एक्स्प्लोर

नागपूर ग्रामीणच्या सहाही जागा भाजप लढवणार, शिंदे गट आणि अजित पवारांना काय मिळणार? आशिष जयस्वाल रामटेकमधून अपक्ष लढणार का?  

नागपूर ग्रामीणमधील (Nagpur Rural) सहाही विधानसभेच्या जागा कमळाच्या चिन्हावर लढण्यावर भाजप ठाम आहे. आशिष जयस्वालांनी (Ashish Jaiswal) रामटेकमधून अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला तर भाजप उमेदवार देणार आहे.

Nagpur Bjp News : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी वेगानं हालचाली सुरु केल्या आहेत. मात्र, जागावाटपाच्या मुद्यावरुन महाविकास आघाडी आणि महायुतीत खटके उडण्याची शक्यता वर्तवली जातेय. अशातच नागपूर ग्रामीणमधील (Nagpur Rural) सहाही विधानसभेच्या जागा कमळाच्या चिन्हावर लढण्यावर भाजप ठाम आहे. आशिष जयस्वाल (Ashish Jaiswal) यांनी रामटेकमधून अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला तर भाजप आपला उमेदवार देणार आहे. त्यामुळं आशिष जयस्वाल यांनी कोणत्या चिन्हावर लढायचं हा त्यांचा निर्णय असल्याचे मत नागपूर भाजपचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर कोहळे (BJP leader Sudhakar Kohle) यांनी सांगितलं.

शिंदे गट आणि अजित पवार गटाला नागपूरममध्ये काय मिळणार?

आम्ही उमरेड विधानसभेत भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढणार असल्याची माहिती देखील नागपूर भाजपचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी दिली. तर राजू पारवे काँग्रेसच्या चिन्हावर आमदार झाले होते. त्यामुळं उमरेडमध्ये भाजप आपले चिन्ह सोडणार नसल्याचे कोहळे म्हणाले. त्यामुळं एकनाथ शिंदे गट व अजित पवार गट यांना नागपूर ग्रामीणमध्ये कोणत्या जागा सुटणार? याबद्दल प्रश्न चिन्ह कायम आहे. रामटेक लोकसभा ही शिंदे गटाला सुटल्याने रामटेक विधानसभा आता भाजपाला मिळण्याची शक्यता आहे. मात्र, आशिष जैस्वाल धनुष्यबाणावर किंवा अपक्ष म्हणून लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळं रामटेकच्या जागेवरुन पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, अद्याप महायुतीमध्ये जागावाटपाचा निर्णय झालेला नाही. जागावाटप झाल्यानंतरच नेमकी परिस्थिती काय होणार हे समोर येणार आहे.

पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस महिला कार्डचा प्रयोग करणार

पूर्व नागपूर विधासभा मतदारसंघ भाजपचा नागपूर मधील सर्वात मजबूत  गड असल्याने काँग्रेसचे प्रस्थापित नेते तिथून लढायला फारसे इच्छुक नाहीत. त्यामुळं काँग्रेसने तिथून महिला उमेदवार रिंगणात उतरवण्याचा तयारी सुरु केली आहे. त्यासाठी काँग्रेसच्या प्रदेशच्या जेष्ठ नेत्यांनी संगीता तलमले यांना तयारीला लागायला सांगितले आहे. संगीता तलमले यांनी पूर्व विधानसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्याची संपर्क यात्रा पूर्ण केली आहे. लवकरच त्या दुसऱ्या टप्प्यातील संपर्क यात्रेला सुरुवात करणार आहेत. मात्र तीन टर्मचे आमदार असलेले कृष्णा खोपडे यांना आव्हान देणे काँग्रेससाठी तितके सोपे नसल्याचे दिसत आहे.  

महत्वाच्या बातम्या:

Nagpur VidhanSabha: अजितदादांनी थांबवलं तरी महिला आमदाराने थोपटले दंड; भाजप आमदाराविरोधात लढण्याचा ठाम निर्धार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 PM : 19 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour Full Segment : मविआ ते महायुती, जागावाटप ते मुख्यमंत्रि‍पद, रस्सीखेच सुरुच?Zero Hour Jammu Kashmir : जम्मू - काश्मीरमध्ये 370 वरुन घमासान, मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल!Zero Hour Bachchu Kadu Parivartan : बच्चू कडू यांचं 'परिवर्तन'! शिंदेंची साथ सोडत तिसऱ्या आघाडीत!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
Guru Vakri 2024 : अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Pune Politics: महायुतीत पिंपरीच्या जागेवरून तिढा? बारणेंच्या दावा, बनसोडेंचं उत्तर, ही जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत म्हणाले...
महायुतीत पिंपरीच्या जागेवरून तिढा? बारणेंच्या दावा, बनसोडेंचं उत्तर, ही जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत म्हणाले...
Embed widget