एक्स्प्लोर

वर्ध्यातील पीडितेची प्रकृती स्थिर तरी चिंताजनक; उद्या पुन्हा शस्त्रक्रिया

वर्ध्यातील पीडितेची प्रकृती जैसे थे असून उद्या पुन्हा शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय. पीडित तरुणीवर बुधवारी शस्त्रक्रिया करण्यात आली असून उद्याही तिच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

नागपूर : वर्ध्यात एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. या घटनेनंतर आजही पीडितेची प्रकृती गंभीर आहे. त्वचा जळाली आहे. तर श्वसनप्रक्रियेवरही परिणाम झालाय. पीडितेची प्रकृती स्थिर असली तरी चिंताजनक आहे. दर एक दिवसाआड तिची ड्रेसिंग करत असल्याची माहिती संबंधीत डॉक्टरांनी दिलीय. वर्धा जळीतकांड प्रकरणातील पीडितेला वाचवण्यासाठी नागपुरातील ऑरेंज हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

पीडित तरुणीवर काल (5 फेब्रुवारी) शस्त्रक्रिया करण्यात आली. उद्याही (7 फेब्रुवारी)तिच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. सध्या तरुणीची प्रकृती स्थिर असून ती उपचाराला प्रतिसाद देत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. डॉ. दर्शन रेवनवार आणि डॉ. राजेश अटल यांनी आज सकाळी पीडितेच्या प्रकृतीची माहिती माध्यमांना दिली.

काय म्हणाले डॉक्टर्स? - डोळ्याची सूज कमी झाली असली तरी ती पूर्णपणे पाहू शकत नाहीये. चेहरा मोठ्या प्रमाणावर जळाला आहे, इमोशनचे काही मसल्स असतात, तेही जळाले आहे, कदाचित पुढे शस्त्रकिया करून तिचा चेहरा ठीक करू शकू मात्र चेहऱ्यावरचे इमोशन पुन्हा आणू शकणार नाही. बुधवारी तिच्या उजव्या हातावर शस्त्रक्रिया करावी लागली आहे, घटनेच्या वेळी स्वतःला वाचवण्यासाठी तिने उजवा हात समोर केला असेल. तेव्हा ज्वाळांनी तिचा हात आत हाडापर्यंत जळाला आहे. त्यामुळे भविष्यात तिच्या हातांची आणि बोटांची भविष्यात हालचाल होईल की नाही, याची चिंता असल्याने बुधवारी तिची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याचे परिणाम उद्या लक्षात येतील असे डॉक्टरांनी सांगितले.

महाराष्ट्रात 'दिशा' कायदा आणण्यासाठी हालचालींना वेग

दरम्यान तिच्या शरीरात संक्रमण होत असल्याचे पहिले संकेत मिळत आहे. भाजलेल्या रुग्णांना संक्रमण होतं असल्याचे डॉक्टर म्हणाले. कालच्या तुलनेत पीडितेचे हार्ट रेट वाढले आहेत. औषध बदलवले असून अँटी बायोटिकचे डोस वाढवल्याचे त्यांनी सांगितले. हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे रक्त देणार असल्याचंही डॉक्टर म्हणाले. संक्रमण टाळण्यासाठी सध्या तिला स्वतंत्र आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. व्हेंटिलेटरची गरज अद्यापतरी वाटत नाही. मात्र, श्वसन संस्थेत संक्रमण झाले तर केव्हाही व्हेंटिलेटरची गरज पडू शकते. त्यासाठी पूर्ण तयारी केल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

Wardha Bandh | हिंगणघाट जळीतकांडाच्या निषेधार्थ आज वर्धा बंद

जळीतकांडाच्या निषेधार्थ आज वर्धा बंद - हिंगणघाट जळीतकांडाचे पडसाद आता सर्वत्र उमटायला सुरुवात झाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आता वर्धा बंदची हाक देण्यात आली आहे. सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत हा बंद पाळला जाणार आहे. 11 वाजता वर्ध्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळून या मोर्चाला निघाला. राजकीय पक्ष आणि विविध सामाजिक संघटना या बंदमध्ये सहभागी झाल्या आहेत.

Kopardi Nirbhaya's Family | 'नराधमांना जनतेच्या ताब्यात द्या' हिंगणघाट सिल्लोडमुळे कोपर्डीतल्या निर्भयाच्या आई-वडिलांचा संताप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll: विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, महाविकास आघाडीसाठी आनंदाची बातमी
विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, मविआसाठी आनंदाची बातमी
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Embed widget