MP Cough Syrup News: चिमुकल्यांना विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या डॉक्टरला बेड्या; नागपुरातही तीन लहानग्यांची मृत्यूशी झुंज, प्रशासन अलर्ट मोडवर
MP Cough Syrup News: मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील पारसिया येथे कोल्ड्रिफ कफ सिरप घेतल्याने झालेल्या १० मुलांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी डॉ. प्रवीण सोनी यांना अटक केली आहे.

नागपूर : मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात नऊ लहान मुलांचा मृत्यू झाला, तर राजस्थानमध्येही तीन मुलांचा बळी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मुलांना दिलेल्या ‘कोल्ड्रिफ’ कफ (MP Cough Syrup) सिरपमुळे दुष्परिणाम झाले असावेत, आणि त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ सरकारांनी तत्काळ निर्णय घेत ‘कोल्ड्रिफ’ कफ सिरपच्या (MP Cough Syrup) विक्रीवर तात्पुरती बंदी घातली आहे. छिंदवाड्यातील या घटनेनंतर बालऔषधांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, विविध ठिकाणी या सिरपचे नमुने (MP Cough Syrup) तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मध्य प्रदेश व राजस्थान या ठिकाणी संशयीत कफ सायरफमुळे बालकांच्या मृत्यूनंतर नागपुरातही अन्न व औषधी प्रशासन विभाग अलर्ट मोडवर आले आहे.(MP Cough Syrup)
MP Cough Syrup: स्टॉक औषध विक्रेत्याला विक्री थांबण्याच्या सूचना
नागपुरात अन्न औषधी प्रशासन विभागाकडून काही स्टॉकिस्टकडे विचारणा करत कफ सिरप साठ्याची पाहणी करण्यात आली आहे. तामिळनाडूच्या कंपनीने मध्य प्रदेश व राज्यस्थान पुरवलेल्या औषधसाठ्यात भेसळ आढळून आली. या पार्श्वभूमीवर नागपुरात एका स्टॉकिस्टकडे असलेल्या कप सिरपबद्दल अन्न व औषध प्रशासन विभागाला साशंकता आल्याने तपासणी करण्यात आली आहे. त्यामुळे कफ सिरप विक्रीला होण्यापूर्वीच, स्टॉक औषध विक्रेत्याला विक्री थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कफ सिरपचे सॅम्पल घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तपासणीचा अहवाल येईपर्यंत स्टॉकिस्टकडून ते विक्रीस जाऊ नये अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत. त्या कफ सिरपमध्ये काय कंटेंट आढळत या अहवालाकडे लक्ष लागलं आहे, त्या अनुषंगाने अन्न औषध प्रशासन विभाग पुढील पावलं उचलणार आहे.
MP Cough Syrup: 11 बालकांना मृत्यू झाला असून 6 बालकांची प्रकृर्ती नाजूक
नागपूरमध्ये उपचार घेणाऱ्या एका बालकाचा काल खाजगी रुग्णालयात मध्ये मृत्यू झाला असून आता पर्यंत 11 बालकांना कफ सिरपमुळे मृत्यू झाला असून 6 बालकांची प्रकृर्ती नाजूक आहे . छिंदवाडा येथे या बालकांवर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहे.
MP Cough Syrup: १० मुलांच्या मृत्यूप्रकरणी प्रवीण सोनीला अटक
मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील पारसिया येथे कोल्ड्रिफ कफ सिरप घेतल्याने झालेल्या १० मुलांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी डॉ. प्रवीण सोनीला अटक केली आहे. या प्रकरणात, श्रीसन फार्मास्युटिकल्स आणि डॉ. सोनी याच्यावर बेकायदेशीरपणे सिरप वितरित केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. डॉ. सोनी याच्यावर बीएनएस २७६, बीएनएस १०५ आणि ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स कायद्याच्या कलम २७अ अंतर्गत आरोप आहेत.
५ वर्षांखालील मुलांचे मृत्यू अॅक्यूट इन्सेफलायटीस सिंड्रोम (AES) मुळे नव्हे तर अॅक्यूट किडनी इंज्युरी (AKI) मुळे झाले. अलिकडेच आणखी पाच मुलांच्या मृत्यूमुळे एकूण मृतांची संख्या १० झाली आहे. तसेच, नागपूर (महाराष्ट्र) येथील रुग्णालयात डायलिसिस आणि व्हेंटिलेटर सपोर्टवर किमान ३ मुले रूग्णालयात आहेत. अन्य 13 मुलांवर छिंदवाडा आणि नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
MP Cough Syrup: मुलांच्या वैद्यकीय इतिहासाची तपासणी
राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही-पुणे) यासह राष्ट्रीय संस्थांनी मुलांच्या घरातून घेतलेल्या पाण्याच्या आणि इतर नमुन्यांच्या तपशीलवार चाचणीतून असा निष्कर्ष काढला की पाणी, वेगळे कोणते रोग किंवा उंदीर हे कारण नव्हते. मुलांच्या वैद्यकीय इतिहासाची तपासणी केली असता असे दिसून आले की मृत्यूच्या सर्व प्रकरणांमध्ये कोल्ड्रिफ कफ सिरपचा वापर सामान्य होता. डॉ. सोनीची सध्या सविस्तर चौकशी सुरू आहे. शिवाय, कंपनीच्या इतर अधिकाऱ्यांविरुद्ध आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांविरुद्धही चौकशी होण्याची शक्यता आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर, दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
























