Nagpur Central Jail : मध्यवर्ती कारागृहातील भिंतींना फुटला पाझर, घडला भावनिक अनुबंध
कोरोना काळात मुलामुलींना त्यांच्या पालकांशी भेटता आले नव्हते. मात्र, यंदा या अभिनव उपक्रमामुळे अनेकांना त्यांच्या पालकांशी भेटता आले. या प्रत्यक्ष भेटीचा आनंद लहान मुलामुलींच्या चेहऱ्यावर दिसून आला.
नागपूर : कारागृहातील सिध्ददोष बंदिवानांच्या (A guilty prisoner) किशोरवयीन मुलांसाठी प्रत्यक्ष 'गळाभेट' कार्यक्रमाचे आज मध्यवर्ती कारागृह येथे आयोजन करण्यात आले होते. त्यानुषंगाने किशोरवयीन (teenagers) मुला-मुलींनी आपापल्या पालकांची (Parents) प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या मनातील भावनांना व्यक्त करत हितगुज (Emotional Talk) केले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून 120 बंदिवानांच्या 189 पाल्यांची आप्तेष्ठांशी प्रत्यक्षरीत्या भेट घडवून आणण्यात आली.
1 सप्टेंबर रोजी कारागृह ध्वजदिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानिमित्त कारागृह विभागाव्दारे राज्यात सर्वत्र बंदीवानांच्या पाल्यांना प्रत्यक्ष भेटण्याच्या 'गळाभेट' हा अभिनव उपक्रम आज नागपूर मध्यवर्ती कारागृहात घेण्यात आला. कारागृह उप महानिरीक्षक स्मिता साठे, कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमरे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी देवराव हाडे, वामन निमजे, तुरुंगाधिकारी दिपक भोसले, माया धतुरे यांच्यासह कारागृहाचे अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
53 वर्षांपासून होतोय ध्वजदिन साजरा
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक (ex cm vasantrao naik) यांनी 1 सप्टेंबर 1969 रोजी कारागृह विभागास ध्वज प्रदान केला होता. त्यादिवसापासून प्रथमत:च राज्यात (Maharashtra) सर्वत्र कारागृह विभागाचा ध्वजदिन साजरा करण्यात येत आहे. कोरोना महामारीच्या संकटकाळात कित्येक मुलामुलींना त्यांच्या पालकांशी भेटता आले नव्हते. मात्र, यंदा कारागृह विभागाच्या या अभिनव उपक्रमामुळे अनेकांना त्यांच्या पालकांशी भेटता आले. या प्रत्यक्ष भेटीचा आनंद लहान मुलामुलींच्या चेहऱ्यावर दिसून आला. बंदिवानांनी आपापल्या मुलामुलींचे शिक्षण, आरोग्य, पैसाअडका व राजीखुशी संदर्भात हितगुज यावेळी केले. कारागृह ध्वजदिनानिमित्त आज मध्यवर्ती कारागृहाच्या प्रांगणात सकाळी 7.45 वाजता कारागृह उप महानिरीक्षक स्वाती साठे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
पश्चाताप त्या क्षणाचा
अनेकवेळा रागाच्या भरात त्या क्षणी एकादी कृती केली जाते. त्या कृतीनगर होणाऱ्या परिणामांचा विचार केला जात नाही. तसेच या कृतीमुळे कुटुंबियांवर होणारे परिणाम आणि यातनांचाही विचार केला जात नाही. कृती केली त्या क्षणी तर थांबलो असतो तर आज कुटुंबियांसोबत असतो. मुलांना शाळेत सोडायला जाता आले असते, त्यांचा अभ्यास करुन घेतला असता. त्यामुळे त्या क्षणाचा आजही पश्चाताप असल्याचे अनेक बंदिवानांनी बोलून दाखवले.
इतर महत्त्वाच्या बातम्या