Wardha Bandh | हिंगणघाट जळीतकांडाच्या निषेधार्थ आज वर्धा बंद
हिंगणघाट इथल्या जळीतकांडाच्या निषेधार्थ वर्धा बंदच आवाहन करण्यात आलं आहे. सकाळी 11 ते 2 पर्यंत हा बंद आहे. राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांचा सहभाग आहे.
वर्धा : हिंगणघाट जळीतकांडाचे पडसाद आता सर्वत्र उमटायला सुरुवात झाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आता हिंगणघाटनंतर वर्धा बंदची हाक देण्यात आली आहे. सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत हा बंद पाळला जाणार आहे. 11 वाजता वर्ध्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळून या मोर्चाला निघाला. राजकीय पक्ष आणि विविध सामाजिक संघटना या बंदमध्ये सहभागी झाल्या आहेत.
हिंगणघाट इथे 3 फेब्रुवारी रोजी विकेश नगराळे या नराधमाने पेट्रोल टाकून तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेचे पडसाद संबंध देशभर उमटत आहेत. महाविद्यालयीन तरुणी, स्त्रियांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आरोपीला शिक्षा व्हावी आणि पीडितेसह तिच्या कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळावा, यांसारख्या मागण्यांसाठी आज हा बंद पुकारण्यात आला आहे. तसंच मोर्चाही आयोजित केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करुन या मोर्चाला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी पुतळा मेन रोड मार्गे निर्मल बेकरी चौक ते अंबिका उपहार गृह चौक ते इतवारा रोड ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक इथे बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करुन या मोर्चाचा समारोप होईल. या मोर्चामध्ये वर्ध्यातील शाळा, महाविद्यालयातील तरुण-तरुणी, शिक्षक-शिक्षिका तसंच व्यापारी प्रतिष्ठानने सहभागी व्हाव असं आवाहन करण्यात आलं आहे.
हिंगणघाट जळीतकांडातील आरोपीची आई म्हणते मी पीडितेला भेटायला जाणार, तर पत्नी म्हणते...
कायद्यात बदल करण्याची गरज : बच्चू कडू हिंगणघाट जळीतकांडासारखं प्रकरण पाहता कायद्यात बदल करण्याची गरज असल्याचं राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले. बच्चू कडू यांनी आज पीडित तरुणीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी कायद्यात बदल करण्याची गरज असल्याचं म्हटलं. तसंत कुटुंबीयांचं आर्थिक पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करु असंही ते म्हणाले.
महाराष्ट्रात दिशा कायदा आणणार : गृहमंत्री हिंगणघाट, औरंगाबदसह महिलांवरच्या इतर अत्याचाराच्या घटनांबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करुन जलद कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. तर आंध्र प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही दिशा कायदा आणणार असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुखांनी सांगितलं.
हिंगणघाट येथील जळीत तरुणीच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून
तरुणीची प्रकृती स्थिर हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील पीडितेला वाचवण्यासाठी नागपुरातील ऑरेंज हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. पीडित तरुणीवर काल (5 फेब्रुवारी) शस्त्रक्रिया करण्यात आली. उद्याही (7 फेब्रुवारी) तिच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. सध्या तरुणीची प्रकृती स्थिर असून ती उपचाराला प्रतिसाद देत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
तरुणीच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून सर्वधर्मियांकडून प्रार्थना सुरु आहेत. तर दुसरीकडे जळीतकांडातील आरोपी विकेश नगराळेला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी म्हणून राज्य सरकारने देखील पावलं उचलली आहेत. कुटुंबियांच्या मागणीनंतर हा खटला चालवण्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या
हिंगणघाट जळीतकांड प्रकरण; आरोपीला 10 मिनिटासाठी ताब्यात द्या, नातेवाईकांची संतप्त प्रतिक्रिया
हिंगणघाटमधील पीडितेची प्रकृती गंभीर, कृत्रिमरित्या श्वासोच्छवास, डॉक्टरांची माहिती
जालना प्रकरण | आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी, वकील संघाकडून आरोपीचे वकीलपत्र न घेण्याचा निर्णय