एक्स्प्लोर

Nagpur ST Bus : साई भक्तांसाठी एसटी महामंडळाची भेट; समृद्धी महामार्गावरुन नागपूर ते शिर्डी 'नॉनस्टॉप' बससेवा, 'या' सवलतीही मिळणार

या विशेष बस सेवेत 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास सवलत लागू असणार आहे. तसेच 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना 50 टक्के सवलतही लागू राहणार आहे.

Nagpur News : कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याहस्ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या (Balasaheb Thackeray Samruddhi Mahamarg) नागपूर ते शिर्डी (nagpur to Shirdi) या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण झाले. यानंतर आता एसटी महामंडळाकडून नागपूर ते शिर्डी बस सेवेची सुरुवात येत्या गुरुवार(15 डिसेंबरपासून) करण्यात येत आहे. ही बस नॉनस्टॉप राहणार असून दररोज ही गणेशपेठ येथील बसस्थानकावरुन निघेल. याआधी नागपूर ते शिर्डी थेट बससेवा नव्हती.

नागपूर ते शिर्डी (Nagpur To Shirdi) दरम्यान एसटीची विना वातानुकूलित आसन ( सीटिंग) दररोज नागपुरातील गणेशपेठ बसस्थानकावरुन रात्री नऊ वाजता निघेल. तसेच सकाळी साडेपाच वाजता शिर्डी येथे पोहोचेल. तसेच शिर्डी येथून महामंडळाची बस रात्री नऊ वाजता निघून सकाळी 5.30 वाजता पोहोचेल. नागपूर ते शिर्डी प्रवासासाठी प्रवाशांना 1300 रुपये भाडे राहील.

75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास

या विशेष बस सेवेत 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास (Free travel discount) सवलत लागू असणार आहे. तसेच 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना 50 टक्के सवलतही लागू राहील.

गरज पडल्यास आणखी बस फेऱ्या वाढवणार

सध्य दररोज फक्त एक बस नागपूर ते शिर्डीसाठी नियोजित करण्यात आली आहे. तसेच भविष्यात भाविकांची मागणी असल्यास विकेंडमध्ये बसेसची संख्या वाढविण्याचाही विचार करण्यात येईल. तसेच नागपूर ते शिर्डी आतापर्यंत थेट बससेवा नसल्याने आतापर्यंत नागरिकांना कोपरगाव किंवा मनमाड येथून दुसरी बस घ्यावी लागत होती. मात्र या नव्या  एसटीची विनावातानुकूलित (Air Conditioner) बसमुळे नागरिकांना थेट शिर्डी पोहोचता येणार आहे.

रेल्वेचीही कनेक्टिव्हीटी निवडक

नागपूर ते शिर्डीसाठी 20857 आणि 22894 या दोन थेट गाड्या आहेत. तर इतर गाड्यांनी मनमान, कोपरगाव किंवा लासालगाव येथे उतरावे लागत होते. तसेच नागपूर ते थेट शिर्डीसाठी रेल्वेने सुमारे 11 तासांचा वेळ लागत होता. मात्र या समृद्धी महामार्गावरील नव्या बसमुळे साडे आठ तासांत शिर्डी पोहोचता येणार आहे.

" सध्या नागपूर ते शिर्डी दिवसभरात एकच बसची सुरुवात करण्यात आली आहे. नागरिकांचा प्रतिसाद आणि मागणी बघता बसची संख्या वाढविण्याचा विचार करण्यात येईल. "
-श्रीकांत गभने, एसटीचे विभाग नियंत्रक

ही बातमी देखील वाचा

Holidays 2023 : नवीन वर्षात 24 सुट्ट्यांची मेजवानी; सर्वाधिक सहा सुट्ट्या मंगळवारी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गणोजी आणि कान्होजी शिर्केंकडून छावा सिनेमात संभाजीराजेंचा घात, गद्दारीचा शिक्का, राजेशिर्के घराण्याकडून दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
गणोजी आणि कान्होजी शिर्केंकडून छावा सिनेमात संभाजीराजेंचा घात, गद्दारीचा शिक्का, राजेशिर्के घराण्याकडून दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
Manoj Jarange Patil : धनंजय मुंडेंना संतोष देशमुख प्रकरणात सहआरोपी करा, मनोज जरांगे मस्साजोगमध्ये चार्जशीटबद्दल स्पष्टच बोलले
धनंजय मुंडेंना संतोष देशमुख प्रकरणात सहआरोपी करा, मनोज जरांगे मस्साजोगमध्ये चार्जशीटबद्दल स्पष्टच बोलले
प्रेमप्रकरणातून हत्या, नातेवाईकांनी आरोपीच्या घरासमोरच मृतदेह जाळला; काळापाणी गावातील शॉकिंग घटना
प्रेमप्रकरणातून हत्या, नातेवाईकांनी आरोपीच्या घरासमोरच मृतदेह जाळला; काळापाणी गावातील शॉकिंग घटना
Vidarbha vs Kerala Final 2025 : रहाणे, सूर्या, शिवम दुबे सगळे स्टार फेल! रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत मुंबईचा पराभव, फायनलमध्ये विदर्भ Vs केरळ मुकाबला
रहाणे, सूर्या, शिवम दुबे सगळे स्टार फेल! रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत मुंबईचा पराभव, फायनलमध्ये विदर्भ Vs केरळ मुकाबला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 21 February 2025Raj Thackeray BMC : राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर! मुंबईतील 3 मोठ्या विषयांवर पालिका आयुक्तांची भेटSharad Pawar Speech Delhi : 'माझ्यामुळेच १९९९ ला वाजपेयींचं सरकार एका मतानं पडलं' शरद पवारांचं भाषणJalana Copy Case : जालन्यात दहावीचा मराठीचा पेपर फुटला, कॉपीमुक्त परिक्षेचा फज्जा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गणोजी आणि कान्होजी शिर्केंकडून छावा सिनेमात संभाजीराजेंचा घात, गद्दारीचा शिक्का, राजेशिर्के घराण्याकडून दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
गणोजी आणि कान्होजी शिर्केंकडून छावा सिनेमात संभाजीराजेंचा घात, गद्दारीचा शिक्का, राजेशिर्के घराण्याकडून दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
Manoj Jarange Patil : धनंजय मुंडेंना संतोष देशमुख प्रकरणात सहआरोपी करा, मनोज जरांगे मस्साजोगमध्ये चार्जशीटबद्दल स्पष्टच बोलले
धनंजय मुंडेंना संतोष देशमुख प्रकरणात सहआरोपी करा, मनोज जरांगे मस्साजोगमध्ये चार्जशीटबद्दल स्पष्टच बोलले
प्रेमप्रकरणातून हत्या, नातेवाईकांनी आरोपीच्या घरासमोरच मृतदेह जाळला; काळापाणी गावातील शॉकिंग घटना
प्रेमप्रकरणातून हत्या, नातेवाईकांनी आरोपीच्या घरासमोरच मृतदेह जाळला; काळापाणी गावातील शॉकिंग घटना
Vidarbha vs Kerala Final 2025 : रहाणे, सूर्या, शिवम दुबे सगळे स्टार फेल! रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत मुंबईचा पराभव, फायनलमध्ये विदर्भ Vs केरळ मुकाबला
रहाणे, सूर्या, शिवम दुबे सगळे स्टार फेल! रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत मुंबईचा पराभव, फायनलमध्ये विदर्भ Vs केरळ मुकाबला
Matric Student Shot Dead : इकडं जालन्यात दहावीचा मराठी पेपर फुटला अन् तिकडं काॅपी दाखवली नाही म्हणून एका विद्यार्थ्याने दोन विद्यार्थ्यांना रस्त्यावर गोळ्या घातल्या, एकाचा मृत्यू
इकडं जालन्यात दहावीचा मराठी पेपर फुटला अन् तिकडं काॅपी दाखवली नाही म्हणून एका विद्यार्थ्याने दोन विद्यार्थ्यांना रस्त्यावर गोळ्या घातल्या, एकाचा मृत्यू
Pope Francis Health Update : कॅथलिक ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांची न्यूमोनिया आणि फुफ्फुसाच्या संसर्गामुळे प्रकृती चिंताजनक
कॅथलिक ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांची न्यूमोनिया आणि फुफ्फुसाच्या संसर्गामुळे प्रकृती चिंताजनक
Gold Rates: शेअर मार्केट कोसळलं, सोन्यातील गुंतवणूक सर्वात सेफ पर्याय , जाणून घ्या सोन्याचे भाव कसे वाढले?
गुंतवणुकीचा सर्वात सेफ ऑप्शन, एक तोळा सोन्याचा दर 7000 ते 90000 पर्यंत कसा वाढला?
मला खूप राग आलाय, तरीही...; ट्विट करुन डिवचणाऱ्या नेत्यावर संतापल्या अंजली दमानिया; अजित पवारांना चॅलेंज
मला खूप राग आलाय, तरीही...; ट्विट करुन डिवचणाऱ्या नेत्यावर संतापल्या अंजली दमानिया; अजित पवारांना चॅलेंज
Embed widget