एक्स्प्लोर

Nagpur News : नागपुरात क्रिकेट सट्ट्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त; पैसे हरल्याने 20 वर्षीय मुलाची आत्महत्या, आईनेही विष प्राशन करुन जीवन संपवलं

नागपुरातील लकडगंज परिसरात क्रिकेट सट्ट्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त पैसे हरल्याने 20 वर्षीय मुलाची आत्महत्या, आईने सुद्धा विष प्राशन करुन जीवन संपवले

Nagpur News : नागपुरातील (Nagpur) लकडगंज परिसरात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. क्रिकेट सट्ट्याच्या (Cricket Betting) नादात मोठ्या प्रमाणात रक्कम हरल्यामुळे आर्थिक फटका बसलेल्या एका वीस वर्षीय तरुणाने नैराश्यातून आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे मुलाच्या मृत्यूची बातमी एकताच त्याचे आईने देखील काही तासातच विष (Poison) प्राशन करुन मृत्यूला जवळ केले आहे. 

वाईट संगतीमुळे मुलगा किकेट सट्ट्याकडे वळला

नागपुरातील लकडगंज पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या छापू नगर परिसरात या घटनेमुळे प्रचंड हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. खितेन नरेश वाधवानी (वय 20 वर्ष) असे मृत मुलाचे नाव असून दिव्या नरेश वाधवानी असे त्याच्या आईचे नाव आहे. खितेन हा नागपुरातील नामांकित महाविद्यालयाचा विद्यार्थी होता. परंतु चुकीच्या संगतीला लागल्यामुळे तो क्रिकेट सट्ट्याकडे वळला. मागील वर्षी तो आयपीएलमध्ये (IPL) काही पैसे हरला होता. ही बाब त्याने घरच्यांना सुद्धा सांगितलं होते. त्याच्या वडिलांनी ते हरलेले पैसे तेव्हा दिले पण होते मात्र त्याने यावर्षी परत मित्रांच्या सांगण्यावरुन आयपीएल सट्ट्यावर पैसे लावू लागला.

नेमकं काय घडलं?

खितेन वाधवानी रोज सट्टा लावायचा. शनिवारी (20 मे) खितेन मध्यरात्री उशिरा घरी पोहोचला, त्यामुळे त्याची आई त्याच्यावर चिडली होती. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी संपूर्ण कुटुंब शहरातील आशीर्वाद नगर इथे नातेवाईकाच्या घरी लग्न समारंभासाठी गेले होते. दरम्यान, घरात कोणीही नसल्याने खितेनने घरातील स्वयंपाकघरात गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर कुटुंबीय घरी परतले असता त्यांना खितेन स्वयंपाकघरात लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

आईनेही 48 तासांत प्राण सोडले

तरुण मुलाच्या मृत्यूच्या 48 तासांनंतर त्याची आई दिव्या नरेश वाधवानी यांनी देखील विष प्राशन करुन आपलं आयुष्य संपवलं. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर आईला मृत घोषित केलं. आपण मुलाला ओरडल्यामुळे त्यामुळे त्याने आत्महत्या केली असावी अशा पश्चाताप झाल्याने आईने विष पिऊन आयुष्य संपवलं

नागपुरातील या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून लकडगंज पोलीस ठाण्यात दोन्ही प्रकरणात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा

Nagpur Crime : लग्नासाठी प्रियकराचा नकार, दुखावलेल्या प्रेयसीने उचलले टोकाचे पाऊल...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 17 January 2025Baramati Father Killer Son : बापच उठला लेकराच्या जीवावर! 9 वर्षाच्या चिमुरड्याची बापाकडून हत्याWalmik Karad Special Report :कोट्याधीश कराड, पुण्यात घबाड; कराडच्या संपत्तीमुळे ईडीची एन्ट्री होणार?Saif Ali Khan Special Report : सैफ, सेफ आणि सवाल; सैफवरील हल्ल्याचंही राजकारण सुरु

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget