एक्स्प्लोर

भारतीय सैन्य चीनच्या कुरापतींचा सामना करत असताना तरुणाई मात्र चिनी टिकटॉकच्या जाळ्यात!

चीनच्या सीमेवर भारतीय सैन्य चीनच्या कुरापतींचा सामना करत असताना तरुणाई मात्र चिनी टिकटॉकच्या जाळ्यात अडकलेली दिसत आहे. नागपुरात तर गुन्हेगारांनी आणि गुन्हेगारीचं आकर्षण असलेल्या तरुणांनी टिकटॉकच्या माध्यमातून आपली दबंगगिरी प्रस्थापित करण्याचा, एकमेकाना धमकावण्याचा सपाटा लावला आहे.

नागपूर : चीनच्या सीमेवर भारतीय सैन्य चीनच्या कुरापतींचा सामना करत असताना तरुणाई मात्र चिनी टिकटॉकच्या जाळ्यात अडकली आहे. नागपुरात तर गुन्हेगारांनी आणि गुन्हेगारीचा आकर्षण असलेल्या काही तरुणांनी टिकटॉकच्या माध्यमातून आपली दादागिरी प्रस्थापित करण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे अनेक नागपूरकरांनी गुन्हेगारीसाठी टिकटॉकच्या अशा वापराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत पोलिसांनी याकडे लक्ष घालण्याची मागणी केली आहे.

नागपूरच्या तरुणांच्या टिकटॉक व्हिडीओमध्ये चित्रपटांच्या डायलॉगवर तरुण ऐकमेकांना मारण्याची धमकी देत आहेत. काहींना त्यांना आलेल्या वाईट कमेंटचा वचपा काढायचा आहे. तर काही तर नागपूरला क्राईम सिटी म्हणून थेट पोलिसांनाच आव्हान देत आहेत. त्यामुळे नागपुरात टिकटॉकच्या माध्यमातून भविष्यातील गुन्ह्यांचा बीजारोपण होतंय की काय अशी शंका निर्माण झाली आहे. सध्या नागपुरात सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ वायरल होत असल्याने सामान्य नागपूरकरांनी त्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पोलिसांनी याकडे लक्ष घालावे अशी मागणी समोर येऊ लागली आहे.

पोलिसांची वर्दी घालून टिक टॉक बनवणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल

टिकटॉकचा दहशत निर्माण करण्यासाठी वापर सोशल मीडियावर गुन्हेगारांचे असे अनेक व्हिडिओ वायरल होत असल्याने सध्या काही महाविद्यालयीन तरुणही त्याच्याच पावलांवर पाऊल ठेवत तसेच व्हिडीओ बनवून एकमेकांना पाठवत आहेत. दुसरकीकडे अनेक तरुणींनी आपली दबंगगिरी दाखवण्यासाठी टिकटॉकचा आधार घेतला आहे. मानसोपचार तज्ज्ञांना मात्र तरुणाईकडून टिकटॉकचा गुन्हेगारीसाठीचा किंवा आपली दहशत निर्माण करण्यासाठीचा वापर जास्त धोकादायक वाटतोय. नागपूर सारख्या शहरात जिथे आधीच गुन्हेगारीच्या घटना जास्त आहेत. तिथली तरुणाई जर अशा नकारात्मक स्वरूपात सोशल मीडियाचा वापर करणार असेल तर भविष्यात याच माध्यमातून आणखी गुन्हे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मानसोपचार तज्ज्ञांचे मत आहे.

दुसऱ्या बाजूला तज्ज्ञांना टिकटॉक भारतीय तरुणांची माथी फिरवण्याचा माध्यम वाटतंय. आयटी तज्ज्ञांच्या मते सोशल मीडियावर बहुतांशी व्हिडीओ किंवा पोस्ट फक्त लाईक्स/पसंती मिळवण्यासाठी पोस्ट केल्या जातात. नेमकं हेच लक्षात घेऊन टिकटॉकने त्यांच्या प्लॅटफॉर्मवर फक्त लाईक्सचेच पर्याय उपब्ध करून दिले आहे. जर तुम्हाला एखादा व्हिडिओ आवडला नाही तर तुम्ही टिकटॉकवर त्याला डिसलाईक/नापसंत करू शकत नाही. कारण तिथे नापसंतीचे पर्याय दिलेलेच नसते. त्यामुळे टिकटॉक वापरणाऱ्याला तो काय चूक करत आहे हे कधी ध्यानीच येत नाही.

या आधी पण नागपुरात सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐकमेकांना दिलेल्या आव्हानातून गुन्हे घडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे सध्या टिकटॉकच्या माध्यमातून सुरू झालेल्या धमकीवजा व्हिडीओ पोस्ट करण्याची ही मालिका नागपूर पोलिसांनी खंडित करण्याची गरज आहे.

India China Dispute | भारत-चीनच्या मेजर जनरल स्तरावरच्या अधिकाऱ्यांमध्ये आज बैठक

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Cyber Crime: शिंदे पिता-पुत्रांविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला शिवसेनेची लीगल टीम धडा शिकवणारा; नागपुरात पहिली तक्रार, 8 जणांविरोधात गुन्हा दाखल
शिंदे पिता-पुत्रांविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला शिवसेनेची लीगल टीम धडा शिकवणारा; नागपुरात पहिली तक्रार, 8 जणांविरोधात गुन्हा दाखल
Nagpur Police: नायलॉन मांजाने पतंग उडवणाऱ्यांची आता खैर नाही! IPS विश्वास नांगरे पाटील अॅक्शन मोडमध्ये! विक्रेत्यांसह अल्पवयीन मुलांच्या पालकांना इशारा, थेट...
नायलॉन मांजाने पतंग उडवणाऱ्यांची आता खैर नाही! IPS विश्वास नांगरे पाटील अॅक्शन मोडमध्ये! विक्रेत्यांसह अल्पवयीन मुलांच्या पालकांना इशारा, थेट...
Nagpur Crime News: नागपूर हादरलं! एमडी ड्रग्स तस्करीच्या वादातून कुख्यात गुंडाच्या साथीदारावर पाच जणांचा प्राणघातक हल्ला; बचावासाठी धावलेल्या मित्रालाही मारहाण
नागपूर हादरलं! एमडी ड्रग्स तस्करीच्या वादातून कुख्यात गुंडाच्या साथीदारावर पाच जणांचा प्राणघातक हल्ला; बचावासाठी धावलेल्या मित्रालाही मारहाण
Abhijeet Dipke: गोकुळच्या राजकारणात अभिजीत दिपकेंची उडी; सतेज पाटलांच्या आरोपांवर बोट ठेवत नागपुरातून सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, वकिलाला 80 लाख रुपये मोजले अन् शेतकऱ्यांना..
गोकुळच्या राजकारणात सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची उडी; सतेज पाटलांच्या आरोपांवर बोट ठेवत नागपुरातून सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, वकिलाला 80 लाख रुपये मोजले अन् शेतकऱ्यांना..

व्हिडीओ

Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MPSC Group C Extension : एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
Brijesh Singh Ai Governance : एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
Social Stock Exchange : मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
चंद्रपूरमध्ये नगरसेवकांचे मानधन दुप्पटीने वाढले; पैशासाठी सर्वपक्षीय एकटवले, महापालिकेत गुण्यागोविंदाने मंजुरी
चंद्रपूरमध्ये नगरसेवकांचे मानधन दुप्पटीने वाढले; पैशासाठी सर्वपक्षीय एकटवले, महापालिकेत गुण्यागोविंदाने मंजुरी
RJD Delimitation Bill Support : मोठी बातमी! इंडिया आघाडीत मोठी फूट, तेजस्वी यादवांच्या RJD चा मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा, भाजपची ताकद वाढली?
मोठी बातमी! इंडिया आघाडीत मोठी फूट, तेजस्वी यादवांच्या RJD चा मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा, भाजपची ताकद वाढली?
Embed widget