(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Devendra Fadnavis : आम्ही बापूंमुळेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अनुभवतोय, बापू कुटी येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अभिप्राय
आज देशात राबवला जात असलेला गरीब कल्याण अजेंडा म्हणजे बापूंनी सांगितलेली 'दारिद्र नारायणाची सेवा' असल्याचा अभिप्राय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेवाग्राम येथील बापू कुटी भेटी दरम्यान लिहीला.
नागपूरः आपण देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव बापूंमुळेच अनुभवतो आहोत. बापूंबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, भारताच्या समृद्धीचा विचार हा बापूंच्या विचारातूनच शक्य आहे. सर्व समावेशक आणि मानवी चेहरा असलेला विकास, समता अर्धीष्टीत समाज रचना सर्वांना संधीची समानता, सर्व विचार आणि पूजा पद्धती बाबत भाव हाच आपला मूलमंत्र आहे. आज देशात राबवला जात असलेला गरीब कल्याण अजेंडा म्हणजे बापूंनी सांगितलेली 'दारिद्र नारायणाची सेवा' असल्याचा अभिप्राय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेवाग्राम येथील बापू कुटी भेटी दरम्यान लिहीला.
पुढे फडणवीस यांनी लिहीले की, बापू कुटीमधून नवीन ऊर्जा घेऊन एक बलशाली समाज अशी एक समृद्ध राष्ट्र तयार करण्याचा प्रयत्न आपण सर्व मिळून करूया. असे संकल्प केले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त त्यांनी वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे असलेल्या बापू कुटीला भेट दिली. तसेच भारत राष्ट्र घडविण्यात महात्मा गांधी यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखीत केले. त्यांच्यासोबत खासदार रामदास तडस, आमदार नागो गाणार, आमदार रामदार आंबटकर, आमदार अभिजीत वंजारी, आमदार रणजित कांबळे, आमदार दादाराव केचे, आमदार समीर कुणावार, आमदार डॉ. पंकज भोयर, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, पोलीस अधिक्षक प्रशांत होळकर, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांची उपस्थिती होती.
बापू कुटी येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रार्थनाही केली. तसेच बाबू कुटी येथील प्रत्येक भेट आपल्याला उर्जा प्रदान करत असून समाज कार्याची नवीन प्रेरणा देत असल्याचेही यावेळी ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्याआधी उपमुख्यमंत्र्यांचे नाव, ग्रामविकास विभागाला सापडला नाही फडणवीसांचा फोटो!
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी येथून केले राष्ट्रध्वज खरेदी
मुंबई : 'घरोघरी तिरंगा' या अभियानात प्रत्येक नागरिक सहभागी होणार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने राष्ट्रध्वज विकत घेऊन स्वयंस्फूर्तीने 'घरोघरी तिरंगा' हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले. देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सोहळा साजरा करण्यात येत असून त्याअनुषंगाने अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच भाग म्हणून 'घरोघरी तिरंगा' हे अभियान राबविण्यात येत असून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमेद अभियानांतर्गत महिला बचत गटाच्या विक्री दालनातून राष्ट्रध्वज विकत घेतले.