धक्कादायक... वीज चोरी उघडकीस आणणाऱ्या महावितरण कर्मचाऱ्यास मारहाण
वीज बिल थकबाकी वसुली मोहीम राबवित असताना मुरलीधर निमजे यांना जैतुनासी शेख इनायत या ग्राहकाचे वीज मीटर दुसऱ्याच्या नावाचे असून त्यावरून अवैधरित्या वीज वापर करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले.
नागपूर: मीटर मधून अवैधरित्या वीज वापरणाऱ्याच्या विरोधात कारवाई करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यास मारहाण व शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याची घटना गुरुवारी घडली असून या प्रकरणात आरोपी शेख अब्रार चिस्ती याच्या विरुद्ध गणेशपेठ पोलिसांनी भादवि कलम 353 व 332 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
महावितरणच्या वतीने आरोपी विरोधात वीज चोरी प्रकरणी नियमानुसार एफआयआर दाखल करण्यात येणार आहे. तुळशीबाग उपविभागचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रसन्न श्रीवास्तव व सहाय्यक अभियंता आकाश गायमुखे यांच्या मार्गदर्शनाखाली गांधीबाग भागात वीज बिल थकबाकी वसुली मोहीम राबविण्यात येत आहे.
धक्काबुक्की, मारहाण अन् शिवीगाळ
गुरुवारी 18 ऑगस्टला भालदारपुरा येथील हकीमवाडा नजीकच्या रुईकर रोड येथे वीज बिल थकबाकी वसुली मोहीम राबवित असताना तंत्रज्ञ मुरलीधर निमजे यांना जैतुनासी शेख इनायत या ग्राहकाकडे असलेले वीज मीटर दुसऱ्याच्या नावाचे असून त्यावरून अवैधरित्या वीज वापर करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी निमजे यांनी ते मीटर जप्त केले असता आरोपी शेख अब्रार चिस्ती ने मुरलीधर निमजे यांना धक्काबुक्की, मारहाण तसेच शिवीगाळ केली.
सात दिवसांत नागपूर विभागाचा पीक नुकसानीचा अहवाल सादर करा, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे आयुक्तांना निर्देश
अजामीनपात्र व गंभीर स्वरूपाचा गुन्हा
या प्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी शेख अब्रार चिस्ती यांच्या विरोधात भादंवि कलम 353 व 332 नुसार गुन्हा दाखल केला आहे.महावितरणच्या वतीने विद्युत कायदानुसार वीज चोरीचा गुन्हा पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात येणार आहे. महावितरण अधिकारी-कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे हा दंडनीय अपराध आहे.भादवि कलम ३५३ नुसार शासकीय कामात अडथळा आणणे व मारहाण केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपीस 2 वर्षाची कारावासाची शिक्षा होऊ शकते.तर कलम ३३२ नुसार शासकीय कामकाजात अडथळा आणणे तसेच इजा होईल अशी मारहाण करणे या गुन्ह्यांचा समावेश असून त्याअंतर्गत 3 वर्ष व त्यापेक्षा अधिक अशा शिक्षेची तरतूद आहे. हे सर्व गुन्हे अजामीनपात्र व गंभीर स्वरूपाचे आहेत.
Mid Day Meal : पोषण आहाराच्या कंत्राटात हेराफेरी; दोन ठेकेदारांच्या संस्थेचा पत्ता एकच!
पत्रकारांसाठी एक दिवसीय ॲट्रासिटी कार्यशाळा
नागपूर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे संस्थेच्या वतीने बार्टी महासंचालक धम्मज्योती गजभिये यांच्या मार्गदर्शनात ‘महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांसाठी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 व सुधारित अधिनियम 2016’ अंतर्गत एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे नुकतेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उदघाटन जिल्हाधिकारी आर. विमला यांच्याहस्ते करण्यात आले. या कार्यशाळेस लाभलेले तज्ञ व्याख्याते माजी न्यायाधीश यशवंत चावरे यांनी कायद्याच्या तरतूदी, न्यायालयीन निर्णय व विविध उदाहरणांच्या आधारे मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात उच्च न्यायालय, नागपूरचे ॲङ फिरदोस मिर्झा यांनी पत्रकारांच्या दृष्टीकोनातून कायदा व नियम यावर विस्तृत मार्गदर्शन केले. कार्यशाळेस उपस्थित मान्यवरांचे स्वागत व आभार प्रदर्शन बार्टीच्या प्रशिक्षण विभाग प्रमुख ज्योत्सना पडियार यांनी केले.