एक्स्प्लोर

Kolhapur Nagar Palika Election: कोल्हापुरात नगरपालिका निवडणुकांमध्ये चकवा देणाऱ्या राजकीय आघाड्या; तत्त्वांनाच तिलांजली, राजकारणाची दिशाच बदलून गेली

Kolhapur Nagar Palika Election: कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राजकीय चकवा देणाऱ्या आघाड्या होत आहेत. दुसरीकडे शिरोळ तालुक्यामध्ये काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्र निवडणूक लढवणार आहे.

Kolhapur Nagar Palika Election: प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर राज्यात स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी रणशिंग फुंकण्यात आल्यानंतर स्थानिक पातळीवर अनेक आघाड्या होत आहेत. मात्र, या आघाड्या राजकीय तत्त्वांना तिलांजली देणाऱ्या ठरल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक चर्चा कोल्हापूरची होऊ लागली आहे. कोल्हापूरचे राजकीय विद्यापीठ समजल्या जाणाऱ्या कागलमध्ये थेट कट्टर विरोधक एकत्र आल्याने कार्यकर्ते सुद्धा चक्रावले आहेत. गेल्या आठ दिवसांपासून मुश्रीफ विरुद्ध घाटगे असा सामना होणार अशी चिन्हे असतानाच थेट दोघेही एकत्र आल्याने राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली. या हालचालींमागे महाशक्ती असल्याचा उल्लेख सुद्धा करण्यात आला. त्यामुळे आता या महाशक्तीमध्ये नेमकी कोणी ताकद या दोन नेत्यांना एकत्र येण्यासाठी दिली? याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे आता कागल नगरपालिकेला मुश्रीफ आणि घाटगे गट एकत्र येऊन निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी काल या संदर्भात संयुक्त पत्रकार परिषद घेत या संदर्भातील घोषणा केली. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राजकीय चकवा देणाऱ्या आघाड्या होत आहेत. दुसरीकडे शिरोळ तालुक्यामध्ये काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्र निवडणूक लढवणार आहे. चंदगडमध्ये भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आहेत. 

दुसरीकडे, मुरगुड नगरपालिकेमध्ये सुद्धा भाजपचे प्रवीणसिंह पाटील असूनही शिंदे गटाकडून त्यांच्या पत्नीला नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या पत्नी सुहासिनी देवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे माजी खासदार संजय मंडलिक यांनी सुद्धा चकवा दिला आहे. दुसरीकडे शिरोळ तालुक्यामध्ये शिंदे गटाचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सुद्धा भाजपलाच आव्हान दिलं आहे. त्यामुळे कोल्हापुरातील आघाड्या राजकीय चर्चेच्या केंद्रबिंदू ठरल्या आहेत. या निमित्ताने कोण कोणाला चकवा देत आहे आणि कोण कोणाचा काटा काढत आहे याचे उत्तर आता निकालामध्येच मिळणार आहे.

कोल्हापुरात झालेल्या आघाड्या

  • मलकापूर नगर परिषदेत आमदार विनय कोरे यांनी आणि माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांच्या लढत आहे. 
  • पेठवडगाव नगरपालिकेमध्ये आमदार विनय कोरे यांचा जनसुराज्य पक्ष व महादेवराव महाडिक यांच्या ताराराणी आघाडीच्या वतीने प्रविता सालपे या नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात आहेत. त्यांना विद्याताई पोळ यांच्या नेतृत्वाखालील यादव पॅनलने आव्हान दिलं आहे. 
  • पन्हाळ्यात आमदार विनय कोरे यांनी जनसुराज्य, भाजप-शिव शाहू आघाडी, शाहू आघाडी यांना एकत्र आणत आघाडी केली आहे. दुसरीकडे, अपक्षांना एकत्र करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आव्हान देण्यात आलं आहे. 
  • चंदगडमध्ये भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीसह काँग्रेसने पाठिंबा दिला आहे.
  • गडहिंग्लजमध्ये भाजपने जनता दलाशी आघाडी केली आहे. त्यांना शिंदे सेनेने साथ दिल्याचे चित्र आहे
  • हातकणंगलेत महायुती व महाविकास आघाडी फुटली असून नगराध्यक्ष पदाचा तिढा सुटत नसल्याने सर्वच पक्ष स्वबळ आजमावणार आहेत
  • कुरुंदवाड, शिरोळ, जयसिंगपूर नगरपालिकेत सर्वपक्षीय शाहू आघाडीने भाजपला आव्हान दिलं आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये. गेल्या सहा वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.    
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Rahul Gandhi In Pune : राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
TikTok : अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
Embed widget