Holidays 2023 : नवीन वर्षात 24 सुट्ट्यांची मेजवानी; सर्वाधिक सहा सुट्ट्या मंगळवारी
2023 वर्षात 24 सार्वजनिक सुट्ट्यांची मेजवानी कर्मचाऱ्यांना मिळाली आहे. तर दोन सार्वजनिक सुट्ट्या रविवारी तर तीन सुट्ट्या शनिवारी येत असल्याने अनेकांचा काहीसा हिरमोड झाला आहे.
Nagpur News : तीन आठवड्यांनंतर नवीन दिनदर्शिका (New Calender) 2023 ला प्रारंभ होत आहे. राज्य शासनाच्या (Government of Maharashtra) सामान्य प्रशासन विभागाने नवीन वर्ष 2023 मधील सार्वजनिक सुट्ट्या (Public Holidays) जाहीर केल्या आहेत. नवीन वर्षात 24 सार्वजनिक सुट्ट्यांची मेजवाणी कर्मचाऱ्यांना मिळाली आहे. नवीन वर्षात दोन सार्वजनिक सुट्ट्या रविवारी (Sunday) तर तीन सुट्ट्या शनिवारी (Saturday) येत असल्याने अनेकांचा काहीसा हिरमोड झाला आहे.
2022 चा शेवटचा महिना सुरु असून फक्त तीन आठवड्यांनंतर नवीन दिनदर्शिकेला सुरुवात होत आहे. सार्वजनिक सुट्ट्यांनुसार अनेकांचे 'हॉलिडे टूर' प्लॅनिंग ठरत असते. तसेच सर्व शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालय आणि बँकाना देखील रविवारी सुट्टी तर शनिवारी 'हाफ डे' असतो. त्यामुळे शनिवार, रविवार म्हटले की, या कर्मचाऱ्यांसाठी 'चिलिंग डे' ठरतो. सकाळी विरंगुळा म्हणून छंद जोपासण्यात तर काही आठवड्याची शिल्लक घरकामे तर कही पर्यटनाचा आनंद घेत असतात. तर सायंकाळी आपल्या मित्रांसोबत 'बैठकी'चा आनंद घेत असतात. त्यामुळे शनिवार, रविवार हे कर्मचाऱ्यांचे आवडीचे दिवस असतात.
याशिवाय सण, उत्सव, राष्ट्रीय सण आणि स्थानिक प्रशासनाच्या सुट्टीकडे कर्मचाऱ्यांचे विशेष लक्ष असते. कार्यालयीन सुट्ट्यांचा ताळमेळ बसवून पर्यटनाद्वारे आनंद द्विगुणीत करण्याचा बेत कर्मचारी आखत असतात. येत्या 2023 मधील सार्वजनिक सुट्या जाहीर झाल्याने शासकीय कर्मचारीच नव्हे तर इतर नागरिकांच्या व्हॉट्अॅप ग्रुपवर सार्वजनिक सुट्ट्यांचे पीडीएफ नोटीफिकेशन (PDF of Public Holidays) फिरत आहे.
2023 मधील शासकीय सुट्ट्या
- सोमवार : एक मे (महाराष्ट्र दिन), दोन ऑक्टोबर (गांधी जयंती), 27 नोव्हेंबर (गुरुनानक जयंती), 25 डिसेंबर (नाताळ)
- मंगळवार : सात मार्च (होळी), चार एप्रिल (महावीर जयंती), 15 ऑगस्ट (स्वातंत्र्यदिन), 19 सप्टेंबर (गणेश चतुर्थी), 24 ऑक्टोबर (दसरा), 14 नोव्हेंबर (दिवाळी)
- बुधवार : 22 मार्च (गुढीपाडवा), 28 जून (बकरी ईद), 16 ऑगस्ट (पारशी नुतन वर्ष)
- गुरुवार : 26 जानेवारी (प्रजासत्ताक दिन), 30 एप्रिल (रामनवमी), 28 सप्टेंबर (ईद ए मिलाद)
- शुक्रवार : सात (गुड फ्रायडे), 14 एप्रिल (डॉ़ आंबेडकर जयंती) आणि पाच मे (बुद्ध पौर्णिमा)
- शनिवार : 18 फेब्रुवारी (महाशिवरात्री), 29 जुलै (मोहरम), 22 एप्रिल (रमझान ईद)
- रविवार : 19 फेब्रुवारी (छत्रपती शिवाजी महाराज जयंती) आणि 12 नोव्हेंबर (दिवाळी, लक्ष्मीपूजन)
ही बातमी देखील वाचा