पोलिसांची वर्दी घालून टिक टॉक बनवणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल
टिक टॉक वरील एका व्हायरल व्हिडीओने पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला आहे. एका महिलेन टिक टॉक वर गाणं तयार करण्यासाठी चक्क मिरा रोड पोलीस ठाण्यातील एका पोलीस कॉन्स्टेबलचा खाकी ड्रेस वापरल्याच समोर आलं आहे.
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देवदूत बनून, महाराष्ट्र पोलीस आपल्या जीवाची पर्वा न करता चोख बंदोबस्त करत आहेत. एकीकडे जनसामान्यात पोलिसांच्या खाकी बद्दल सन्मान वाढत असताना, टिक टॉक वरील एका व्हायरल व्हिडीओने पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला आहे. एका महिलेन टिक टॉक वर गाणं तयार करण्यासाठी चक्क मिरा रोड पोलीस ठाण्यातील एका पोलीस कॉन्स्टेबलचा खाकी ड्रेस वापरल्याच समोर आलं आहे.
मिरा रोड पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल विजय ब्राम्हणे यांचा खाकी ड्रेस घालून त्यांची मैञिण आलिया शेख हिने चक्क कारमध्ये हिंदी गाण्यावर तीन टिक टॉक व्हिडीओ बनवले होते. 8 आणि 10 मे रोजी तिने हे तीन व्हिडीओ आपल्या टिक टॉक वरील @tammanna64478301 या अकाऊंटवर व्हायरलं केलं. त्यानंतर जनसामान्यातून संतप्त प्रतिक्रीया उमटल्या होत्या. हा व्हिडीओ व्हायरल होताच पोलीस अधीक्षकांनी त्याची गंभीर दखल घेत. या प्रकरणाचे चौकशीचे आदेश मीरारोड पोलिसांना दिले होते.
याप्रकरणी आता मिरा रोड पोलिसांनी प्रथमदर्शनी व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या महिलेवर भादंविसं मधील कलम 416, महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 मधील कलम 149 व गोपनीय कायदा 1923 मधील कलम 6 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. यात पोलीस कर्मचारी किती दोषी आहे. याची चौकशी करुन, त्यानंतर त्यावर ही कारवाईचे संकेत वरिष्ठांनी दिले आहेत. कोरोनाच्या जागतिक संकटाशी सामना करताना सर्व पोलीस यंञणा दिवसराञ राबत असताना, काही पोलीस कर्मचा-याच्या चुकीच्या वर्तणाने खाकीला बट्टा लागत असल्याची प्रतिक्रीया उमटत आहे.
संबंधित बातम्या :
मीरा रोड पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी कोरोनामुक्त