RPF Nagpur : 13 लाखांच्या मुद्देमालासह मुंबईच्या चोरट्याला नागपुरात अटक
शेगाव, अकोला आणि बडनेरा येथे तपासणी केली असता आरोपी सापडला नाही. त्यामुळे पुन्हा वर्धा येथे गाडीची तपासणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. यानंतर पथकाने कसून तपासणी केल्यावर आरोपी आढळून आला.
नागपूरः मुंबईतून 13 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून आरोपी रेल्वेने नागपुरकडे निघाला असल्याची माहिती सांताक्रुझ पोलिसांकडून नागपूर आरपीएफला मिळाली. प्राप्त माहितीच्या आधारावर शेगांव, अकोला आणि बडनेरा येथे गाडीची तपासणी करण्यात आली. मात्र यावेळी आरोपी सापडला नसल्याची माहिती आरपीएफला देण्यात आली. त्यामुळे पुन्हा वर्धा येथे गाडीची तपासणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. यानंतर पथकाने कसून चौकशी केल्यावर आरोपी आढळून आला.
वर्धा येथील स्टाफला घेऊन गाडी क्रमांक 12859 गीतांजली एक्सप्रेसची तपासणी केल्यावर एस 6 या बोगीच्या 62 क्रमांकाच्या सीटवर आरोपी असल्याची माहिती मिळाली. त्या सीटवर बसलेल्या इसमाला नाव विचारल्यावर त्याने दीपक बिनोद नायक (वय 44, रा. देउला पोस्ट भोगराई जि. बालेश्वर, उडीसा) असा पत्ता सांगितला. त्याच्याजवळ काळ्या रंगाची बॅग आढळून आली. तसेच चौकशीअंती सांताक्रूज येथून रोख रक्कम चोरी करण्याची कबूली दिली.
बँगमधून मिळाले पुरावे
रेल्वे नागपूरला पोहोचल्यावर अधिकाऱ्यांनी त्या आरोपीची पडताळणी सांताक्रूझ पोलिसांसकूडन करुन घेतली आहे. त्याला गाडीतून उतरवून आरपीएफ ठाण्यात बोलविण्यात आले. उपनिरीक्षक सुभाष मडावी यांनी सीसीटीव्ही रुममधील दोन पंचांसमोर त्यांची बॅग तपासली, त्यात 411370 रुपये रोख, 91 हजार किमतीचे मंगळसूत्र, आरोपीच्या आईच्या खात्यातील 20 हजार रुपये, आरोपीच्या पत्नीच्या खआत्यातील 30 हजार रुपये तसेच स्वतःच्या खात्यातच 2 लाख रुपये जमा केल्याचे सांगितले. यासोबतच त्याच्या बॅगमधून गॅस कनेक्शनची कागदपत्रे, बँकेत पैसे जमा केल्याच्या पावत्या. घड्याळ, मोबाईल व कपडे आदी साहित्या जप्त केले.
Eknath Shinde : नगराध्यक्ष, सरपंचांची निवड थेट जनतेतून ही जनतेचीच मागणी, आमचा अजेंडा नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्टीकरण
आरोपी सांताक्रूझ पोलिसांच्या ताब्यात
रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेने आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीला अटक केल्यावर जप्त केलेल्या चोरीच्या मुद्देमालासह आरोपीची कस्टडी सांताक्रूझ पोलिसांच्या पथकाला काल देण्यात आली. यापूर्वीही अनेक घटनांमध्ये आरपीएफच्या कारवाईचे सर्वस्तरातून कौतूक केले गेले आहे. कारवाई आरपीएफ आयुक्त आशुतोष पांडे यांच्या नेतृत्वात कोटा जोजी, आर. एल. मिना, एन.पी. सिंग, सुभाष मडावी, देवेंद्र पाटील, प्रज्ञा मदनलाल, रामनिवास मीना, ए.के. शर्मा, मंगेश दुधाने, मुस्ताक, मुकेश राठोड, जसवीस सिंह यांनी केली.