एक्स्प्लोर

Winter Assembly Session : गेल्या तीन दिवसांत निम्म्या आमदारांना सर्दी अन् खोकला

वृत्त लिहीपर्यंत सुमारे 700 जणांनी विधानभवन कार्यालय परिसरातील आरोग्य केंद्रावर तपासणी केली. तसेच एका व्यक्तीची आरटीपीसीआर चाचणी आणि चौघांची रॅपिड अॅन्टीजेन चाचणी करण्यात आली आहे.

Maharashtra Assembly Winter Session : आठवड्याभरापासून नागपूरसह (Nagpur) विदर्भात सध्या कडाक्याची (Vidarbha Winter) थंडी आहे. तसेच नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter Assembly Session) सुरू आहे. अधिवेशनासाठी राज्यभरातून मंत्री आमदार नागपुरात दाखल असून थंडीपासून बचाव करणारे कपडे घातलेले दिसतात. अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. गेल्या तीन दिवसांत निम्म्या आमदारांना (MLA) सर्दी आणि खोकला झालेला आहे. वृत्त लिहीपर्यंत सुमारे 700 जणांनी आरोग्य केंद्रावर तपासणी केली आहे. तसेच एका व्यक्तीची आरटीपीसीआर चाचणी आणि चौघांची रॅपिड अॅन्टीजेन चाचणी करण्यात आली आहे.

सर्दी, खोकल्यासह काही आमदारांना तापसुद्धा आलेला आहे, तर काहींना मधुमेह (Diabetes) आणि उच्च रक्तदाबाचीही (BP) समस्या सतावत आहे. विधानभवन परिसरात सुमारे 700 जणांची तपासणी आतापर्यंत झालेली आहे. कडाक्याच्या थंडीत दोन्ही सभागृहाचे वातावरण तापत आहे. तसा काही आमदारांनाही ताप आला आहे. नागपुरात किमान तापमान 14 अंश सेल्सिअसच्या जवळपास राहात आहे. मुंबईच्या लोकांना या थंडीची सवय नाही. त्यामुळे नागपूर अधिवेशनात काम करताना त्यांना त्रास होत आहे. 

कर्मचाऱ्यांनाही थंडीचा फटका

काल बुधवारपासून सकाळी 9 वाजता कामकाज सुरु होत आहे. त्यामुळे 8 ते 8.30 वाजल्यापासूनच आमदार विधानभवन इमारतीच्या परिसरात येण्यास सुरुवात होते. थंडीमुळे गरम कपडे परिधान करुन ही मंडळी वावरताना दिसतात. दुपारी 12 वाजल्यानंचर थंडी कमी होते. नंतर सायंकाळी 5.30 ते 6 वाजता पुन्हा थंडी जोर पकडते. कमी तापमानाची सवय असलेल्या विदर्भातील आमदारांना थंडीचा जास्त त्रास होत नसला, तरी राज्याच्या इतर भागातील, त्यातल्या त्यात मुंबईतील लोकांना मात्र नागपुरातील थंडीने चांगलेच त्रस्त केले आहे. 

आरोग्य केंद्रावर करोना चाचणी

आमदारांसह इतर कर्मचाऱ्यांनी विधानभवन इमारत परिसरात असलेल्या आरोग्य केंद्रावर तपासण्या करुन घेतल्या. येथे कोरोनाची तपासणी करण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या केंद्रावर आमदारांसह अधिकारी कर्मचारीसुद्धा तपासण्या करताना दिसतात. काल सभागृहात कोरोनाचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर तपासणी करुन घेण्याकडे सर्व जण जातीने लक्ष देताना दिसतात. शहरातील वातावरण थंड होत असताना सभागृहातील वातावरण मात्र दररोज तापत आहे. सलग चौथ्या दिवशीही मविआ आणि सत्ताधारी एकमेकांसमोर आमने-सामने आले.

ही बातमी देखील वाचा

Nitesh Rane On Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा, सत्य बाहेर येईल : नितेश राणे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भटक्या कुत्र्यांचा हौदास; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हौदास; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
विधानसभा निवडणुकीच्या तयारीली वेग, निवडणूक आयोग लागले कामाला
विधानसभा निवडणुकीच्या तयारीली वेग, निवडणूक आयोग लागले कामाला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Wadettiwar On Pune Drugs : कोणालाही कायद्याचा धाक राहिलेला नाही, विजय वडेट्टीवार सभागृहात आक्रमकSambhuraj Desai on Vidhan Sabha : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणाVijay Wadettiwar Assembly Session : शेतकऱ्यांवर GST लावला, मध्ये बोलू नका... वडेट्टीवार कुणावर भडकलेCM Eknath Shinde on Drugs : ड्रग्ज संपेपर्यंत कारवाई थांबणार नाही - एकनाथ शिंदे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भटक्या कुत्र्यांचा हौदास; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हौदास; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
विधानसभा निवडणुकीच्या तयारीली वेग, निवडणूक आयोग लागले कामाला
विधानसभा निवडणुकीच्या तयारीली वेग, निवडणूक आयोग लागले कामाला
''फडणवीसांच्या भाषेत बोलायचं तर, खोटं नेरेटिव्ह पसरवणारं बजेट; अर्थसंकल्पावर ठाकरेस्टाईल टोला
''फडणवीसांच्या भाषेत बोलायचं तर, खोटं नेरेटिव्ह पसरवणारं बजेट; अर्थसंकल्पावर ठाकरेस्टाईल टोला
Asha Bhosle : माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
Embed widget