एक्स्प्लोर

गृहमंत्री देशमुख म्हणतात नागपुरात गुन्हेगारी संपली.. मात्र, दिवाळीच्या काळात 12 दिवसांत 9 खून

गृहमंत्री अनिल देशमुख म्हणतात नागपुरात गुन्हेगारी संपली. मात्र, दिवाळीच्या काळात 12 दिवसांत 9 खूनाच्या घटना घडल्या आहेत.नागपूर पोलिसांनी कार्यपद्धतीचा आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

नागपूर : नागपुरात गुन्हेगारी संपली असे गृहमंत्री अनिल देशमुख जरी म्हणत असले तरी वारंवार घडणाऱ्या गुन्हेगारीच्या गंभीर घटना पाहता त्यांचा दावा पोकळ असल्याचे दिसून येत आहे. नागपूर शहर आणि ग्रामीणमध्ये दिवाळीच्या आधी आणि नंतर अवघ्या 12 दिवसात हत्येच्या 9 घटना घडल्या आहेत. कुठे गँगवॉर तर कुठे पैसे वसुलीसाठी गोळीबार होत आहे. त्यामुळे गृहामंत्र्यांच्याच जिल्ह्यात कायद्याच्या राज्याला गुन्हेगारीचा सुरुंग लागल्याचे चित्र आहे.

सुशीला ढोबळे यांनी नागपूरच्या गुन्हेगारीत त्यांचा वृद्धापकाळाचा आधार गमावला आहे. भाजीचा ठोक व्यवसाय करणारे उमेश ढोबळेची काल (बुधवार) बेसा पॉवर हाऊस चौकाजवळ गोळी झाडून हत्या करण्यात आली. उमेश यांचे भाजीच्या व्यवसायातून अनेकांसोबत पैशाचे व्यवहार होते. आरोपींना उमेशकडून 6 लाख रुपये घ्यायचे होते. त्याच वादातून उमेश यांची हत्या झाल्याचे आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे. मात्र, उमेशच्या आईने हे सर्व आरोप फेटाळले आहे. एवढ्या मोठ्या रकमेचा वाद कधीच उमेशने घरी सांगितला नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

रस्त्याच्या कडेला उभे राहून मैत्रीणीची वाट पाहणाऱ्या अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन बलात्कार

दरम्यान या घटनेचा पोलिसांनी दिलेला तपशील अंगावर शहारे आणणारा आहे. उसनवारीचे पैसे वसूल करण्यासाठी आरोपी शाकिर हसन आणि सय्यद जमील यांनी आशीर्वाद नगरच्या गार्डन जवळ बोलावले. उमेश तिथे पोहोचल्यावर शाकिर उमेशच्या काळ्या रंगाच्या अॅक्टिव्हाच्या मागे बसून पुढे चालण्यास सांगितले. उमेशने थोड्या अंतरापर्यंत अॅक्टिव्हा नेताच पाठीमागे बसलेल्या शाकिरने जवळच्या पिस्तूलने उमेशच्या डोक्यावर गोळी झाडली. उमेश खाली कोसळतात आरोपींनी दुसऱ्या दुचाकीने पळ काढला.

दरम्यान, दिवाळीच्या काळात नागपुरात घडलेली गुन्ह्याची ही एकमेव घटना नाही. तर गुन्हेगारांनी चक्क रक्तरंजित दिवाळी साजरी केल्याचे दिसून येत आहे.

गेल्या 12 दिवसात घडलेले गंभीर गुन्हे

  • 18 नोव्हेंबर 2020 सक्करदरा - गोळीबारीत भाजी विक्रेता उमेश ढोबळे याची हत्या.
  • 17 नोव्हेंबर 2020 यशोधरा नगर - मोहम्मद तहसीन या तरुणाची चाकू भोसकून हत्या.
  • 16 नोव्हेंबर 2020 कुही - ठवकर टोळीतील कृणाल ठाकरे आणि सुशील बावने या दोघांची हत्या, टोळीयुद्धातून ही हत्या झाली.
  • 14 नोव्हेंबर 2020
  • कपिल नगर - संतोष श्रीवास्तव या 60 वर्षीय चौकीदाराची हत्या.
  • 12 नोव्हेंबर 2020
  • सावनेरमध्ये विशाल शाही या महाविद्यालयीन तरुणाची संशयास्पद हत्या.
  • 12 नोव्हेंबर 2020 मार्टिननगर भागातून एका 15 वर्षीय मुलीचे अपहरण करून दोघांनी तिला गोरेवाडाच्या जंगलात नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
  • 10 नोव्हेंबर 2020 हिंगणा - विनीत बनसोड या तरुणाची हत्या.
  • 10 नोव्हेंबर 2020 प्रतापनगर - अनिल पालकर यांची संपत्तीच्या वादातून हत्या.
  • 8 नोव्हेंबर 2020

एमआयडीसी भागात अंगावर चिखल उडाला एवढ्या वादातून गुन्हेगारी वृत्तीच्या आरोपीने एका मजुराची हत्या केली. याच्या शिवाय याच कालावधीत हत्येचे प्रयत्न, चोरी, घरफोडी, खंडणी वसूल करण्यासाठी हल्ले अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागपुरात दिवाळीचा काळ सामान्य नागरिकांसाठी कसा गेला असेल याचा अंदाज लावणे कठीण नाही. नागपूरच्या गुन्हेगारीची जाण असलेल्यांच्या मते नागपुरात पोलिसांचे दावे आणि गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गुन्हेगार दत्तक योजना सारखे केले जाणारे उपाय सपशेल अपयशी ठरत आहेत, त्यामुळे पोलिसांनी आपल्या कार्यशैलीचा फेरआढावा घेण्याची गरज आहे.

विरोधकांनी नागपूरच्या ढासळत्या कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्याला अलगद उचलले आहे. राजकीय द्वेषातून समाज माध्यमांवर सरकार विरोधात भूमिका घेणाऱ्यांवर कारवाई करणारं सरकार गुन्हेगारांवर कारवाई करायला धजावत नाही असा आरोप भाजपने केला आहे. दरम्यान याच काळात नागपुराच्या कळमना परिसरात कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर ही लोकांनी हल्ला चढविल्याची घटना घडली आहे. त्यामुळे नागपुरात वाढत्या गुन्हेगारी संदर्भात पोलिसांना दोष देणाऱ्या नागपूरकरांनी ही स्वतःच्या वागणुकीचा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vikas Thakre : आमची स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण : काँग्रेस आमदार विकास ठाकरेAnjali Damania on Dhananjay Munde :मुंडेंच्या विरोधात पुरावे सादर केलेत;अजितदादा म्हणालेत,निर्णय घेऊJob Majha : जॉब माझा : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथे विविध पदांसाठी नोकरीच्या संधी :  ABP MajhaGuardian Minister : नावं गायब करण्यात, तटकरेंचा हातखंड शिंदेंचे आमदार गोगावले,थोरवे,दळवींचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Bhandara : 62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Nashik Guardian Minister : एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
Embed widget