एक्स्प्लोर

Nitesh Rane On Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा, सत्य बाहेर येईल : नितेश राणे

जशी श्रद्धा हत्या प्रकरणी आफताबची नार्कोटेस्ट होते, तशीच आदित्य ठाकरे यांची एकदा नार्को टेस्ट करा, सुशांत आणि दिशा मृत्यू प्रकरणी पूर्ण सत्य बाहेर येईल: नितेश राणे

Nitesh Rane On Aaditya Thackeray : अभिनेते सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आणि दिशा सालियान (Disha Salian) यांचे मृत्यू झाले, तेव्हापासून फक्त आदित्य ठाकरे यांचेच नाव का समोर येत आहे. याचा विचार करण्याची गरज आहे. इतरांचे नावांची चर्चा का होत नाही हे समजण्याची गरज असल्याचे वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केले. तसेच जशी श्रद्धा प्रकरणी आफताबची नार्कोटेस्ट होते तशी आदित्य ठाकरे यांची एकदा नार्कोटेस्ट करा, पूर्ण सत्य बाहेर येईल असेही ते म्हणाले. विधानसभेच्या बाहेर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. रिया चक्रवर्तीला AU नावाच्या व्यक्तीने 44 फोन का केले होते याचाही सत्य बाहेर येण्याची गरज असल्याचेही यावेळी ते म्हणाले. 

पुढे नितेश राणे म्हणाले, आदित्य ठाकरेंवर आरोप करणारे खासदार राहुल शेवाळे हे मातोश्रीच्या किचन कॅबिनेटमध्ये होते. जेव्हा ते पक्षाला पेट्या पाठवत होते. तेव्हा त्यांची किंमत होती. मात्र आता त्यांनी सत्याची बाजू घेतली असल्याने त्यांची किंमत नसल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच आजही दिशा सालियान यांच्या मृत्यूचे प्रकरण मुंबई पोलिसांकडेच आहे. सीबीआयकडे अद्याप वर्ग झाले नाही. या निमित्ताने आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना हे प्रकरणाचा तपास पुन्हा सुरु करण्याची विनंती करणार आहे. 8 जून रोजी काय झाले, दोनवेळा तपास अधिकारी का बदलण्यात आले. या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज का गायब झाले. तसेच फ्लॅटच्या विजिटर्स बुकमधील पाने कोणी फाडली. दिशाचा पोस्टमोर्टम रिपोर्ट बाहेर का आला नाही. या प्रश्नांची उत्तरे समोर येणे गरजेचे असल्याचेही यावेळी नितेश राणे म्हणाले.

काय म्हणाले रोहित पवार?
 
संसदेत कधीही न बोलणारे खासदार राहुल शेवाळे यांनी महाराष्ट्राच्या हिताचा मुद्दा मांडण्याऐवजी मुंबईतील निवडणुका (BMC) डोळ्यापुढे ठेवून आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर आरोप केले. मुंबईच्या निवडणुकीत बिहारी लोकांची मते मोठ्या प्रमाणात आहेत. त्याचा विचार करुन असे खोटे आरोप होत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला. भाजपचे नेते निवडणुकांमध्ये यश मिळवण्यासाठी असे प्रयत्न सुरुवातीपासून करत आहेत. यापूर्वी बिहारची निवडणूक असताना सुशातसिंह राजपूत यांच्या आत्महत्येचे राजकारण करण्यात आले. गुजरात निवडणुका आल्या तेव्हा महाराष्ट्रातील प्रकल्प (Maharashtra Projects) पळवण्यात आले. तसाच प्रकार 'एयू' बाबत आहे.

ही बातमी देखील वाचा

महात्मा गांधी जुन्या काळातील तर पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या भारताचे राष्ट्रपिता; अमृता फडणवीस यांचं वक्तव्य

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Cyber Crime: शिंदे पिता-पुत्रांविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला शिवसेनेची लीगल टीम धडा शिकवणारा; नागपुरात पहिली तक्रार, 8 जणांविरोधात गुन्हा दाखल
शिंदे पिता-पुत्रांविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला शिवसेनेची लीगल टीम धडा शिकवणारा; नागपुरात पहिली तक्रार, 8 जणांविरोधात गुन्हा दाखल
Nagpur Police: नायलॉन मांजाने पतंग उडवणाऱ्यांची आता खैर नाही! IPS विश्वास नांगरे पाटील अॅक्शन मोडमध्ये! विक्रेत्यांसह अल्पवयीन मुलांच्या पालकांना इशारा, थेट...
नायलॉन मांजाने पतंग उडवणाऱ्यांची आता खैर नाही! IPS विश्वास नांगरे पाटील अॅक्शन मोडमध्ये! विक्रेत्यांसह अल्पवयीन मुलांच्या पालकांना इशारा, थेट...
Nagpur Crime News: नागपूर हादरलं! एमडी ड्रग्स तस्करीच्या वादातून कुख्यात गुंडाच्या साथीदारावर पाच जणांचा प्राणघातक हल्ला; बचावासाठी धावलेल्या मित्रालाही मारहाण
नागपूर हादरलं! एमडी ड्रग्स तस्करीच्या वादातून कुख्यात गुंडाच्या साथीदारावर पाच जणांचा प्राणघातक हल्ला; बचावासाठी धावलेल्या मित्रालाही मारहाण
Abhijeet Dipke: गोकुळच्या राजकारणात अभिजीत दिपकेंची उडी; सतेज पाटलांच्या आरोपांवर बोट ठेवत नागपुरातून सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, वकिलाला 80 लाख रुपये मोजले अन् शेतकऱ्यांना..
गोकुळच्या राजकारणात सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची उडी; सतेज पाटलांच्या आरोपांवर बोट ठेवत नागपुरातून सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, वकिलाला 80 लाख रुपये मोजले अन् शेतकऱ्यांना..

व्हिडीओ

Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report
Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Social Stock Exchange : मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
चंद्रपूरमध्ये नगरसेवकांचे मानधन दुप्पटीने वाढले; पैशासाठी सर्वपक्षीय एकटवले, महापालिकेत गुण्यागोविंदाने मंजुरी
चंद्रपूरमध्ये नगरसेवकांचे मानधन दुप्पटीने वाढले; पैशासाठी सर्वपक्षीय एकटवले, महापालिकेत गुण्यागोविंदाने मंजुरी
RJD Delimitation Bill Support : मोठी बातमी! इंडिया आघाडीत मोठी फूट, तेजस्वी यादवांच्या RJD चा मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा, भाजपची ताकद वाढली?
मोठी बातमी! इंडिया आघाडीत मोठी फूट, तेजस्वी यादवांच्या RJD चा मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा, भाजपची ताकद वाढली?
आला रे, आला... रोहित शर्मा पुन्हा कर्णधारपदी, मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा, म्हणाला, माझ्यासाठी अभिमानास्पद
आला रे, आला... रोहित शर्मा पुन्हा कर्णधारपदी, मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा, म्हणाला, माझ्यासाठी अभिमानास्पद
Rohit Pawar Delimitaion: शरद पवारांची भेट घेतल्यानंतर रोहित पवारांची डिलिमिटेशन विधेयकावर प्रतिक्रिया; राष्ट्रवादी (एसपी) पाठिंबा देणार की नाही?
शरद पवारांची भेट घेतल्यानंतर रोहित पवारांची डिलिमिटेशन विधेयकावर प्रतिक्रिया; राष्ट्रवादी (एसपी) पाठिंबा देणार की नाही?
Delimitation Bill Update : मोठी बातमी : लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार, मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
मोठी बातमी : लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार, मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
Delimitation: डिलिमिटेशन म्हणजे काय? केंद्रातील एनडीए सरकारकडे किती संख्याबळ, विधेयक मंजुरीसाठी किती आवश्यक?
डिलिमिटेशन म्हणजे काय? केंद्रातील एनडीए सरकारकडे किती संख्याबळ, विधेयक मंजुरीसाठी किती आवश्यक?
Embed widget