समाजमाध्यमावर खोट्या अफवा, त्यातून आंदोलनाचा भडका, नेमकं काय म्हणाले दिक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य?
स्तुस्थितीशी कोणताही संबंध नसताना जेव्हा समाजमाध्यमावर खोट्या अफवा पसरवल्या जात असल्याचे मत दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य डॉ प्रदीप आगलावे यांनी व्यक्त केले.
Nagpur News : वस्तुस्थितीशी कोणताही संबंध नसताना जेव्हा समाजमाध्यमावर खोट्या अफवा पसरवल्या जातात. त्या अफवांची कसलीही चौकशी न करता त्यावर सामान्य नागरिक विश्वास ठेवतात आणि त्यातून आंदोलनाचा (Agitation) कसा भडका उठतो, हे आम्ही दीक्षाभूमी (Deekshabhoomi) येथील आंदोलनाच्या रुपाने अनुभवल्याचे मत दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य डॉ प्रदीप आगलावे यांनी व्यक्त केले. दीक्षाभूमी येथे झालेल्या आंदोलनाआधी अंडरग्राऊण्ड पार्किंगचा नागपूर मेट्रोशी (Nagpur Metro) कोणताही संबंध नसताना फक्त अंडर ग्राऊण्ड पार्किंगच्या ठिकाणी सुरक्षेसाठी आणलेल्या बॅरिकेट्स वर नागपूर मेट्रो लिहिले होते. त्यामुळं ही पार्किंग नागपूर मेट्रोला दिली जाईल, ही अफवा पसरवण्यात काही समाजकंठक यशस्वी झाल्याचे स्मारक समितीचे अध्यक्ष प्रदीप आगलावे (Pradeep Aglave) यांनी सांगितले.
दिक्षभूमीची जागा दीक्षाभूमीच्या नावावर नाहीच ही अफवा देखील पसरवण्यात आली आहे. अंडरग्राऊण्ड पार्किंगमुळं मुख्य स्तूपाला तडे जाईल ही अफवा देखील पररवण्यात आली आहे. यामुळं दिक्षमूमीवर आंबेडकर अनुयायांचा भडका उडाला. मात्र, दीक्षाभूमी विकास प्रकल्प हे आंतराष्ट्रीय दर्जाचे आर्किटेककडून करुन घेतले आहे. व्हीएनआयटी सारख्या संस्थेकडून ते तपासून घेण्यात आले. गेल्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाला हे लाखो लोकांसमोर मांडण्यात आले होते. त्यामुळं याची कोणाला कल्पना नव्हती, हा आरोप स्मारक समितीने फेटाळून लावला आहे.
दीक्षाभूमीच्या जवळ असलेल्या शाळांना आज सुट्टी
दीक्षाभूमीच्या जवळ असलेल्या शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दीक्षाभूमीच्या जवळ असलेल्या बीआरए मुंडले शाळेने आज विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर केली आहे. 1 जुलै रोजी दीक्षाभूमीवर घडलेल्या तोडफोडीच्या घटनेनंतर पोलिसांनी दीक्षाभूमी आणि जवळपासच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. तसेच दीक्षाभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहतूक निर्बंधही लावले आहेत. त्यामुळं दीक्षाभूमीच्या जवळ असलेल्या शाळात पोहोचण्यात विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना अडचणी होत असल्याचे पाहून आज बीआरए मुंडले शाळेने सुट्टी जाहीर केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
दीक्षाभूमीवरील (Dikshabhumi) सौंदर्गीकरण आणि आधुनिकीकरणास सुरुवात करण्यात आली. मात्र, दीक्षाभूमीवरिल अंडरग्राऊंड पार्किंगचा मुद्दा चांगलाच तापला होता. दीक्षाभूमी परिसरात नागरिकांनी अंडरग्राऊंड पार्किंगला कडाडून विरोध दर्शवत परिसरात आक्रमक आंदोलन सुरू केले होते. दीक्षाभूमी परिसरात मोठ्या संख्येने जमलेल्या संतप्त जमावाने होत असलेल्या विकासकामाच्या साहित्याची तोडफोड केली होती. तर इतर विकासकामाला आमचा विरोध नसून केवळ चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या अंडरग्राऊंड पार्किंगला आमचा विरोध असल्याचे मत या आंदोलकांनी बोलताना व्यक्त केले होते.
महत्वाच्या बातम्या: