RTMNU Hostel : वसतिगृहाचे प्रवेश खोळंबल्याने गैरसोय, नियमित वर्ग सुरु मात्र हॉस्टेल प्रवेश बंद
आता वर्ग सुरु झाले असताना, विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेश प्रक्रियेसाठी भटकंती करावी लागत आहे.त्यामुळे अभ्यासाचेही नुकसान होत आहे. त्याचबरोबर वसतिगृहांअभावी अनेक विद्यार्थी वर्गही करत नाहीत.
नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या (RTMNU) अमरावती मार्गावरील महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक संकुलात वर्ग सुरू (Regular Classes) झाले असले तरी अद्याप वसतिगृहातील (Hostel Admission) प्रवेश देण्याची प्रक्रिया बंदच आहे. विद्यापीठ प्रशासन आणि वसतिगृह अधीक्षक यांच्यात समन्वय नसल्यामुळे बाहेरून जिल्ह्यातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रचंड गैरसोयींचा समाना करावा लागत आहे.
विद्यापीठ परिसरात 38 पदव्युत्तर (post graduate department) विभाग आहेत. येथे हजारो विद्यार्थी प्रवेश घेतात. बहुतांश विद्यार्थी विदर्भातील (Students from all over vidarbha) विविध जिल्ह्यातील आहेत. विद्यापीठाची शहरात 4 वसतिगृहे (Hostels) आहेत. वसतिगृहात प्रवेश मिळेल या आशेने विद्यार्थी प्रवेश घेतात. सामान्य घरातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना बाहेर भाड्याने खोली घेणे शक्य होत नाही. रोज येणे जाणेही अशक्य आहे. वसतिगृहात राहणे कमी खर्चिक (Less Expensive) असल्याने विद्यार्थी येथेच प्रवेश घेतात. विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागातील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी अद्याप वसतिगृहातील प्रवेश खोळंबलेलेच आहेत.
वर्ग सुरु मात्र हॉस्टेल प्रवेश नाही
वसतीगृहासाठी केवळ अर्ज स्वीकारले (application accepting) जात आहेत. प्रवेश प्रक्रिया कधीपर्यंत पूर्ण होईल, ते सध्याच सांगता येत नाही. शहरात राहण्याचीही सोय नाही, अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासावर पाणी सोडावे लागत आहे. यंदा विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागांना (Educational Department) स्वायत्तता देण्यात आली आहे. त्यामुळे यंदा वसतिगृह अधीक्षकांशी समन्वय साधणे आवश्यक होते. मात्र, प्रवेश प्रक्रिया पूर्ण होताच 1 सप्टेंबरपासून विभागात वर्ग सुरू झाले आहेत. वसतिगृहात प्रवेश न मिळाल्याने प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना (First Year Students) अडचणी येत आहेत. विद्यापीठाकडे पुरेसा वेळ होता, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. प्रवेश प्रक्रिया सुरू झाली तेव्हाच नोंदणी सुरू व्हायला हवी होती. तसेच, प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वसतिगृह प्रवेशाची यादी लावायला हवी होती. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही सोपे जाईल. आता अभ्यास सुरू झाला आहे, अशा स्थितीत विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेश प्रक्रियेसाठी भटकंती करावी लागत आहे.त्यामुळे अभ्यासाचेही नुकसान होत आहे. त्याचबरोबर वसतिगृहांअभावी अनेक विद्यार्थी वर्गही करत नाहीत. या संपूर्ण प्रकरणात विद्यापीठाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
मोहालीमध्ये 60 विद्यार्थीनींचे आंघोळ करतानाचे व्हिडीओ व्हायरल, एका मुलीनेच व्हायरल केले व्हिडीओ
...आणि राज ठाकरेंनी नागपुरात पोहोचताच चिमुकल्याचा हट्ट पुरवला, पण आधी दिले 'हे' निर्देश
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI