एक्स्प्लोर

काँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती : मुख्यमंत्री फडणवीस

काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्या आई-बापांचे स्मारक उभा केले. पण त्यांनी बाबासाहेबांच्या स्मारकासाठी जागा दिली नाही. काँग्रेसने अनूसूचित जातीचा फक्त वापरच केला, असा आरोप त्यांनी केला.

नागपूर :  भाजपने अनुसूचित जातीसाठी मोठे काम केले आहे. काँग्रेसने फक्त त्यांचा ‘व्होटबँक’ म्हणून वापर केला आहे. काँग्रेसचा इंदू मिलच्या जागेवर डोळा होता. त्यामुळेच केंद्रात व राज्यात काँग्रेसचे सरकार असतानाही स्मारकासाठी इंदू मिलची जागा मिळू शकली नाही, असा घणाघाती आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.  नागपूर येथील भाजपाच्या विजय संकल्प सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर चांगलेच तोंडसुख घेतले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या  उपस्थित होते. भाजपा सरकारमुळे इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक होत असून 2020 ला हे स्मारक पूर्ण होईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.  भाजपाचे सरकार सत्तेवर येताच स्मारकाला जागा तर मिळालीच शिवाय मोठ्या प्रमाणात निधीही मिळाला. काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्या आई-बापांचे स्मारक उभा केले. पण त्यांनी बाबासाहेबांच्या स्मारकासाठी जागा दिली नाही. काँग्रेसने अनूसूचित जातीचा फक्त वापरच केला, असा आरोप त्यांनी केला. मोदींमुळे बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक पूर्ण होत असल्याचे ते म्हणाले. इंदू मिल प्रश्नी पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर त्यांनी वस्त्रोद्योग मंत्र्यांनी तीन दिवसांत जागा देण्याचे आदेश दिले. मोठ्या प्रमाणात निधीही दिला. 2020 पर्यंत इंदू मिल येथे बाबासाहेबांचे भव्य स्मारक उभे राहील.  ज्यावेळी बाबासाहेबांच्या स्मारकासाठी इंदू मिलच्या जागेची मागणी करण्यात आली. त्यावेळी केंद्रात व राज्यात काँग्रेसचे सरकार होते. पण त्यांनी हा प्रश्न मार्गी लावलाच नाही. त्यांची या जागेवर नजर होती. काँग्रेसच्या नेत्यांनी स्वत:च्या आई-बापांची स्मारके उभा केली. त्यांना अनुसूचित जातीचा फक्त मतांसाठीच वापर केला, असेही ते म्हणाले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा आणखी एक जावईशोध : सचिन सावंत काँग्रेसला इंदू मिलची जागा बळकवायची होती असा जावईशोध राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लावला आहे. खोटं बोलण्यामध्ये त्यांचा हात कोणीही पकडू शकत नाही कारण साक्षात मोदींकडून त्यांना ही दिक्षा मिळालेली आहे. बेताल वक्तव्ये, अप्रचार, खोटे बोलणे हा भाजपच्या निवडणूक रणनितीचा भाग आहे. आता निवडणुका आल्याचं आहेत तेव्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य होते अशी वक्तव्ये सुद्धा त्यांच्याकडून ऐकायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, ही खोटे बोलण्याची प्रक्रिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेतून आली आहे. संघाचे लोक खोटे बोलतात अप्रचार, बदनामी करतात यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संघाला विरोध होता. काँग्रेस पक्षाने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाबाबत काय केलं हे मुख्यमंत्र्यांनी सांगायची आवश्यकता नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक इंदू मिलमध्ये करू हे काँग्रेसच्या निवडणूक जाहिरनाम्यामध्ये सांगितले होते. प्रिन्सिपल अप्रूव्हल आणण्याचं कामसुद्धा आम्ही केलं, भाजपला प्रमाणे फक्त निवडणुकीसाठी स्मारकाचा वापर आम्ही केला नाही. 2015 साली बिहार निवडणुकीआधी, पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन केले पण अजूनही एकसुद्धा वीट रचली गेली नाही. भाजपला बाबासाहेब आंबेडकराच्यां स्मारकाचा उपयोग फक्त राममंदीरासारखा, 'मंदीर वहीं बनायेंगें' असा निवडणुकीपुरता करायचा आहे का? याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे असे सावंत म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसची बदनामी करण्याचे कितीही प्रयत्न केले तरी ते होणार नाही. कारण काँग्रेसला आता सगळ्या दलित, मागसवर्गीय समाजाचा पाठिंबा मिळतोयं, आणि खऱ्या अर्थाने सगळ्या दलित, मागासवर्गीय समाजाला कळून चुकलं आहे की हे सरकार आपलं नाही. त्यांना हे वाटतयं त्यामुळे त्यांच्यातील जनआक्रोश आता वाढत आहे, याची काळजी मुख्यमंत्र्यांनी करावी असे सावंत म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Palghar News: मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashok Dhodi Kidnap Case Palghar : मोठी बातमी! अशोक धोडींचा मृतदेह गाडीच्या डिक्कीमध्ये सापडलाMahakumbh:ममता कुलकर्णी आणि लक्ष्मी त्रिपाठीचे महामंडलेश्वर पद काढले, किन्नर आखाड्याकडून मोठी कारवाईRaj Thackeray - Eknath Shinde Pune : एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे  पुण्यात एका कार्यक्रमात एकत्रSanjay Shirsat on Dhananjay Munde : कुणी भगवानगडावर गेलं म्हणून मुंडेंबाबत शिरसाटांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Palghar News: मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Embed widget