(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur : नागपूरात महाशिवरात्रीला शिंगाड्याचं पीठ खाणाऱ्यां भाविकांना विषबाधा, 100 च्या वर रुग्णांची संख्या, नागरिक संतप्त
Nagpur : तब्बल 100 च्या वर नागरिकांना विषबाधा झाली असून त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. यामुळे अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर संशय व्यक्त केला जातोय.
Nagpur : नागपूरात महाशिवरात्री निमित्त (Mahashivratri) उपवासात शिंगाड्याचं पीठ खाणाऱ्या भाविकांना विषबाधा झाल्याचं समोर आलंय. नागपूरातील हिंगणा, कामठी या दोन तालुक्यातून नागरिकांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. तब्बल 100 च्या वर नागरिकांना विषबाधा झाली असून त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने शिंगाड्याच्या पिठाचे नमुने घेतली असून पुढील चौकशीला पाठवले असल्याची माहिती मिळत आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर संशय, नागरिक संतप्त
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ज्या भाविकांनी हे शिंगाड्याचे पीठ खाल्ले, त्याची एक्स्पायरी म्हणजेच मुदत संपली होती, आणि याच शिंगाडाच्या पिठापासून तयार केलेल्या उपवासाच्या फराळाचे पदार्थ खाल्याने नागपूर जिल्ह्यात 100 हून अधिक जणांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. ऐन महाशिवरात्रीच्या दिवशी शहरातल्या विविध भागांमध्ये सीलबंद शिंगाडा पिठाची विक्री करणाऱ्या एकमात्र ब्रांडमुळे हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येतंय. घडलेल्या प्रकारामुळे अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर संशय व्यक्त केला जात आहे. हा भेसळीचा प्रकार असल्याचा संतापही नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
मुदत संपल्यांतरही पीठाची विक्री
शिंगाडा पिठापासून बनविलेले अन्न पदार्थ खाल्याने या नागरिकांना उलट्या, हगवण, पोटदुखी, अंगदुखी सारखी लक्षणे आढळल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, या सर्वांनी विकत घेतलेले शिंगाडाचे पीठ एकाच कंपनीचे असल्याचे सांगितले जातंय. तसेच हे पीठ एक्स्पायर झाल्याचे देखील सांगण्यात येत आहे. मुदत संपल्यांतरही दुकानदारांनी ते पीठ नष्ट न करता विक्री केल्याने हा प्रकार घडल्याचेही समोर येत आहे. त्यामुळे या नागरिकांनी ज्या दुकानांमधून हे पीठ विकत घेतले होते, त्या दुकानांवर अन्न व औषध प्रशासन काय कारवाई करते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा>>>
Nagpur Crime News : प्रेमप्रकरणात मित्रानेच केला मित्राचा घात; निर्जनस्थळी नेत चाकूने केले 25 हून अधिक वार