमएस प्रणालीचे लोकार्पण, ऑनलाइन अधिमूल्य भरण्याची सुविधा सुरू
आजपासून जमिनीची NA प्रक्रिया सुलभ; बीपीएमएस प्रणालीचे लोकार्पण, ऑनलाइन अधिमूल्य भरण्याची सुविधा सुरू
बारामतीच्या सांगता सभेवेळी शरद पवारांचं अचूक टायमिंग; रुग्णालयातून भावनिक आवाहन, 1967 पासूनचा उल्लेख
बारामतीच्या सांगता सभेवेळी शरद पवारांचं अचूक टायमिंग; रुग्णालयातून भावनिक आवाहन, 1967 पासूनचा उल्लेख
Mutual Fund : म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात? दुर्लक्ष केल्यास मोठं नुकसान होण्याचं संकट, जाणून घ्या
म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात? आर्थिक नुकसान टाळण्यासाठी नेमकं काय करावं?
Video: ...तर आपण करंटे ठरू, देवेंद्र फडणवीसांचं बारामतीकरांना आवाहन; म्हणाले, अजित दादांच्या स्मृतीयज्ञात आहुती द्यायचीय
Video: ...तर आपण करंटे ठरू, देवेंद्र फडणवीसांचं बारामतीकरांना आवाहन; म्हणाले, अजित दादांच्या स्मृतीयज्ञात आहुती द्यायचीय
Crime News : लग्नानंतर लगेचच छळ; विभक्त झालेल्या पत्नीच्या परिवाराला संपवण्याचा कट, मीठ, मसाल्यात विष, सासूचा मृत्यू अन्...; नखांवरील पांढऱ्या रेषांनी गूढ उकललं
लग्नानंतर लगेचच छळ; विभक्त झालेल्या पत्नीच्या परिवाराला संपवण्याचा कट, मीठ, मसाल्यात विष, सासूचा मृत्यू अन्...; नखांवरील पांढऱ्या रेषांनी गूढ उकललं
Video: बारामतीमधील सभेसाठी पवारसाहेबांचा मेसेज; प्रफुल पटेलांनी सांगता सभेत सांगितलं, रोहित पवारांबद्दलही बोलले
Video: बारामतीमधील सभेसाठी पवारसाहेबांचा मेसेज; प्रफुल पटेलांनी सांगता सभेत सांगितलं, रोहित पवारांबद्दलही बोलले
Share Market : सेन्सेक्स निफ्टी सुस्साट, शेअर बाजारात तेजीचा ट्रेंड, गुंतवणूकदारांनी 3 लाख कोटी कमावले, कारण समोर
शेअर बाजारात तेजीचा ट्रेंड कायम, गुंतवणूकदारांनी 3 लाख कोटी कमावले, ट्रम्प कनेक्शन समोर
Embed widget