एक्स्प्लोर
Advertisement
विधानसभेत शिवसेना-भाजप आमदार भिडले, संजय गायकवाड-अभिमन्यू पवार यांच्यात धक्काबुक्की
शेतकऱ्यांना 25 हजार रुपये नुकसानभरपाई द्या, तोपर्यंत कामकाज करु नका अशी भूमिका भाजप आमदारांनी घेतली. विरोधकांनी यावरुन विधानसभेत गोंधळ घातला. याच मुद्द्यावरुन संजय गायकवाड आणि अभिमन्यू पवार यांच्यात वादावादी झाली.
नागूपर : हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात अपेक्षेप्रमाणे वादळीच झाली. विधानसभेत शिवसेना आणि भाजपच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. शिवसेनेचे बुलडाण्यातील आमदार संजय गायकवाड आणि भाजपचे लातूरच्या औसामधील आमदार अभिमन्यू पवार यांच्यात शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन भिडले. यानंतर विधानसभेचे कामकाज सुरुवातीला अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आलं. त्यानंतर सत्ताधारी पक्षाने गोंधळातच दोन विधेयकं मंजूर केली आणि कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलं.
शेतकऱ्यांना 25 हजार रुपये नुकसानभरपाई द्या, तोपर्यंत कामकाज करु नका अशी भूमिका भाजप आमदारांनी घेतली. विरोधकांनी यावरुन विधानसभेत गोंधळ घातला. याच मुद्द्यावरुन संजय गायकवाड आणि अभिमन्यू पवार यांच्यात वादावादी झाली. यावेळी सत्ताधारी पक्षाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील तसंच भास्कर जाधव हे शिवसेना आमदारांना समजावत होते. तर आशिष शेलार आणि गिरीश महाजन हे भाजप आमदारांना आवरत होते.
'सामना'च्या हेडलाईनचे फ्लेक्स
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी भाजप आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं. विरोधी आमदार 'सामना' वृत्तपत्राच्या जुन्या हेडलाईन्सचे फ्लेक्स घेऊन आले. "मी तुम्हाला न्याय देण्यासाठी बांधावर आलो आहे - उद्धव ठाकरे" अशा मजकुराचे हे फ्लेक्स होते. 'सामना'च्या शेतकऱ्यांसंदर्भातील बातम्यांचे बॅनर झळकवत शिवसेनेविरोधात भाजप आमदारांनी घोषणाबाजी केली. सरसकट कर्जमाफीची घोषणा केल्याशिवाय सभागृहातील कामकाज चालू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा विरोधकांनी घेतला.
विधानसभा अध्यक्षांकडून बोलावणं
या प्रकारानंतर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सर्वपक्षीय गट नेत्यांना दालनात बोलावले. सभागृहाचे कामकाज नियमाने चालावे यासाठी अध्यक्षांनी सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा केली.
धक्काबुक्की झाली असं म्हणता येणार नाही : संजय गायकवाड
"होर्डिंग झळकावणे, गोंधळ घालणे हे काम अशोभनीय आहे. विधानसभा अध्यक्षांनी सांगूनही, कारवाईचे संकेत देऊनही भाजप आमदार ऐकत नव्हते. त्यावरुन थोडा गोंधळ झाला. उगाच गोंधळ घालायचा असं चालणार नाही. धक्काबुक्की झाली असं म्हणता येणार नाही," अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी दिली.
शेतकऱ्यांसाठी निलंबन झालं तरी चालेल : अभिमन्यू पवार
"आमच्यावर सत्ताधारी आमदारांनी हल्ला केला. आम्ही मूळचेच आक्रमक आहोत, आमच्या अंगावर आलात तर गप्प बसणार नाही. माझा बॅनर खेचण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांसाठी निलंबन झालं तरी चालेल," अशी प्रतिक्रिया आमदार अभिमन्यू पवार यांनी एबीपी माझाला दिली.
भाजपकडून लाजिरवाणा प्रकार : जितेंद्र आव्हाड
भाजपने आज अतिशय लाजिरवाणा प्रकार सभागृहात केला. धुतलेले कपडे वाळून इस्त्री करुन घालायला दोन दिवस लागतात. मात्र दोन दिवसांपूर्वी स्थापन झालेल्या सरकारला हे जाब विचारत आहेत. भाजपवाले आमच्या अंगावर येत आहेत हे अत्यंत चुकीचं, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement