Nagpur Teachers Constituency Elections : प्रचारासाठी उरले शेवटचे चार दिवस; मतविभाजनाचा धोका, अपक्ष उमेदवारांमुळे प्रस्थापितांना चिंता
भाजप समर्थित नागो गाणार यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेसह भाजपची फौज आहे. असे असले तरी गाणारांना तिसऱ्यांदा संधी दिल्याने पक्षांतर्गतच अनेकांची नाराजी कायम आहे.
![Nagpur Teachers Constituency Elections : प्रचारासाठी उरले शेवटचे चार दिवस; मतविभाजनाचा धोका, अपक्ष उमेदवारांमुळे प्रस्थापितांना चिंता Last Four days for promotion Danger of vote division in Nagpur tension for the established due to independent candidates Nagpur Teachers Constituency Elections : प्रचारासाठी उरले शेवटचे चार दिवस; मतविभाजनाचा धोका, अपक्ष उमेदवारांमुळे प्रस्थापितांना चिंता](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/18/3544e227fc967781d288fe22123369fe1674036863160129_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nagpur Teachers Constituency Elections Nagpur : नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक येत्या 30 जानेवारीला होत असून प्रचारासाठी आता केवळ चार दिवस उरले आहेत. यंदा 22 उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने प्रस्थापितांचेही टेंशन वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. शाळा-शाळांमध्ये जाऊन उमेदवार व त्यांचे समर्थक प्रचार करताना दिसत आहेत.
नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची घोषणा झाल्यापासून ही निवडणूक चर्चेत राहिली आहे. अवघ्या 40 हजारांच्या घरात मतदार असलेल्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत तब्बल 22 उमेदवार लढत देत असल्याने मोठ्या प्रमाणात मतविभाजनाचा धोका निर्माण झाला आहे.अशा परिस्थितीत पहिला पसंती कोटा पूर्ण करणे अवघड असल्याने धक्कादायक निकालाची शक्यता नाकारता येत नाही. तसेच जुन्या पेन्शन योजनेवरून भाजपला घेरण्याची तयारी अनेक उमेदवारांनी केली होती. मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुनी पेन्शन योजना सुरू करू, अशी ग्वाही नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मात्र उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात काही दिवसांपूर्वी ही योजना परत सुरु करण्यास असमर्थता दर्शविली होती.
बंडखोरीपासून वाचण्यासाठी भाजपने एक दिवसापूर्वी नागो गाणार (Nago Ganar) यांचे नाव जाहीर केले, तर काँग्रेसने शेवटपर्यंत तळ्यात- मळ्यात करून तसेच नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आणल्यानंतर सुधाकर अडबाले (Sudhakar Adbale) यांना समर्थन जाहीर केले आहे. शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे (Rajendra Zade), वंचित बहुजन आघाडीचे दीपककुमार खोब्रागडे (Dipakkumar Khobragade), आम आदमी पार्टीचे देवेंद्र वानखेडे (Devendra Wankhede) , बसपाच्या रिमा रंगारी, राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार सतीश इटकेलवार यांच्यासह सुमारे दोन डझन उमेदवार मतांचे गठ्ठे घेऊन बसले आहेत. ते फोडण्याची कसरत प्रस्थापितांना करावी लागणार आहे.
भाजप समर्थित नागो गाणार यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेसह भाजपची फौज आहे. असे असले तरी गाणारांना तिसऱ्यांदा संधी दिल्याने पक्षांतर्गतच अनेकांची नाराजी कायम आहे. त्यांच्या समर्थनाची घोषणा लांबवून भाजपने प्रत्यक्ष बंडखोरी होऊ दिली नाही, ही गाणार- यांच्यासाठी जमेची बाजू आहे. राजेंद्र झाडे यांनी जुनी पेन्शन योजना याचा भावनिक मुद्दा तयार करीत शिक्षकांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत् प्रचाराच्या माध्यमातून सुरू केला आहे.
अडबालेंना मिळेलेले समर्थनही चर्चेत
गाणारांसमोर अनेक आव्हाने असली, तर महाविकास आघाडीचे समर्थन लाभलेले सुधाकर अडबाले सहजासहजी जिंकून येतील, असे समजण्याचे कारण नाही. गंगाधर नाकाडे यांना उमेदवारी देऊन माघार घ्यायला लावल्याने शिवसैनिकांचा रोष काँग्रेसवर आहे. शिवसेनेचे नेते खुलेपणाने प्रचारात उतरल्याचे अद्यापही दिसत नाही. काल झालेल्या महाविकास आघाडीच्या जाहीर सभेला उद्धव ठाकरे यांच्या नेत्यांनी दांडी मारली. त्यामुळे सेनेचे मतदार अडबाले यांना धक्का देऊ शकतात. मागील निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले राजेंद्र झाडे यांच्यासाठी ही लढाई आरपारची आहे. शिक्षक भारतीचाही सर्व रोष काँग्रेसवरच आहे. दलित मतांवर दावा सांगणारे अनेक उमेदवारही रिंगणात आहेत. ही मते आघाडीकडे वळवण्यासाठी अडबाले यांना मोठी कसरत करावी लागणार आहे.
ही बातमी देखील वाचा...
Nagpur Crime : दोन वेळा केली चोरी, तिसऱ्यांदा आली अन् जाळ्यात अडकली; रेल्वे स्थानकावर आरपीएफकडून अटक
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)