एक्स्प्लोर

Chief Justice of India | सरन्यायाधीश शरद बोबडे या फोटोवरुन होताहेत ट्रोल

सरन्यायाधीश शरद बोबडे एका फोटोवरुन सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. सामन्यातः कुठल्याही सरन्यायाधीशांना अशा 'पोज'मध्ये कदाचित पाहिलं नसावं. काही बाजूंनी ट्रोलर्स हे राजकीय रंग ही देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

नागपूर : सरन्यायाधीश शरद बोबडे ह्यांचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंवरुन काहींनी कौतुक तर काहींनी सरन्यायाधीशांना ट्रोल केलंय. कारण हा फोटो अत्यंत 'कुल' आहे. कारण, सामन्यातः कुठल्याही सरन्यायाधीशांना अशा 'पोज'मध्ये कदाचित पाहिलं नसावं. मात्र, त्याला काही बाजूंनी ट्रोलर्स हे राजकीय रंग ही देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

हारले डेव्हिडसनचे सी व्ही ओ 2020 हे टॉप एन्ड बाईकच्या मॉडेलवर नागपूरला आलेल्या सरन्यायाधीश शरद बोबडे ह्यांचा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. कळतंय की ही बाईक ज्या ऑटो डीलरकडे आली होती तो सरन्यायाधीशांचा मित्र असल्यामुळे त्याने ही बाईक बोबडे राजभवनात चालायला जातात तिथे आणली. बोबडे ह्यांना तारुण्यापासून ह्यांना वाहनांची असलेली हौस नागपुरात प्रसिद्ध आहे. एका प्रतिष्ठित, धनाढ्य आणि सुशिक्षित परिवारात जन्माला आलेल्या शरद बोबडे ह्यांना त्यांच्या 18 व्या वर्षीच वडिलांनी मर्सिडीज गाडी गिफ्ट केली होती.

राजभवनात आणलेल्या ह्या बाइकवर बसून पाहताना हा कोणीतरी बरोबरच्या व्यक्तीने काढलेला फोटो व्हायरल झाला. मात्र, ह्या फोटोला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. ही गाडी आता जरी विकायला आली असली तरी ती भाजपच्या सोनबा मुसळे नावाच्या नेत्याच्या मुलाची असल्याचे कळते. कोर्टाने सावनेर मतदार संघात 2014 ला निवडणूक न लढू दिलेल्या भाजप उमेदवार म्हणजे सोनबा मुसळे. त्यामुळे काही ट्रोलर्सने भाजपाशी त्यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आहे. तर काही ठिकाणी सरन्यायाधीशांनी मास्क, हेल्मेट लावले नाही ह्यावरही ट्रोलिंग झाले. मात्र, जॉगिंग करताना मास्क लावू नये हा सल्ला सध्या आहे. शरद बोबडे यांचे वडील अरविंद बोबडे हे दोनवेळा काँग्रेसच्या काळात महाधिवक्ता होते आणि शरद बोबडे ह्यांनी बाळासाहेब ठाकरे ह्यांची बाजूही उच्च न्यायालयात मांडली होती.

Mission Begin Again | राज्यात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊनच; मिशन बिगीन अगेनचे जूनमधील नियम कायम

या आधीही व्हायरल झाले होते फोटो

ऐरव्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायदानाची प्रक्रिया पार पाडणारे सरन्यायाधीश शरद बोबडे यांचे यापूर्वीही असेचं फोटो व्हायरल झाले होते. नागपुरात क्रिकेट खेळताना त्यांचे व्हिडीओ आणि फोटो चांगलेच प्रसिद्ध झाले होते. नागपूर बार असोसिएशनच्या वतीने क्रिकेट सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यात राज्यभरातील अनेक नामवंत वकील आणि न्यायाधीशांनी सहभाग घेतला होता. यावेळी सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी या सामन्याचं उद्घाटन केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Accident Parinay Fuke Son: मध्य प्रदेशातील अभयारण्यात अपघात, एकाने जीव गमावला; आमदार परिणय फुकेंच्या मुलाबाबत कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांचा खुलासा
मध्य प्रदेशातील अभयारण्यात अपघात, एकाने जीव गमावला; आमदार परिणय फुकेंच्या मुलाबाबत कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांचा खुलासा
Mohan Bhagwat: 'आपण निसर्गाचे मालक नाही तर निसर्गाचा एक भाग आहोत'; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सरसंघचालक मोहन भागवतांनी टोचले सरकारचे कान, म्हणाले...
'आपण निसर्गाचे मालक नाही तर निसर्गाचा एक भाग आहोत'; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सरसंघचालक मोहन भागवतांनी टोचले सरकारचे कान, म्हणाले...
Rashtriya OBC Mukti Morcha: पुणे शहराचे नाव 'फुले नगर' करावे, राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी, भारतरत्न देण्यासंदर्भातही निवेदन
पुणे शहराचे नाव 'फुले नगर' करावे, राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी, भारतरत्न देण्यासंदर्भातही निवेदन
Nagpur Couple Death Marathi News: दिवाळीसाठी आले, शिक्षक दाम्पत्याने जीवन संपवले; नागपुरमधील खळबळजनक घटना
दिवाळीसाठी आले, शिक्षक दाम्पत्याने जीवन संपवले; नागपुरमधील खळबळजनक घटना

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं
Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
Nagpur Hotel Fire : नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, IBJA कडून दर जाहीर, डिसेंबरमध्ये सोनं दीड लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 3901 रुपयांनी स्वस्त, IBJA कडून दर जाहीर
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
Embed widget