एक्स्प्लोर

Nitin Gadkari Threat Calls : नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या शाकीरचे संबंध काश्मिरी दहशतवाद्याशी

Nitin Gadkari Threat Calls : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या जयेश पुजारी उर्फ शाकीरचे संबंध जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्याशी असल्याचं समोर आलं आहे.

Nitin Gadkari Threat Calls : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या जयेश पुजारी (Jayesh Pujari) उर्फ शाकीरचे संबंध जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्याशी असल्याचं समोर आलं आहे. शाकीरने नितीन गडकरी यांना दोन वेळा धमकी दिली होती. त्या शाकीरचे संबंध जम्मू-काश्मीरमधील कुख्यात दहशतवादी बशिरुद्दीन नूर अहमद उर्फ अफसर पाशा सोबतही होते, असं तपासात समोर उघडकीस आलं आहे. नितीन गडकरी यांच्या नागपुरातील कार्यालयात जानेवारी आणि मार्च महिन्यात जयेश पुजारीने धमकी दिली होती.केंद्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएकडून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.

अफसर पाशाला लवकरचा नागपुरात आणणार

बशिरुद्दीन नूर अहमद उर्फ अफसर पाशा हा 2012 मध्ये जम्मू काश्मीरमध्ये लष्कर ए तोयबासाठी दहशतवाद्यांच्या भरती प्रकरणातला दोष सिद्ध आरोपी आहे. तसंच बशिरुद्दीन नूर अहमद उर्फ अफसर पाशा हा बेंगलुरु बॉम्ब ब्लास्टमधील दोषी आहे. शिवाय तो ईडीच्या पीएलएमए कायदे अंतर्गतही मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी दोष सिद्ध आरोपी आहे. जयेश पुजारी चे बशुरुद्दीन नूर अहमद उर्फ अफसर पाशा या कुख्यात दहशतवाद्यासोबतच्या संपर्काचे काही ठोस पुरावे नागपूर पोलिसांना मिळाले आहेत. नागपूर पोलिसांनी गडकरी यांच्या कार्यालयात दिलेल्या धमकी प्रकरणी जयेश पुजारी विरोधात आधीच युएपीए अंतर्गत दोन गुन्हे दाखल केले आहेत. त्याच गुन्ह्यांमध्ये बशुरुद्दीन नूर अहमद उर्फ अफसर पाशाला सहआरोपी बनवण्यात आले आहे. सध्या बशिरुद्दीन नूर अहमद उर्फ अफसर पाशा बेळगावच्या हिंदलगा तुरुंगात कैदेत आहे. त्याला लवकरच नागपुरात आणले जाणार आहे.

गडकरींनाच धमकी का, आरोपी पुजारीने कारण सांगितलं

दरम्यान नितीन गडकरी यांना धमकी का दिली याचा गौप्यस्फोट आरोपी जयेश पुजारीने चौकशीदरम्यान केला आहे. जर, 'पीएफआय'वर बंदी येऊ शकते, तर 'आरएसएस' वर बंदी का नको? गडकरी हे संघाच्या फार जवळचे म्हणून त्यांना धमकी दिली असल्याचे पुजारी याने चौकशीत सांगितले असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांनी 'एबीपी माझा'ला दिली आहे. बेळगावच्या तुरुंगातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाच धमकी का दिली गेली, असा प्रश्न उपस्थित करण्यात आल होता. आरोपी जयेश उर्फ शाकीरच्या गेल्या दोन महिन्याच्या तपासातून धक्कादायक बाब समोर आली आहे. 

तुरुंगातून फोन करुन जीवे मारण्याची धमकी

जयेश पुजारी उर्फ शाकीर याने 14 जानेवारी आणि 21 मार्च रोजी नितीन गडकरी यांच्या नागपुरातील जनसंपर्क कार्यालयात फोन करुन पहिल्यांदा शंभर कोटी आणि दुसऱ्यांदा दहा कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. ती न दिल्यास गडकरी यांना जीवे मारण्याची ही धमकी जयेशने दिली होती. नागपूर पोलिसांच्या तपासात धमकीचे हे कॉल बेळगाव तुरुंगातून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. धमकीच्या दोन्ही प्रकरणी नागपूर पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले होते नंतर दोन्ही गुन्ह्यांमध्ये यूएपीए ही लावण्यात आलेला होता.

हेही वाचा

मला पुन्हा बेळगाव जेलमध्ये पाठवा, गडकरींच्या कार्यालयात फोन करुन धमकी देणाऱ्या जयेश पुजारीची हायकोर्टात याचिका

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget